मंगळवार, ३० मार्च, २०२१

गाव

 😄🌹गाव 🌹😄

****************************************

भाडं  भीमडीनं  करी

गाव आखाजिले जावो...

न्हई  आयकाले  येस

तुल्हे  मरीमाय  खावो....1

झपाटाम्हा ग्या बदली

गाव खेडाम्हा जमाना...

दाना दुकानम्हा मोजी

घर  आनेत  किराणा ....2

कोठे गर्बडी ग्या सांगा

फिरे चुनाना तो घाना...

दिसे  ठीग्गयनी  चड्डी

आनी धोतरम्हा शाना....3

गाव कोंथाबी रे जावा

न्हई   र्हायनं   गव्हारं...

न्हई  र्हायना  गावम्हा

तेली.. तांबूई..लव्हार....4

कसा  गावभर  फिरे 

रग्गायेल  गावसांडा...

नवा जमानानी कसा

जुना जमानाले कांडा....5

कोंबडीना पखाखाले

जसा बिनधास पील्ला...

तसा  वड  तो सम्हाये 

खाले पारव्हर धल्ला......6

चुल्हा आनी उलचूल

ग्यात म्हणे चारिधाम...

गॅस  नातू तो तेसन्हा

करे  मडकम्हा  काम.....7

मन्हा  गावना  भाईर

हुबा दाटीवाटी खया...

तठे   हंगामबी  ऎके 

टिंगरीना  गोड  गया......8

रोज राम पाह्यराम्हा 

ऱ्हाट  भजे  हरिनाम ...

सांगे  मुर्धुंगले  झांबा 

सुरु  करा  राम..राम......9

रोज  दिम्हईले शाळा 

कशी हाड्यासनी सुटे...

मन्हा  मनना  कनोरा

बासी आठौनीस्मा तुटे..10

धसी ग्यात गावगढ्या

टेका लाई दिसे वाडा...

न्हई डोयास्ले सापडे

न्हानपन्ना  गावगाडा....11

:::::::::::::::::::::::::::::::::::::

********************कवी... प्रकाश जी. पाटील

/////////पिंगळवाडेकर🙏

.................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...