🌷बारा किलोमीटरनां फेरा🌷
----------------------
भाऊ-बहिनीस्वन!
कालदिन मंगळवारनां दिन व्हता!नऊ मार्चनां दिन व्हता!....महाशिरवरात्रीलें खुशाल गुडीपाडानं उन पडी ऱ्हायन!डोकालें गमचां बांधी फिरानी पायी येल से!उननांभर ते आखो!... सूर्यदेवनां आंगम्हा भगत घूमी ऱ्हायनां!घाम काढि गंजीफराकम्हा टाकी ऱ्हायनां!डोकालें,आंगलें चटकाडी ऱ्हायनां!🌹
धुयाथिन अमयनेर रस्ते लागो ते आंगे पांगेन्हा...अर्धा-मर्धा गहू कापायी जायेलं दिखनातं!ऱ्हायेलं-सूयेल मशीनन्ही वाट दखी ऱ्हायनातं!मव्हरे ते बरेड- बुरेड नजरे पडेल दिखनं!... हिव्वर,बाभुईनां झाडे बांधेबांधले नजरे दिखतसं!..मुगामुगा उन झेली हुबा दिख्तस!🌷
दुपारन्हा पाह्यरे धुये सोडी मव्हरे अमयनेर पाउत डांबर रस्ता चुल्हा.. तावा चटकाड्या वाटस!... टरटर आवाज करणाऱ्या गाड्यास्ना टायरे भुंजातं ऱ्हातसं!...मी भी मन्हा याहीस्ना संगे कालदिन फटफटीवर डबल सीट अमयनेरन्हा जोडे देवगाव देवळीलें लगीनलें गयथूत! आंगवर दुफारनं उन झेली सोशल डिस्टनसिंगन्ह नेम्मंन पालन करी देड वाजता लगीन लाग्न!...जेवने खावने पहिलेंगचं उरकीलेलं व्हत!🌷
भाऊ बहिनीस्वन!
नवरदेव नवरीलें आशीर्वाद दिसनी!भावी आयुष्य चांगलं एक दुसारलें समायांनं!..मायबापलें नेम्मंन समायानं वचन लिसनी!..ज्या रस्ते गउथूत त्याचं रस्ते मांगे फिरनु व्हतुतं!देवळीथिन निंघनूत अमयनेरनं रेल्वे फाटक लाग्न!जेवनां आंगे उत्तर दिशान्हा रस्ते बोर्ड दिखना व्हता!..."पिंगळवाडे १२कि मी" ....🌷
बोर्ड वाचीसनी एकदम मन्हा मेंदूनी तार चमकनी!....आपुन दररोज दगडनां,चांदी-पित्तयनां! ऱ्हायी-सुयी सोनानां मढायेलं देवनी सक्काय-दुपार! आखो दिनमावय्यावर मन लायी पूजा करत ऱ्हातसं!...मंग भाऊस्वन!..आपलं मन ज्या जित्ता देववर बठेल ऱ्हास!श्रध्दा बठेल ऱ्हास!त्यांनं दर्शन लिध ते मुकल पुन्य आपला खातावर जमा व्हत ऱ्हास!मन्हा मनलें वाटी गये!...🌷
भाऊस्वन!श्रध्दानां देव फुकट थोडी भेटस?कडक तप करनां पडस!हुना रस्ते दुफारनां पाह्यरे मव्हरे जानं पडस!.. बारा किलोमीटरनां वाकडा फेरा करावर देव भेटस!देव मूर्तीम्हा ऱ्हास तसा जित्ता मानोसम्हा भी ऱ्हास!आनी मी ज्या देवलें फेसबुक आनी व्हाट्सएप वर देखी-वाची ऱ्हायंतू!जठे मन्हा भाव बठेल व्हता!त्या भावनानां देव कितला दूर व्हता?...आंगे-पांगे १२कि मी वर! बरं लोके काशी जातस!मथुरा जातस!पंढरपूरलें जातस!मुकला दूर जातस!..भाड तोड खर्च करीस्नि भी देव दूर ऱ्हायी जास!...आपुन खाले हात मांगे फिरी येतस!देव्हारानां देव देव्हारा सोडी बाहेर येतत नयी!आपुन श्रध्दा पूर्वक धोत ऱ्हातसं!मन न्ह मनम्हा ऱ्हायी जास!देव दिखा गुंता हिरदनी काकूंयदि ऱ्हास...धल्ला व्हवा पाउत धोतस!..आपुन वरनां रस्ते चालना जातस!देव मनम्हा ऱ्हायी जास!...आपोरी इच्छा लिसनी!....सरगे चालना जातस!देव काय जोडे येत नई!मोक्षनां आंगे काय जातस नई!देवनं उज्जी कठीन ऱ्हास!वर जावा पाउत येडा पिसा व्हयी जातस पन देव मव्हरे पयेत ऱ्हास!🌷
मन्हा याहीस्ले!चौधरी साहेब यासले सांग"देव्हारानां देव १२कि मी से चालतंस का?".... मन्हा आननसाठे याहीस्नि फटफटींलें किक्क मारी!....उनन्हा चटका लेत पिंगळवाडालें पोचनुत!मन्हा देव्हारानां देव!देव्हारा सोडी भक्तलें भेटागुंता!दर्शन देवागुंता च्यार पाच पाउलें मव्हरे चालत उना!....त्या भावनांना देवनं नाव से!...."भाऊसाहेब प्रकाश पाटील पिंगळवाडेकर!"इचार सागरनं नाव से!समाज प्रबोधन करणारा हाऊ देव से!....🌷
लोके गोठा लिख्तस!बनावतसं!....पन ज्यासना बद्दल लिख तेवढं कमी से!....विचारवंत, साहित्यिक, कवी, तत्त्वचिंतक,तर्कशास्त्र, पायलें चटका बठी कायेजथिन बाहेर येणारं सत्य मांडणारा कारलालें गोड करी लेनारा पन चटका बठेलं फफोटानि जित्ती कय बठ्ठास्ना मव्हरे मांडणारा कवी आनी भला माणुस म्हणजे भाऊसाहेब प्रकाशजी पाटील साहेब!🌷
भाऊसाहेब यासन्या कविता डोया नां तलाव बनाडतीस!...तलाव फुगी मव्हरे दुःखानां लवणं व्हावालें लागस!....कुणबीनं जित्त दुःख कविताम्हा वती टाकतसं!...कविता लांगी बनी विचारन्हा बारा भरत ऱ्हास!डोयालें झुई झुई पाणीनां लवन बनावतस!त्यासनी लेखनी म्हा इतली ताकद से!त्या सेतस प्रकाश पाटील सर!...शेतकरी कवी सेतस!शेतकरीनं वल्ल दुःख त्याचं मांडू शकतस!....दिनभर घर वावर त्यासना पायखाले येत ऱ्हास!...कोल्ल फुस्कट,भुसकट त्यासनाफांनं सापडाउ नई!...वल्ल जरत ताज सत्य त्यासना कविताम्हा घुसमयत ऱ्हास!....शेतकरी कवी सेतस!...शेतकरीनं दुःख त्याचं मांडू शकतस!...आम्हनांगत सावलीम्हा बठी उनन्हा चटका नई लिख्तस!आम्ही बेपारी कवी सेतस!....पन भाऊसाहेब अस्सल लिख्तस!... त्या लेखक सेतस, उत्तम नट सेतस,कवी सेतस!कलाकार सेतस!बठ्ठासथिन त्या भला मानोस सेतस!तटकतोड बोलतस!....🌷
भाऊस्वन!मन्हा भावनांना समुनंदर तय देखाले ग्या!....तठे मंदिर व्हत!...मानोसनं मंदिर व्हत!मंदिरम्हा श्रद्धानां फुले उमली ऱ्हायंतात!हासी ऱ्हायंतात!... फुलें देवनां आंगवर पडी ऱ्हायतात!...देव प्रसन्न व्हयी भक्तले ग्यान वाटी ऱ्हायंता!भक्तलें थंडगार पानीनां तांब्या भरी अमृद वाटी ऱ्हायंता!देव घर येल भक्तलें च्याहा पाजी ऱ्हायंता!टरबूज कापी खावाडी ऱ्हायंता! आम्ही ओंजळभरी मनन्ही थयली भरी ऱ्हायंतूत!देवलें भेटा गुंता इतला पानीम्हा पडी गयथु की शाल, नारय लयी जावो इतलभी इसरी गयथु!आम्ही प्रकाश पर्व जोडे बठेल व्हतुत!ज्ञान प्रकाश म्हा बुद्धी धोयी ऱ्हायंथु!...पांढुरंगनी द्येल टरबूज खायी ऱ्हायंतुत!आम्ही प्रकाश पाटील सरजीस्ले मनम्हान मन म्हा देव्हाराम्हा बासाडी ऱ्हायंतूतं!बारा किलोमीटरनां वाकडा चक्कर मारी हिरदम्हा अमृद भरी लयी चालनु व्हतूतं!अमृतकुंभ हिरदम्हा ठी मव्हरे निंघनू व्हतुत!महान कवींनं!जित्ता जगता देव नं दर्शन ली निंघनू व्हतुत..🌷
भाऊ बहिनीस्वन!...
आखो भेटसुत नवा इशय संगे!...तवलोग राम राम मंडई!राम राम!...🌷
🌷--------------🌷
नानाभाऊ माळी,
मु पो ता शिंदखेडा, जि धुळे
(ह मु , हडपसर,पुणे-४११०२८)
मो नं ७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१०मार्च २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा