शुक्रवार, १४ एप्रिल, २०२३

कामगार चळवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे व लेख



डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार चळवळ

       आजच्या वर्तमानस्थितीचं अवलोकन केले असता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगारांच्या बाबतीतील विचारांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण सध्याच्या परिस्थितीत कामगार ज्या अवस्थेतून जात आहेत त्यामागची कारणं जर लक्षात घेतली तर डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व लक्षात येते. कोरोनाच्या महामारीमुळे भारतात २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे जवळजवळ सर्वच व्यवहार ठप्प पडले.कारखाने बंद झाले. सर्वच प्रकारचे उद्योग व्यवसाय हे बंद झाले. त्यामुळे त्यावर आधारित सर्वच कामगार वर्ग हा बेरोजगार झाला. सुरुवातीला त्यांना वाटले की लॉकडाऊन काही जास्त दिवस राहणार नाही. म्हणून ते जवळपास महीनाभर शांत होते. परंतु हळूहळू लॉकडाऊनचा कालावधी हा वाढतच गेला आणि जवळची सर्व जमापूंजी संपल्यावर कामगारांना घरी बसून राहणे शक्य नव्हते. ज्या भाकरीसाठी ते घरदार सोडून परक्या शहरात वास्तव्यास आले त्याच भाकरीसाठी त्यांना पुन्हा आपापल्या गावी जाणे आवश्यक होते. म्हणून प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था होत नसलेली पाहून घराच्या ओढीनं हा मजूर वर्ग हजारो मैल पायपीट करीत निघाला. उन्हातान्हात उपाशीपोटी लेकरंबाळांना सोबत घेऊन अनवाणी पायानं रस्ता तुडवितांना आपण साऱ्यांनीच त्यांना पाहिलं. देशाचा अर्थ व्यवस्थेचा कणा हा कामगार वर्ग.देशाची उभारणी करणारा हा कामगार वर्ग. मात्र स्वतःचीच उभारणी करण्यात अयशस्वी ठरला. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा बहुतांश कामगार वर्ग असंघटित आहे आणि आपल्या हक्क अधिकारांप्रति तो अजूनही अनभिज्ञ आहे. म्हणूनच या कामगार वर्गाचं नेहमीच शोषण होत आलेले आहे.
         अगदी स्वातंत्र्याच्या अगोदरपासून तर आजपर्यंत स्वातंत्र्य मिळून जवळपास ७३ वर्षे होऊनही कामगारांचे शोषण अजूनही थांबलेले नाही. संघटित कामगारांची स्थिती थोडीफार बऱ्यापैकी आहे. कारण त्यांच्या कामगार संघटना अस्तित्वात आहेत आणि त्याद्वारे त्यांच्या हक्क अधिकार यांच्याप्रति ते जागृत असतात परंतु भारताने खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे धोरण स्विकारल्याने आज संघटित कामगारांची संख्या फारच कमी आहे. भांडवलदारांनी कंत्राटी पद्धत अंमलात आणल्याने कंत्राटी मजूरांची संख्याच मोठ्या प्रमाणात आहे.कंत्राटी मजूर देखील असंघटित कामगार आहेत.त्यांच्या कामगार संघटना नाहीत. त्यांना संघटित कामगारांच्या मोठ्या संघटनेत सहभागी होता येते. परंतु कारखानमालकाच्या कामावरून काढून टाकण्याच्या भीतीने ते संघटनेत सामील होत नाहीत.
       लॉकडाऊनच्या काळात कामगार वर्गाला अतिशय वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. परंतु या श्रमिकांवर अशी वेळ का आली हे लक्षात घेतले असता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कामगार आणि कामगार चळवळीसंबंधीचे विचार आजही महत्त्वाचे आहेत. डॉ. बाबासाहेब असे म्हणतात की, "ज्याच्याजवळ सत्ता असते त्यालाच स्वातंत्र्य असते.हा सिद्धांत कोणीही नाकारु शकत नाही. स्वातंत्र्य मिळविण्याचे आणि सर्व अडचणींतून मुक्त होण्याचे एकमेव साधन सत्ता हेच असून धार्मिक व आर्थिक शक्तीइतकी नसली तरी राजकीय शक्तीही खरीखुरी शक्ती असून बरीच परिणामकारकही आहे. कारण शोषित पिडीत वर्गाला नवीन घटनेप्रमाणे जे राजकीय हक्क मिळाले आहेत ते आपल्या शत्रूंनी आपल्या यंत्रणेद्वारा आणि आपल्यातील स्वार्थी, गरजू आणि दुराचारी लोकांच्या साहाय्याने कूचकामी करुन टाकले आहेत." डॉ.बाबासाहेबांच्या मतानुसार कामगार वर्गाकडे राजकीय सत्ता असणे आवश्यक आहे. शोषित पिडीत वर्गाचे प्रतिनिधी अर्थातच कामगार वर्गाचे प्रतिनिधी संसदेत जाणे आवश्यक आहे.जेणेकरुन ते प्रतिनिधी आपल्या कामगार वर्गाच्या समस्या, प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडू शकतील.
          डॉ.बाबासाहेब असे म्हणतात की,"माझ्या मते या देशातील कामगारांना दोन शत्रूंशी तोंड द्यावे लागते.हे दोन शत्रू म्हणजे : ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे होत.ब्राम्हणशाही या शब्दाचा स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तत्वांचा अभाव असा अर्थ मला अभिप्रेत आहे." डॉ. बाबासाहेबांच्या या मताच्या अनुषंगाने विचार केला असता तर आजही हीच खरी परिस्थिती आहे. कारण संसदेत जे लोक आहेत ते जास्तीत जास्त ब्राह्मणवादी विचाराने ग्रस्त असून भांडवलशाहीचे पोषण करणारे आहेत. म्हणूनच कामगार वर्गास अत्यंत वाईट परिस्थितीत जीवन जगणं भाग पडत असतांना सुद्धा संसदेत एस.सी,एस.टी.,आणि ओ.बी.सी. वर्गाचे प्रतिनिधी असतांना सुद्धा कामगारांच्या हितासाठी कुणीही आवाज उठविलेला दिसून येत नाही.डॉ. बाबासाहेब प्रचार-प्रसार माध्यमांचं महत्त्व अधोरेखित करतांना असे म्हणतात की,आपल्या कामगार चळवळीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एखादे प्रभावी दैनिक वर्तमानपत्र पाहिजे. आजही आपण जर याचा विचार केला तर कामगार, शोषित-पिडीत यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला समाजासमोर आणणारे प्रभावी असे दैनिक वर्तमानपत्र नाही. प्रचार प्रसार माध्यमे ही सरकारची आणि भांडवलशाहीची बटीक झालेली दिसून येतात. त्यामुळे कामगार वर्गाला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे.
       कामगार ऐक्याच्या बाबतीत डॉ.बाबासाहेब असं म्हणतात की,"सामाजिक दृष्टीने उच्च नीच भेदभाव मानणे व पाळणे हे तत्वतः चूक असून कामगारांच्या संघटनेला ते फार घातक आहे, हे कामगारांना सांगणे तसेच वंश आणि धर्मामुळे एक कामगार दुसऱ्याचा शत्रू बनत असल्यामुळे कामगारांच्या ऐक्यामध्ये आड येणारी ही कारणे नष्ट करणे हाच कामगार ऐक्याचा खरा मार्ग होय." वर्तमानस्थितीत कामगारांच्या समस्या आणि प्रश्नांच्या बाबतीत सरकार उदासीन दिसून येते याचे महत्त्वाचे कारण हेच आहे की, कामगार हे संघटित नाहीत. जाती धर्माच्या आधारे ते अजूनही विखुरलेले आहेत. त्यांच्यामध्ये एकीची भावना नाही.कामगार वर्ग म्हणून ते एकत्र यायला मानसिकरित्या तयार नाहीत. जोपर्यंत ते कामगारवर्ग म्हणून संघटित होऊन त्यांच्या न्याय हक्क अधिकारासाठी लढा देत नाहीत तोपर्यंत त्यांची दखल कुणीही घेणार नाही.म्हणून सर्व शोषित पिडित कामगारांनी संघटित होऊन कामगारांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधून प्रसंगी कामगारांच्या हितासाठी जाबही विचारणे आवश्यक आहे.
        कामगारांच्या दुर्व्यवस्थेला कामगार संघटना आणि त्यांचे नेतृत्व सुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहे. कारण डॉ.बाबासाहेब असे म्हणतात की, "कामगार वर्गाच्या जीवनस्तराचे कमी होण्यापासून संरक्षण करणे हा कामगार संघटनांचा मुख्य उद्देश आहे."हा उद्देश पाहता आजच्या घडीला कामगार संघटना ह्या कामगार वर्गाचे जीवनस्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करतांना दिसून येत नाहीत. कामगार संघटनेचे नेतृत्व सुद्धा फक्त पदासाठी आपसांत संघर्ष करतांना दिसून येतात. काही प्रसंगी भांडवलशाहीशी हातमिळवणी करण्यात देखील ते मागेपुढे पाहत नाहीत.कामगार संघटनेचे नेतृत्व हे स्वार्थी आणि पथभ्रष्ट असेल तर कामगारांच्या प्रश्नांकडे, त्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणूनच कामगारांची स्वतंत्र आणि संघटित अशी स्वावलंबी संघटना असणे आवश्यक आहे. ब्राम्हणशाहीने ग्रस्त आणि वर्चस्ववादी प्रवृत्तीचे नेतृत्व कामगारांना न्याय मिळवून देण्यास कधीच सक्षम असणार नाही.म्हणूनच कामगार संघटनेचे नेतृत्व हे शोषित पिडितांच्या दुःखाची जाण असलेल्या व्यक्तींकडेच असले पाहिजे. जेणेकरुन ते कामगारांच्या न्याय हक्काची लढाई सक्षमपणे लढू शकतात.
         डॉ.बाबासाहेबांच्या मते देशातील ८०% शोषित पिडीत लोकांवरील होणारा जुलूम समूळ नष्ट करुन त्यांचे जीवन सुखाचे करणे, हेच खरे राजकारण होय आणि ज्या राजवटीत शेतकरी, मजूरांस पिळणारे शेठसावकार यांचे प्राबल्य असते ती राजवट देशाचे खरे हित कधीच साधू शकणार नाही.जर आज भारतात खरोखर शोषित-पिडीत,शेतकरी आणि कामगारांचे हित पाहणारे सरकार राहिले असते तर त्यांच्याशी असा भेदभावाचा व्यवहार झाला नसता.म्हणूनच डॉ.बाबासाहेब कामगारांना राजकीय सत्ता हाती घेण्याचे आवाहन करतात. ते म्हणतात की, "कामगारांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याची जर संघटितपणे शपथ घेतली तर त्यांना तो एक अभिशापच ठरेल." जी राजकीय संस्था शेठसावकार आणि भांडवलदारांचे हित साधण्याचा प्रयत्न करते त्या संस्थेपासून नाडलेल्या वर्गाने अलिप्त राहण्याचा इशाराही डॉ. बाबासाहेब देतात. इ.स. १९३८ मध्ये डॉ. बाबासाहेब यांनी दिलेला हा इशारा जर शेतकरी आणि कामगार वर्गाने लक्षात घेतला असता तर आज शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची आणि कामगारांना अशाप्रकारे लाचारीने जीवन जगण्याची वेळ आली नसती.
       अध्ययनाचे महत्त्व विषद करतांना डॉ. बाबासाहेब श्रमिकांना म्हणतात की, "ज्ञानाशिवाय अधिकार मिळत नाहीत. भांडवलशाहीला मुक्त हस्त देणाऱ्या सरकारपेक्षा नियंत्रणाखाली असलेल्या यंत्रणेला ज्ञानाची अत्युच्च पातळी व प्रशिक्षण मिळवावे लागेल. दुर्दैवाने भारतातील श्रमिकांनी अध्ययनाचे महत्त्व जाणले नाही. एक श्रमिक नेता म्हणून भांडवलदारांना शिवीगाळ करणे आणि अधिकाधिक शिवीगाळ करणे हीच सुरुवातीपासून श्रमिक नेत्यांची भूमिका राहिली आहे.डॉ. बाबसाहेबांच्या या विचारानुसार आपणास असे लक्षात येते की,कामगारांच्या हक्क अधिकारासाठी लढा लढतांना कामगार नेत्यांना जगातील कामगार चळवळींचा अभ्यास असणे आवश्यक आहे. कामगारांचे मूलभूत हक्क अधिकार आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेची जाणही नेतृत्वाला असणे आवश्यक आहे.
        वर्तमान स्थितीत कामगारांचे जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते जर सोडवायचे असतील तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार आणि कामगार चळवळ या संदर्भात जे महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत त्या विचारांचा पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करून त्यादृष्टीने पावले उचलणे ही काळाची गरज आहे. अन्यथा कामगार वर्गाला अशाचप्रकारे शोषणाच्या व्यवस्थेला सामोरं जावं लागेल. म्हणून ही शोषणाची व्यवस्था उखडून फेकायची असेल तर कामगार वर्ग म्हणून एकत्र येऊन संघटितपणे लढा दिल्याशिवाय पर्याय नाही.


प्रणाली मराठे- धुळे.
9970955255
संदर्भ - कामगार चळवळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे व लेख

प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷*************************... नानाभाऊ माळी 

प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*************************
... नानाभाऊ माळी 

......चौफेर अंधःकार पसरलेला होता!कित्येक शतकांचा अंधार परंपरेने लादलेला होता!गावं उजेडातं होती!वेशीबाहेर काळाकुट्ट अंधार होता!उजेडासाठी याचना करणारे, धडपडणारे अंधःकारमय जीवन जगत होती!कित्येक शतकं अंधारातं यातनामय जीवन जगत होती!कित्येक शतकांपासून सुर्याचं दर्शन झालं नव्हतं!🌹

वेशीबाहेरील वस्तीत एके दिवशी अचानक अंधार कापित उजेड दिसू लागला होता!अंधारात खितपत पडलेल्यांना त्या दिवशी पूर्व दिशा कळली होती!अंधार पुढे सरकत होता!मागून उजेड पळत होता!उजेडाची सवय नसल्याने सर्वचं भांबावली होती!उजेड पुढे सरकत होता!उजेडाच्या दिशेने हळूहळू पिवळसर तांबूस छटा दिसू लागली होती!क्षितिज जेथे टेकले आहे त्या धरतीतून प्रकाशमय लाल गोळा वर येत होता!त्या प्रकाशित गोळ्यांचं नाव होतं ज्ञानसूर्य!त्या प्रकाशित गोळ्यांचं नाव होतं प्रज्ञासूर्य!

अंधार पिटाळून प्रकाश देणारा सूर्य वर येत होता!तो दिवस होता १४एप्रिल!प्रकाशसूर्य वर वर येत होता!त्याच्या किरणांनी तिमिर दूर पळत निघालं होतं!प्रकाश सर्वदूर पसरत होता!त्याच्या तेजाने,प्रकाशाने अखंड विश्व प्रथमचं तेजळालं होतं!त्या ताऱ्याचं नाव होतं ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर!

क्रांतीसूर्य!विश्वरत्न!बोधिसत्व!भारतरत्न!भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार!महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे!आज १४एप्रिल आहे!उन्हाळ्याचें दिवस आहेत!भूमी तप्त झालेली आहे!गावाच्या वेशीतून प्रवेश करीत गावं,शहर,राज्य देश अन विदेशात ख्यातकीर्त झालेले महान व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत!

अस्पृश्य जातीचा शिक्का!गरिबीचा विशाल डोंगर उभा!जगण्याची भ्रातं!!समोर जातींची प्रचंड मोठी दरी 'आ' वासून उभी होती!शिक्षण घेतांना यातनामय जगणं!सर्व विपरीत परिस्थितीत राखेतून उंच भरारी घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील पहिले उदाहरण असावेत!स्वप्नांचं विश्व विस्तारित होतांना वेदनेच्या हुंकाराला जगण्याचं बळ येत असतं अशा वेळेस नवनिर्मितीचं दालन उघडतं असतं!त्या निर्मितीचे दिग्दर्शक,निर्माता अन रक्ताचं पाणी करून वास्तव भूमिका साकारणारे महान तत्वज्ञानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते!आज त्यांची जयंती आहे!

हजारो वर्षांनंतर अशा महान योग्याचा जन्म झाला होता!गरिबीत, अंध:श्रद्धेतं,लाचारीत,अर्धपोटी उपाशी,तिरस्कारयुक्त हीन नजरेतून आयुष्य वेचणाऱ्या अतिशूद्र, दलितांच्या,अस्पृशांच्याचं घरी जन्म घेणारा महाआत्मा त्यांच्याचं
उद्धारासाठी उभा राहतो!कडवी झुंज देत!अन्यायाला वाचा फोडीत ताठ मानेने उभे राहायला सांगणाऱ्या महामानवाचे नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर!

'शिक्षण हे वाघिणीच दूध आहे' असं ठणकावून सांगणाऱ्या बाबासाहेबांनी शिक्षण क्षेत्रात कष्टाने अभ्यास करून अनेक पदव्या मिळवल्या!शिक्षण अस्तित्वाची जाणीव करून देत असतं!ज्ञानसंपन्न होतं जगण्याचा मार्ग दाखवीत असतं!भारतातून शिक्षण पूर्ण करून विदेशात अतिशय हलाकीत शिक्षण पूर्ण करीत तेथील विद्यापीठात नावलौकिक मिळविला!

ज्ञानसंपन्न अनेक व्यक्ती अनेक क्षेत्रात आपलं भाग्य अजमावून पाहत असतात!भरपूर पैसा कमावून स्वतःपुरते जीवन जगत असतात!डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो विचार केला असता तर तें विदेशात कुठेतरी स्वतःपुरते जीवन आनंदाने जगू शकले असतें!अनेक डिग्र्या खिशात घेऊन हिंडणाऱ्या व्यक्तीस अजून काय हवं असतं!या महामानवाने अत्यंत दरिद्री अन
व्यस्थेने नाकारलेल्या स्वतःच्या समाजासाठी आपलं जीवन अर्पित केलें होते!त्यांना शिक्षण नावाचं बाळकडू पाजित उभे करीत राहिले!

वंचित समाजाला न्याय मिळविण्यासाठी आयुषभर झटणाऱ्या या महामानवाने समतेचा, प्रज्ञाशिलतेचा,शिक्षणाचा मंत्र दिला होता!शिका,संघटित व्हा अन संघर्षातून समाजाची खऱ्या अर्थाने मुक्तता होईल असें तें म्हणत!त्या प्रमाणे वंचित समाज जागृत झाला आणि सामाजिक,आर्थिक आणि राजकीय क्रांतीला दिशा दिली होती!

कष्ट, मेहनत,शिक्षण,संघर्षांशिवाय दास्यत्वातून खरी मुक्ती मिळणार नाही म्हणून अवडबरं,जुन्या परंपरांचा विरोध करीत नवीन मार्ग शोधला त्या मार्गाचं नाव होतं बुद्धमार्ग!वैज्ञानिक रचनेवर उभा असलेला हा बुद्धाचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला!मार्ग बदलला होता पण जीवन समर्पण तेचं होतं बुद्ध वंदना!अशा धम्माचा अंगीकार करणाऱ्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञा सूर्य कित्येक शतकांनंतर या भारतात उगवला होता!अंधःकारात खितपत पडलेल्या वंचित समाजासं अन्यायापासून, दस्यात्वातून मुक्त करून थांबला!

गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतीराव फुले यांना गुरु मानणाऱ्या भारताचा लखलखणारा तारा प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३२वी जयंती!कधी कधी साम्य असतं!भाग्यनें तें साम्य उदयास येत असतं!डॉक्टर बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती ११एप्रि ची आहे!१९६वी जयंती आहे!दोघेही भर उन्हाळ्यात जन्मले!अन दोघेही क्रांतीसूर्य-प्रज्ञासूर्य होऊन
समाज उद्धाराचं आभाळवून विशाल कार्य केलें!🌹

प्रत्येक गोष्टीच शिल्प तयार होतं असतं!डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार होते!आज ज्यांच्या घटनेप्रमाणे भारत वाटचाल करीत आहे अशा महामानवास!विश्वमानवास प्रज्ञासूर्यास!बोधीसत्वास त्यांच्या १३२व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतो!चरणावरती हृदयातल्या श्रद्धेनें माथा टेकवतो!
       🌹जयभिम🌷
**************************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
**************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२८५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१४एप्रिल २०२३
  (१३२वी जयंतीनिमित्त)

गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

घटनेचे शिल्पकार..…घटनेचे शिल्पकारकोटी कुळांचे दातार ।भिमजींचे उपकारझाले आम्हांवर फार ।।

घटनेचे शिल्पकार..…



घटनेचे शिल्पकार
कोटी कुळांचे दातार ।
भिमजींचे उपकार
झाले आम्हांवर फार ।।

घेतो लेखणी हातात
भाग्य माझे पुस्तकात ।
होतो आम्ही अंधारात
आता आलो प्रकाशात ।।

खुले तळे चवदार
मुक्त आमचे विचार ।
प्राप्त झाले अधिकार 
नाही कोणीच लाचार ।।

ज्ञानरुपी तलवार
मिटविते अहंकार ।
नाही मनात विकार
त्यांनी दिले सुविचार ।।

विश्व करतो स्तवन
त्यांना शतदा नमन ।
नित्य करुनी वाचन
ज्ञान करतो जतन ।।

©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७

मी ज्योतीराव फुले बोलतो आहे नानाभाऊ माळी मी कोण होतो? काय होतो? मी कुणासाठी झिजलो?आयुष्यभर लढलो!समर्पित भावनेने लढलो!नेटाने लढलो!गावाबाहेर,वेशीबाहेर कुत्र्यासारखे जीवन जगणाऱ्या माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी लढलो!दीन-दु:खी अतिशूद्र भावंडांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढलो!..लढतं झुंजलो!झिजलो कधी माघार घेतली नाही!

मी ज्योतीराव फुले बोलतो आहे
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
************************
...नानाभाऊ माळी 
मी कोण होतो? काय होतो? मी कुणासाठी झिजलो?आयुष्यभर लढलो!समर्पित भावनेने लढलो!नेटाने लढलो!गावाबाहेर,
वेशीबाहेर कुत्र्यासारखे जीवन जगणाऱ्या माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी लढलो!दीन-दु:खी अतिशूद्र भावंडांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढलो!..लढतं झुंजलो!झिजलो कधी माघार घेतली नाही!
माझा मार्ग सत्याचा होता!माझा मार्ग न्यायाचा होता!माझा मार्ग अज्ञानी बांधवांना ज्ञानी करण्याचा होता!स्त्री मनात ज्ञानप्रकाश दाखविण्याचं भाग्य मिळालं!अतिशद्रांच्या दारात उभे राहून ज्ञानसूर्य दाखविण्याचं महाभाग्य लाभलं!जातीभेदाच्या पायावर उभा असलेला वर्ग शिक्षणापासून वंचित होता!त्यांनां ज्ञानी करण्याचं भाग्य निर्मिकाणे मला दिलें होते!अथकपणे कष्ट, झुंज, हक्काची लढाई लढत राहिलो!

...मी ज्योतीराव गोविंदराव फुले बोलतो आहे!मी महात्मा फुले बोलतो आहे!मी पुण्यातल्या गंज पेठेतील ज्योतीराव फुले बोलतो आहे!मी कर्मठांच्या पुणे शहरातील फुले बोलतो आहे!सर्व काही सहन करूनही जिद्दीने,ताट मानेनें उभा असलेला मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!...वर्षे कशी भरा भरा मागे निघून गेलीत!!इतिहासाची अनेक महत्वपूर्ण पाने उलटूनी गेलेतं!काही पाने जीर्ण झालीत!शिर्ण झालीत!१७५वर्षं झाली आहेत!इतिहास त्याचं जीर्ण पानातून जीवंत आहे!अजून शोषण जीवंत आहे!शोषणाची पद्धत त्या ठेकेदारांनी बदलली आहे!लढा सुरूच आहे!जातीयवाद अजूनही जीवंत आहे!स्वार्थ अजूनही धर्माच्या आड जीवंत आहे!तुमच्या शक्तीतून माझा लढा सुरूचं आहे!मी महात्मा फुले बोलतो आहे!

जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती माणूस म्हणून जगावा!जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती न्याय हक्काने जगावा!शोषण विरहित जगावा!जगा अन जगू द्या सारखं जगावं!जातीच्या भक्कम भिंती फोडून,तोडून माणूस म्हणून जगावा!उच-निचता समाजाला लागलेली किड आहे,ती गाडून जगावा!वर्णभेदानें फोफावलेंली किड आहे, ती गाडून जगावा!प्राचीन काळापासून समस्त समाजास पोखरत राहिलेंली वाळवी आहे, ती नष्ट करून जगावा!किडेचा नायनाट व्हावा म्हणून माझा लढा होता!लढा आहे!..मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

आज ११एप्रिल!माझा जन्मदिवस आहे!आपण माझा जन्मदिवस साजरा करीत आहात!जन्मापासूनचं शेती आणि फुलांची आवड होती!वडिलांचा व्यवसाय होता!वडिलांनी मला शाळेत पाठवलं होतं!मी शाळेत गेलो!काही वर्ग शिकलो!"शूद्रानां शिकण्याचा अधिकार नाही!पाप लागतं"..असं माझ्या वडिलांनां धर्माच्या ठेकेदारांनी सांगितले!शिक्षणाचा उजेड खालच्या स्तरापर्यंत पर्यंत पोहचू दिला नाही!शिक्षणाची दरवाजे बंदिस्त होती!यामुळे मी ही उच्च शिक्षणापासून वंचित राहिलो!उच-नीच,जातीयवादी,भेदाभेदनें मन व्याकुळ झालं होतं!संपूर्ण मानव समाजास यां धर्म ठेकेदारांनी वेठीस ठेवले होते!शिक्षणापासून वंचित ठेवले होते!माझ्यातील शिक्षणाची धग शमली नव्हती!राखेंखालीलं विस्तवागतं धग होती!..सर्वप्रथम माझ्या पत्नीला,सावित्रीबाईंना शिकविले!ज्ञानदानाचा प्रकाश घरात प्रकाशित झाला!त्याचा उजेड समस्त महिलांना पोहचविण्याचे कार्य मी आणि सावित्रीबाईंच्या अथक परिश्रमाने केलें!नवनवीन शाळा उघडून ज्ञानप्रकाश स्त्री मनात पोहचवीला!समस्यां अनेक होत्या!जाणूनबुजून खोडा घातला जात होता!अडथळे येत होती!तोंड देत,मार्ग काढीत ध्येयांकडे वाटचाल सुरूच होती!माझ्या भावा बहिणींनो मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

आपण माझी जयंती साजरी करीत आहात!जन्मोत्सव साजरा करीत आहात!गावोगावी मिरवणूक काढून माझ्या कार्यास उजाळा देत आहात!सत्यशोधकी विचार,सत्यधर्माच प्रसार आपण केलात!आम्ही त्या काळी खऱ्या धर्माची,माणसातील माणुसकीची ओळख करून दिली! ती ज्योत माझ्या सर्व बांधवांनी तेवत ठेवली होती!स्त्री शिक्षणाच्या पेटवलेल्या ज्योतीतून अथकपणे शुद्रादि शुद्रांसाठीचा ज्ञानप्रकाश पोहचत होता"अंधश्रद्धे विरुद्ध लढत होतो!समाजावर धर्ममार्तंडांचां प्रचंड पगडा होता!अस्पृश्य वेशी बाहेर होते!हीन जीवन जगत होते!माणूस मुक्तीचा लढा सुरूचं होता!आज त्या कार्यास १७५ वर्षे झाली आहेत!लढा सुरूच आहे!आज आपण लोकशाहीतं जगत आहात!नवे वारे वहात आहेत!नव्या वाऱ्यातही जातीभेदाच प्रदूषण हळूहळू विष बनून फैलावत आहे!... मला अतीव दुःख होत आहे!जातीभेदाच्या भिंती अजूनही तशाच उभ्या आहेत!जातीच्या नावावर राजकारण होतं आहे!धर्माच्या नावाने राजकारण होत आहे!आधुनिक जगात वावरत असूनही जातीभेदाच्या भिंती ढसाळल्या नाहीत अजून!... मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!

धर्माच्या आडून स्वार्थ साधला जात आहे!शिक्षणाने उच्च शिक्षित होऊन ही जात आडवी येत आहे!अजूनही जातीच्या भक्कम जोखंडातून समाज मोकळा झालेला नाही!माझा त्यावेळेसही मानसिक छळ झाला होता!त्रास दिला गेला होता!मी धाडसाने सामोरा जात राहिलो!आज ही तेचं घडतं आहे!जातीभेदाची दरी वाढते आहे!जातीनिर्मूलन झालेचं नाही पण जातीयवादी शक्ती उघड उघड आव्हान देत आहेत!स्त्री-पुरुष समानता अजूनही आलेली नाही!फक्त कागदावर आलेली आहे!तोच कागद वादळात अधांतरी उडत आहे!जातीयवाद अन वर्गवादाचा अजगर ठेकेदारांकडून पोसला जात आहे!.....मी महात्मा फुले बोलतो आहे!🌹

माझं स्वप्न होतं!माझी मागणी होती!माणसाला माणूस बनवायचं होतं!जातीविरहित समाज नजरेसमोर होता!स्वातंत्र्य,बंधुता, समानता, समता,समरसतेवर आधारित समाज रचना असावी असं माझं स्वप्न होत!न्याय हक्कासाठी माझा लढा होता!माणूस कुणाचा गुलाम नाहीये!माणूस जन्माने शूद्र, अतिशूद्र असला म्हणजे श्रेष्ठ नाही का?शिक्षणाने तो सर्व श्रेष्ठ ठरतो!माझा लढा शेतकऱ्यांच्या दरिद्री, दैन्यवस्थेसाठी होता!माझा लढा सत्य शोधनाचा होता!माझा लढा शिक्षणासापासून वंचित असलेल्या स्रि्यांसाठी होता!माझा लढा परित्यक्तां महिलांच्या भवितव्यासाठी होता!शूद्रादिशूद्रांच्या उन्नतीसाठी होता!माझा लढा वर्णभेद,जातीभेद उच्च-कनिष्ठ भेदभाव अन अन्याया विरुद्ध होता!माझा लढा दीन-दुबळ्यांच्या उद्धारासाठी होता!माझा लढा धर्ममार्तंडांच्या अन्यायी कृती विरोधात होता!मी लढत होतो!भांडत होतो!अजूनही लढा संपलेला नाहीये!माझा शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशूद्रांच्या दास्यमुक्तीसाठीचा लढा चालूचं ठेवला होता!समानतेचा हक्क, शिक्षणाच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची हाक दिली होती!... मी 
मी संघर्ष केला होता!सावित्रीबाईची साथ होती!सर्वजन साथीला होते!सर्व पद दलितांची साथ होती!आजही माझं स्वप्न अधुरे आहे!अपूर्ण आहे!मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌷

पदोपदी माझा अपमान होत राहिला! उच्चवर्निंयांच्या मिरवणुकीतून बाहेर काढण्यात आलें!माझ्यावर मारेकरू धाडले होते!सावित्रीबाईवरं सतत शेण,चिखल फेक होत राहिली!अन्याय सहन करीत स्त्री शिक्षणकार्य नेटाने सुरूच होतं!अतिशूद्र, सोषितांच्या हक्कासाठी माझा लढा होता!माझ्या घरचा हौद खुला केला होता!त्यांची तहान भागली होती!!माझ्या हृदयातली तहान भागली होती!मी शूद्र होतो!तें अतिशूद्र होते!दोघेही शोषित होतो!दोन्ही एकाचं पातळीवर होतो!माझं काय चुकलं होतं?? मी समस्त शोषित वर्गासाठी लढा उभारला होता!मूठभर स्वार्थ, ज्ञानी समजणाऱ्यांनी माझा कोंडमारा केला होता!माझं जगणं समर्पित होतं!हा माझा गुन्हा होता? प्राचीन जुनाट,खुळंचट परंपरेच्या अभेद्य भिंतीनां सुरुंग लावला होता!एक एक करीत त्या भक्कम भिंती ढासळू लागल्या होत्या!भगदाड पडायला लागले होते!सत्यशोधक समाजाचा सत्य दाखवणारा हा उजेड होता!मी महात्मा फुले बोलतो आहे!🌹

अंधश्रद्धेतं लिप्त ढोंगी धर्म ठेकेदार देवतांची भीती दाखवून लुटमार करत होते!त्यांना सामोरे जात सत्याचा लढा सतत सुरूच होता!माझा लढा खुळचट कर्मकांडाविरुद्ध होता!धर्मविरुद्ध नव्हता!माझा लढा वर्ण आणि वर्गवादाविरुद्ध होता!आम्ही घाबरलो नाही,डागमगलो नाही!सामाजिक न्यायाचा लढा अखंड सुरूच होता!शिक्षणाने माणूस ज्ञानी होतो!ज्ञाननिर्मितीचं केंद्र आमच्याचं घरात होतं!शिक्षण घराघरात पोहचवंत होतो!स्त्री-पुरुष शिकत होते!शुद्रादि अतिशूद्र शिकत होते! ज्ञानकण वेचित ज्ञान प्रकाशात न्हावून निघतं होते!माझा लढा अज्ञानी,दीन-दुबळयांच्या उद्धारासाठी होता!मानसिक जोखंडा पासून मुक्तीसाठी होता!सत्याचा लढा अखंड चालूच ठेवला होता!नंतर ही न्याय हक्कासाठी लढा सुरूचं आहे! शोषित सामाजिक समानतेपर्यंत पोहचत नाहीत तोवर हा लढा सुरूचं राहणार आहे!..मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

माझा लढा मानव उद्धारासाठी होता!धार्मिक अवडंबर विरोधात होता!गावाच्या वेशीबाहेरील शोषितांसाठीचं होता!अस्पृशांसाठीच होता!स्त्री शिक्षणासाठीचं होता!पोटासाठी लाचार असणाऱ्या शुद्रादी अतिशद्रांसाठी,पोटग्रस्तांसाठी होता!कुत्र्यापेक्षाही हिन जगणं ज्यांच्या वाट्याला आलं त्यांच्या हक्कांसाठी होता!हा वर्ग संघर्ष होता!हा वर्ण संघर्ष होता!धर्माच्यां निश्चित अर्थासाठी होता!माणूस पशु नाही!माणूस गुलामही नाही!माणसाला बुद्धी आहे!वाचा आहे!तो गुलाम कसा होऊ शकतो?माणूस जन्माने श्रेष्ठ नाही!माणूस कर्माने श्रेष्ठ आहे!माझा लढा अन्यायी रूढी विरोधात होता!तो विरोध तुमच्या रूपातून अजूनही जीवंत आहे!समान न्यायासाठीचा हा लढा अजूनही जीवंत आहे!आपण जातीभेदाच्या भिंतीनां धडका देत रहा!माणसाच्या मानसिक वेठीबिगारी अन गुलामी पासून मुक्ती मिळेल तेव्हांचं खरं स्वातंत्र्य नजरेस दिसेल!माझा लढा हा तुमच्यातून उभा आहे!मी तुमच्यात उभा आहे!तुम्ही लढत रहा!.. मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

सत्याचा आग्रह धरून चालतांना "सत्यशोधक समाजाची" स्थापना केली!शोषित वर्गाला न्याय मिळावा म्हणून २४सप्टेंबर १८७३साली पुणे नगरपालिकेचा सदस्य झालो होतो!सार्वजनिक सत्यधर्म पुजाविधी पुस्तक असं अशा अनेक आधुनिक मूल्यांचां प्रारंभ केला होता!आधुनिक क्रांतिची मशाल घेऊन पुढे निघालो आहोत!माझा लढा मानवतावादी दृष्टिकोनासाठी होता! माझा कार्यगौरव म्हणून "महात्मा" पदवीनें सार्वजनिक ठिकाणी गौरविण्यात आल होत!रात्रंदिवस फक्त आणि फक्त शोषितांच्या जगण्यासाठीचा लढा उभारला होता!बालहत्या प्रतिबंधक गृह सुरुवात केली होती!अनेक रात्रशाळा सुरु केल्या होत्या!"ब्राम्हनांचे कसब" पुस्तकातून माझा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट केला होता!माझा लढा आर्थिक उन्नतीसाठी होता!माझा लढा सामाजिक न्यायासाठी होता!स्रिशिक्षणासाठी हंटर कमिशन समोर निवेदन देण्याचा आग्रह होता!"तृतीयरत्न" हे नाटक, "इशारा","अस्पृशांची कैफियत" ग्रंथातून मांडली होती!माझा लढा थांबलेला नाहीये!पुढे असाच समाजाच्या उन्नतीसाठी चालू राहील!तुमच्या कृतीतून चालू राहील!माझा लढा थांबलेला नाहीये अजून!सामाजिक क्रांतीची मशाल घेऊन लढा सुरूचं राहणार आहे!"🌹

जन्माने उच्च अन श्रेष्ठ समजणारे मूठभर ठेकेदार विशाल सागरासं ओंजळीत घेऊ शकत नाहीत!खुळचट धर्म कल्पनांनी जन्माने श्रेष्ठत्व लादू शकत नाहीत!आपण परिपूर्ण ज्ञान समृद्धीने समानतेचा पाया रचत आहात!त्यातूनचं शास्वत सत्यधर्माचा जन्म होतं राहील!उचनीच भेदभाव विरहित माणसाचा जन्म होतं राहील!सत्यासाठी माझा लढा होता!माझा लढा जोखंडापासून मुक्तीचा होता!संपूर्ण परिवर्तनाचा होता!माझा लढा कष्टाळू शेतकऱ्यांसाठी होता!माझी लेखणी न्यायासाठी आक्रमक झाली होती!मी लिहीत होतो!मी तसाचं कृती करीत होतो!मी ताठपणे उभा होतो!माझ्या विरुद्ध अनेक होते!मी विरोधाला जुमानित नव्हतो!माझा लढा स्त्री दास्य मुक्तीसाठी होता!अजूनही त्याच सत्याची वाट पाहत मी उभा आहे!अनेक पुतळ्यातून आपणास उमेदीचा संदेश देत उभा आहे!माझा पुतळा अंधारातून उजेड दाखवत उभा आहे!सामाजिक क्रांतीची मशाल होऊन अनेक ठिकाणी, अनेक शहरात,खेड्यात उभा आहे!तेथे पूर्ण सत्याचा उजेड असेल!वाट पाहत आहे!मी महात्मा ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

सत्य दर्शनासाठी "शेतकऱ्याचा आसूड" लिहावा लागला!अमेरिकेतील शोषित निग्रो बांधवांच्या छळानें "गुलामगिरी"लिहावं लागलं! हा ग्रंथ निग्रो बांधवाना अर्पित केला होता!महाराष्ट्र शूर,धाडसी,लढाऊंचा देश आहे!छत्रपती शिवाजी राजांवर माझी नितांत श्रद्धा होती!रायगडा वरील समाधी शोधली अन पोवाडा लिहून शौर्याची गाथा माझ्या हृदयातून गात राहिलो!... मी महात्मा फुले बोलतो आहे!🌹

************************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-११एप्रिल २०२३

अहिराणी अभंग रामना पहारे अभंग वनमाला पाटील जालना काशी कन्या लिव्हस काव्य संग्रह

रामना पहारे {अभंग}


रामना पहारे । दाटी व वसनी ।
पांधी बुंजायनी । वावरनी॥१॥

सुरू जया दिन । सारजा मायना ।
सडा गोतमाना । आंगलम्हा॥२॥

वना वासुदेव । दे सुपड भर ।
मायना बिल्लोर । हात भरी॥३॥

खोपाम्हान उठे । चिडी नी कोकीय।
दये भवजाय । लोकवान ॥४॥
 
जोत्याम्हान गाय । पाजे का-हडले ।
राजा सरजाले । टाक खोंडे॥५॥

पिसन वसले । हिवज पानेस्ले।
न्हावाड झाडेस्ले । चारीमेर॥६॥

तापीनी ती थडे। डोंगरनी आंगे।
पैरे भांगेभांगे । तो आबीर॥७॥

टाक तुयशीले । रांझनमा पानी ।
काने काकडानी । घंटा वाजे॥८॥

सुवासीन उठी । भारी आचपय।
चुल्हाना धुक्कय । डोयाम्हान ॥९॥

माहेरनी याद । हिरदम्हा गाना ।
भाऊ तो पाव्हना । हाड्या सांगे॥१०॥

राम पहारन । चाले कीरतन ।
भारी आवसान । भूईवर ॥११॥

कितल कौतीक । नारायन तुन्ह।
घर भरे मन्ह । उजायान॥१२॥

इठू रोज सक्ती । कथाइन देस।
गया कालदिस । नवा वुना॥१३॥

वनू इनवन्या । करे हात जोडी। 
भक्तीनी बी गोडी । लाइस बा ॥१४॥

 वनमाला पाटील जालना 
काशी कन्या लिव्हस काव्य संग्रह

ज्योतिबांचा अनुयायी म्हणवुन घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणु शकतो की मीच तेवढा खरा आज ज्योतिबांना एकनिष्ट राहिलो आहे. आणि मला अशी खात्री आहे की या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला. त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी ज्योतिबांचे धोरण, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे

"ज्योतिबांचा अनुयायी म्हणवुन घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणु शकतो की मीच तेवढा खरा आज ज्योतिबांना एकनिष्ट राहिलो आहे. आणि मला अशी खात्री आहे की या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला. त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी ज्योतिबांचे धोरण, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे."


- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, 

(नाशिक येथील भाषण, "जनता" ०८/१२/१९५१)

पोटातील भूक दिलीप पाटील कापडणेदुपारचे बारा वाजले होते.नुकताच शाळेतून घरी आलो होतो.आईला म्हटलं वाड मला जेवायला दे गंआई म्हणाली थांब बाळा,मी आताच गरम गरम टाकून देते...!

पोटातील भूक
 दि.१०/४/२०२३
✍️ दिलीप पाटील कापडणे
दुपारचे बारा वाजले होते.
नुकताच शाळेतून घरी आलो होतो.
आईला म्हटलं वाड मला जेवायला दे गं
आई म्हणाली थांब बाळा,
मी आताच गरम गरम टाकून देते...!

घरात बघते तर काय,
डब्यात पिठच नाही.
आई इकडे तिकडे हा डबा, 
तो डबा पाहू लागली.
आईकडे मी एकसारखा बघत होतो.
भूक माझ्या पोटात मावत नव्हती.
आई माझ्या करता‌ किलवाण्या
करत होती.
काय करावं काहीच सुचत नव्हतं.
आई दोन तीन घरी पिठा साठी फिरली ...?

कोणी दिलं नाही हो तशीच,
आई माझी माघारी आली.
आईचा तो नाराज चेहरा, 
बघुन पोटातील भूक पळाली.
आईच्या कमरेला मी बिलगलो,
आईला म्हटलं मला भूक नाही गं...?

मी नाही जेवणार आई,
मी आता नाही मागणार 
दोघं एकमेंकाकडे बघत होतो.
रडू‌‌ आवरले जात नव्हतं.
आई कुरवाळत होती.
मायेने डोक्यावरं‌ हात‌ फिरवात होती.
डोळ्यात अश्रू ‌मावत नव्हते.
खरंच भाकरी साठी तिची, तळमळ दिसली मला.
अशी ‌आई नाही जगात तिचे उपकार नाही फिटणार.
 कवी.दिलीप हिरामण पाटील
        कापडणे ता जि धुळे
        मो.नं.९६७३३८९८७३

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...