गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

हरेक धर्म समता शिकाडी जास, ते शिक्षनथून समजी उमजी येस याकरता आख्खास्ना करता जीवन प्रवास करनारा दैवत अहिराणी लेख

हरेक धर्म समता शिकाडी जास, ते शिक्षनथून समजी उमजी येस याकरता आख्खास्ना करता जीवन प्रवास करनारा दैवत
गरजवान, न्याय, हक्क, समता, ममतासंगे वास्तव शास्त्र, प्रथा परंपरा सांगत दीन हिन यासना नी मायमाऊलीस्ना उत्कर्षासाठे अनेक तरास सहीन करीन *समता* करता रोखठोक ज्ञान आमृत देनारा..
हरेक धर्म, जातपात पंथ करता आयुष्यभर लोके खराकरता जागृत करीन आख्खा देश समाज करता *माणुसकीनी पयेरनी* करनारा, छत्रपती शिवाजी महाराज यासले आदरस्थानी मानं, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यास्नी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यासले आदरस्थानी मानं सत्यशोधक, निर्भीड, स्पष्टवक्ता, जरासा इच्यार करा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आनी क्रांतीसुर्य यास्नी काय काय उपकार आपलावर करेल शेत..
जर त्या नही ऱ्हातात ते इच्यार करासारखी गोट शे.
आज स्मरन आदरथुन त्यासनं संगे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील 
 यासनाभी कार्य कामनी, सर्व समाज एकतानी उत्कर्षनी कायपात, एकी नेकीनी याद करानी शे,
 गरीबफाईन श्रीमंत लगून अशक्य ते शक्य कराकरता कैक मानापमान सहीन करीन खराखाती जीवन अमर करी जानारा
 *दैवत परमपूज्य युगप्रवर्तक तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यासना जयंती निमित्त विनम्र अभिवादन आनी कोटी कोटी वंदन आजभी आनी हायातीभर*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

बाबरी नक्की कोणी पाडल? लेखक बापुसाहेब हटकर

🕌⛏️🕌⛏️🕌⛏️🕌⛏️
बाबरी नक्की कोणी पाडल?
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
       (हां लेख निव्वळ काल्पनिक आहे. लोकांच निखळ मनोरंजन करावं म्हणून लिहिलेला एक ललित लेख आहे. याचा सत्य घटनेशी काही संबंध नाही)

            सध्या दुरदर्शनवर एक चर्चा जोरात सुरु आहे. बाबरी आम्ही पाडली, तुम्ही नाही पाडली असा वाद जोरात सुरु आहे. त्याबद्दल असं सांगता येईल की, बाबरी पाडली या घटनेत तीन घटक होते. एक भाजप कार्यकर्ते, दोन शिव सेना आणि तिसरा घटक कोणत्याही पक्षासी संबंध नसलेले हिंदुत्ववादी असलेला कार सेवक होता. त्यात विश्व हिंदू परिषद, बजरंगदल वगैरे संघटना होत्या. या गर्दीत भाजपचे लोक भाजपचे नेते आदेश देत होते तसें चालत होते. शिव सेनेचे लोकही आपले नेते आदेश देतील तसें कृती करत होते. पण तिसरा जो घटक होता हिंदुत्ववादी कारसेवक हे मोकाट सुटले होते. त्यांना आदेश देणारा कोणीच नव्हतं. हे लोक अनिर्बंध धावत होते. हीं गर्दी बाबरीचा ढाचा जमेल तिथे तोडत होता. मुख्य घुमटावर हीं गर्दी चढली घुमट पाडला त्यासोबतच घुमटा वरील लोक खाली कोसळले. त्यातील दोघांच्या गळ्यात शिव सेनेचे गमचे होते. लोकांनी या दोघांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली. त्यांचा सत्कार करू म्हणत होते. पण हे दोघे वीर भयंकर संतापले होते. ते जोराजोरात ओरडून काही तरी सांगत होते. पण त्या कोलाहलात ते काय बोलत होते ते कळत नव्हतं. गोंधळ कमी झाला तेंव्हा नीट कान देऊन ऐकल्यावर कळलं. ते दोघ ओरडून सांगत होते. तों सत्कार बित्कार घाला तिकडे चुलीत आधी हे सांगा आम्हाला घुमटा वर फेकलं कोणी? नीट चौकशी केल्यावर खरी परिस्थिती कळली.
       भाजप मुळात चतुर लोकांचा पक्ष आहे. भाजप सेनेचे लोक एकाच वेळी बाबरी जवळ पोहचले. आता पुढे काय? नी:पक्ष कारसेवक मात्र तीनही घुमटावर चढून ढाचा पाडत होते. इकडे भाजपाचे कार्यकर्ते आपसात खलबत करत होते.
पहिला-ते बघ दोघ उभे आहेत.
दुसरा-शिवसेनेचा गमचा गळ्यात अडकवलेले?
पहिला-हां ते दोघे.
तिसरा-बरं काय करायचं त्यांच?
पहिला-आपण सर्व मिळून त्यांना अलगद उचलून घुमटावर फेकायचं.
चौथा-त्याच्यानें काय होईल?
पहिला-ते वर जाऊन बाबरी पाडतील.
पाचवा-म्हणजे आपलं काम बिन बोभाट पार पडेल.
पहिला-आणि पोलीस आले तर कारवाई त्यांच्यावर होईल.
सातवा-हां म्हणजे त्यांच्या गळ्यातील गमच्या मुळे ते ओळखले जातील.
आठ-आणि आपण सुरक्षित निसटून जायचं.
           ठरल्या प्रमाणे सर्वांनी मिळून त्या दोघां गमचा धारिना उचलून घुमटावर फेकलं. वरती नि:पक्ष कारसेवाकानी घुमट पाडत आणला होता. जसं हे गमचाधारी घुमटा वर आदळले त्याच क्षणी घुमट खाली कोसळला. सर्व लोक धावले. त्या दोघांना उचलून खांद्यावर घेतलं. घोषणा सुरु झाल्या. त्यात काही लोक म्हणाले यांचा सत्कार करू त्यावेळी हे दोघे जीवाच्या अकांताने ओरडत होते. तों तुमचा सत्कार घाला चुलीत. आधी सांगा आम्हाला घुमटा वर कोणी फेकलं?
🕌⛏️🙏🏻⛏️🕌 बापू हटकर
🕌⛏️🕌⛏️🕌⛏️🕌⛏️

एकलव्य आणि द्रोणाचार्य लेखक बापुसाहेब हटकर

🏹🦌🏹🦌🏹🦌🏹🦌
     एकलव्य आणि द्रोणाचार्य       
➿➿➿➿➿➿➿➿
                 
       द्रोणाचार्य प्रचंड प्रतिभान शिक्षक पण त्याचं वेळी परिस्थिने गांजलेला सामान्य माणूस होता. सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत असं म्हणतात आणि ते खरही आहे. पण नशिबाने साथ दिली आणि या विद्याधर द्रोणाला लक्ष्मीधर भीष्मानी आश्रय दिला हां आश्रय टिकावा म्हणून द्रोणाचार्यानी एकलव्याचा विश्वासघात केला. त्याचा अंगठा कापून घेतला. अंगठ्या विना धनुष्य वापरताच येत नाही. पण एकलव्या सारखे प्रतिभावान माणसं नदीच्या उफाळणाऱ्या प्रवाहा सारखे असतात. हां प्रवाह कोणी कसाहीं आडवीला तर त्याला अडवून ठेवता येत नाही. हां लोंढा आपली वाट स्वतः तयार करतो.
         गुरुकुलात प्रवेश नाकारला म्हणून एकलव्य रडत बसला नाही. त्याने पर्याय शोधला. तों स्वयंभू धनुर्धर झाला. त्याचं श्रेय त्याने गुरुद्रोणाचार्य यांना दिलं. द्रोणाचार्य यांनी अंगठा कापून घेतला इथेही तों रडत बसला नाही. येईल त्या परिस्थिवर मात करत विजयी ध्वज फडकवत ठेवणाऱ्या पैकी तों एक होता. यावरही त्यांनी मात केली. अंगठा गेला म्हणून काय झाले? चार बोट तर शिल्लक आहेत. या चार बोटांच्या सहाय्याने त्याने सरावं सुरु केला आणि त्यातून एक नवं तंत्र शोधून काढण्यात तों यशस्वी झाला. अंगठा नसलेला धनुर्धर पुन्हा ब्रह्माण्डातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. ज्याला पाहून प्रत्येक्ष श्रीकृष्णाला भीती वाटली.
       या प्रसंगातील अंगठा कापून दिला हीं कथा एक कथा आहे आणि त्यावर मात करण्याची एकलव्याची दुर्दम्य इच्छा आहे आणि हेच जास्त महत्वाचे आहे. पण यातील अंगठा कापून घेणं हे जेवढ रंगवून सांगतात, तेवढं एकलव्याची जिद्द सांगितली जातं नाही. खरं तर त्याने अडचणीत कशी मात केलं हे तरुणांना सांगण अती महत्वाचे असतें. 
        बिहार उत्तरप्रदेश यांच्या मध्ये कुठेतरी पुराण काळातील शृंगबेर नावाचे निषाद राज्य होते. बिहारचे पुराण काळातील नाव मगधदेश होते . या मगधचा सम्राट जरासंघ होता. त्याचा एकलव्य अंकित राजा होता.
           महाभारतात नल दमयंती तुम्हाला माहीत आहेत. यातील दमयंती विदर्भ राजा भीम याची कन्या होती तर निषाद देशाचा राजा विरसेन याचा पुत्र नल होता. कुठे होता हां नल विरसेनाचा निषाद देश?
           दक्षिण खांदेशात बागलान तालुका आहे. या त्यालुक्यात नलकसं नावाच एक छोटंसं गाव आहे. या गावांत जगातील नलदमयंतीचं एकमेव मंदिर आहे. नलकसं गावा जवळ कंसारा डोंगर आहे. या कंसारा मधील कसं शब्द आणि नल हे नाव घेऊन नलकस नाव तयार झालं. म्हणजे बागलान हां परिसरही निषाध देश असू शकतो. बागलान, डाँग, साक्री, नंदुरबार, तोरणमाळ, शिरपूर ते थेट बऱ्हाणपूर पर्यंतच्या डोंगरी पट्यात मोठ्या प्रमाणात आदिवाशी वस्ती आहे. हां सर्व भाग म्हणजे निषाद देश असावा. याच निषाद देशाचा राजा एकलव्य होता. या एकलव्य परिवाराच्या मनात द्रोणाचार्य आणि त्यांच्या परिवारा बद्दल शेवट पर्यंत नितांत प्रेम आणि आदर होता.
         महाभारत युद्धा पूर्वीच जरासंघा सोबत झालेल्या युद्धात श्रीकृष्णानें एकलव्याचा वध केला होता. हां राग एकलव्य पुत्र केतूमानच्या मनात होता. महाभारत युद्धात केतूमान याने कौरावांच्या बाजूने भाग घेतला होता. तोही बापासारखा पराक्रमी होता. कुरुक्षेत्रात उतरताच त्याने पांडव सेनेची दाणादाण उडवून दिली. त्याला रोकायला भीम त्याचं सैन्य घेऊन पुढे आला. पण केतूमानला भीमालाहीं आवरता येत नव्हता. तेंव्हा भीमाने त्याचा बुद्धी भेद करण्याचा प्रयत्न केला,
भीम-अरे केतूमान चूक करतोयस तू. तू द्रोणाचार्याची मदत करत आहेस. अरे हे तेच द्रोणाचार्य आहेत, ज्यांनी तुझ्या वडिलांना गुरुकुलात प्रवेश नाकारला. एकलव्याने स्वकष्टाने धनुरविद्या प्राप्त केली तर त्याचा अंगठा कापून घेतला. आमच्या सोबत ये. आपण मिळून द्रोणाचार्याचा वध करू. सूड घे सूड. 
केतूमान-नाही द्रोणाचार्य आमचे आदर्श आहेत. माझ्या पित्याचे गुरु म्हणजे माझे ते गुरुमह आहेत. मला माझ्या बाबांची हत्या करानाऱ्या कृष्णाची हत्या करायची आहे. आणि त्या दोघांत घनघोर युद्ध सुरु झाले. केतूमानला वीरगती प्राप्त झाली.
        केतू्मानंचा पुत्र तोरणमाळच्या गादीवर बसला. महाभारत युद्ध संपलं. चिरंजीव पण रक्तबंबाळ अश्वत्थाम्याला घेऊन केतूमान पुत्र तोरणमाळ येथे घेऊन गेला. त्याच्या जखमा धुतल्या. त्यावर औषध उपचार केले. आपल्या राज्यात त्याला दोन जहागीर्या भेट म्हणून दिल्या. पहिली जहागिरी म्हणजे तळोदा तालुक्यातील अस्तंबा डोंगर परिसर, दुसरी जहागिरी अशीर गड. या दोन्ही ठिकाणी आजही अश्वत्थामा लोकांना आढळतो म्हणतात. डोंगरात कोणी वाट चुकला तर त्याला वाट दाखवितो. वर्षातून एकदा अस्तंबा डोंगरावंर अश्वत्थाम्याची यात्रा भरते. या यात्रेला आदिवाशी बांधव मोठ्या संख्येने येतात. आपल्या राजाचा गुरुपुत्र अश्वत्थामा त्याच्या बद्दल आस्था, प्रेम, आदर आणि निष्ठा व्यक्त करायला येतात. अस्तंबा म्हणजे आदिवाशी भाषेत अश्वत्थामा.
          अशी हीं भारतीय संस्कृतीतील गुरु परंपरा आहे. इथे देवापेक्षाही गुरुचे स्थान मोठे आहे.
*गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवे महेश्वरा!*
*गुरुर साक्षात परर ब्रह्म तस्मै: श्री गुरवे नम:!*
कबीर जीं तर म्हणतात,
*गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय!*
*बलिहारी जाऊ गुरु अपने जो गोविंद दियो बताय!*
      गुरु आणि गोविंद हे एकाच वेळी माझ्या समोर प्रकट झाले तर मी आधी गुरुला शरण जाईल. कारण माझी आणि ईश्वराची ओळख नव्हती. ती ओळख गुरूने करून दिली आहे.
        शीख पंथात गुरु शिवाय ईतर कोणालाच महत्व नाही. गुरुसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शिख बांधवांच्या कथा इतिहासाच्या पानां पानांवर लिहिल्या आहेत. हीं भारतीय परंपरा आहे. ती एक लव्य आणि त्याच्या परिवारानें पाळली आहे. पिढ्यानं पिढ्या पाळाली आहे.
         अंगठा कापून घेण्याचा प्रसंग हे पापच आहे पण त्या घटनेचा गैरफायदा घेत हिंदू द्वेष्टे लोक, भिल्ल बांधवाना हिंदू पासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे घातक आहे. हिंदू संपला की राष्ट्र संपत. मी आधी सांगितलंच आहे. हीं फूट पाडण्याच काम हिंदूच करत आहेत. सावधान!
           स्त्रियां वरील आत्याचारा बाबत बोलू पुढच्या भागात.
क्रमश:
🏹🦌🙏🏻🦌🏹 बापू हटकर
🏹🦌🏹🦌🏹🦌🏹🦌

मराठी कविता पार गेलास बुडूनी कवियत्री सौ मंगला मधुकर रोकडे

÷÷÷पार गेलास बुडूनी÷÷÷
पैसा रुपया नि नाणी
सारी आम्ही बनवूनी
गेली कल्पित लक्षुमी
         श्रेय आमुचे घेऊनी॥धृ॥
झाला कागद रुपया
नाणी बनली धातूंनी
दाग दागिने बनले
     अति मौलिक धातूंनी॥१॥
अलंकार बनविले
स्वर्ण कारांनी श्रमुनी
मुर्ख आम्हा बनविले
    लक्ष्मी यांस संबोधुनी॥२॥
कलावंत झाले शुद्र
देवी लक्ष्मीस स्मरुनी
जन्मदाते खरेखुरे
   हिचे आम्हीच असुनी॥३॥
गृह लक्ष्मीला ठेविले
दासी पायाची म्हणुनी
गुण तिचे ना कुणीही
      देखियले पारखुनी॥४॥
श्रम झाले श्रमिकांचे
लक्ष्मी झाली केरसुणी
आम्ही श्रमही आमुचे 
    लक्ष्मी राहिलो बनुनी॥५॥
कधी पाहशी माणसा
दोन्ही डोळे उघडूनी
तूच तुझ्याच देशात
       पार गेलास बुडूनी॥६॥
     --निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव. 
 दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
÷÷÷÷÷÷÷÷  ÷÷÷÷÷÷÷÷÷  ÷÷÷÷÷÷÷÷

स्त्री सती विधवा व शीलभ्रष्ट ईश्वर एकच आहे असा सांगणारा एकमेव धर्म फक्त हिंदू धर्म आहे

👩🏻‍🦱👱🏻‍♀️👵🏻👩🏻‍🦱👱🏻‍♀️👵🏻👩🏻‍🦱👱🏻‍♀️
  स्त्री, सती, विधवा व शीलभ्रष्ट
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
               
         मी आधीच सांगितले आहे की, जगातील उत्तम, उदात्त धर्म कोणता असेल तर तों आहे हिंदू धर्म, जगातील सर्व धर्म समान आहेत, ईश्वर एकच आहे असा सांगणारा एकमेव धर्म फक्त हिंदू धर्म आहे. तों कसा महान हे मी पुढे सांगणारच आहे. पण हां धर्म रूढी वाल्यानी बदनाम केला. त्याच्या वर समर्थ उत्तर देणारा कोणी समोर येत नव्हता म्हणून तों बदनाम झाला होता. त्यातील अनेक खोट्या आरोपातील एक आरोप म्हणजे हिंदू धर्मात स्त्री स्वातंत्र्य नाही हां एक आरोप आहे.
        स्त्री जन्माची कथा हीं शोषणाची कथा आहे. अगदी देव, धर्म, नियम, कायदे, संस्कार तयार होण्या आधी पासून आणि माणूस व समाज जन्माला येण्या आधी पासूनची हीं शोषण कथा आहे. माणूस जेंव्हा जनावर होता तेंव्हा पासूनची हीं गोष्ट आहे.
          निसर्गातील सजीव सृष्टीत प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत एक समान धागा आहे तों म्हणजे शारीरिक दृष्ट्या नर हां मादी पेक्षा बलवान असतो. या बलाढ्य असण्या पासूनच शोषणाला सुरवात होते.
*माणसाला माणूस खाई इथे दुबळ्यांची धडगत नाही.*
         पुढे माणूस जन्मला, समाज तयार झाला, देव आला, धर्म आला, कायदा आला, न्याय संस्था उभ्या राहिल्या तरी स्त्री हीं दुबळीच राहिली. आणि पुरुषी संस्कृती तीच शोषण करत राहील. हां प्रकार प्रत्येक देशात, धर्मात आणि संस्कृतीत आहे. अनेक वर्ष हे शोषण सुरु राहिले. त्यात हळू हळू बदल होतं गेले. पाश्चात्य जगात बरीच वर्ष स्त्रियाना मताचा अधिकार नव्हता. आजही 57 इस्लामिक देशात स्त्रियांना संपूर्ण अंग झाकून लपवून फिराव लागतं. तिथे स्त्रीनें नख दखविणेही हराम आहे.
         तशीच पूर्वीच्या काळी हिंदू धर्मातील स्त्रियावर हीं काही बंधने होती. ती लोक रूढीतून तयार झाली होती. त्याचा देव धर्माशी काहीही संबंध नाही.
*सतीप्रथा*-स्त्रिया नवऱ्याच्या प्रेता बरोबर चितेवर स्वतःला जिवंत जाळून घेत असत. हीं अत्यंत अघोरीं आणि अमानुष प्रथा होती. पण याला धर्माचे कोणतेही अनुष्ठान नाही. तसेच सती जाणे हे बंधन नसून ती ज्याची त्याची ऐच्छीकं बाब होती. यात कोणतीही जबरदस्ती नव्हती.
         दशरथ राजाच्या तीन बायका होत्या त्यातील एकही राणी सती गेली नाही. पंडुराजाच्या दोन बायका होत्या. कुंती आणि माद्री. यातील माद्री सती गेली कुंती गेली नाही. अलीकडे जिजामाता या सती गेल्या नाहीत. छ शिवाजी राजाच्या 8 राण्या होत्या. त्यापैकी सईबाई महाराजा आधीच वारल्या होत्या. सात राण्यापैकी एकट्या पुतळाबाई सती गेल्या. ईतर सहा राण्या सती गेल्या नाहीत. पेशव्यांच्या एक रमा बाई फक्त सती गेल्या. पेशव्याची ईतर कोणीही स्त्री सती गेली नाही. होळकराच्या अहिल्यादेवी सती गेल्या नाहीत.
*सती कोण स्त्रिया जातं होत्या?*
         सती जाणे हीं प्रथा ऐच्छीकं तर होतीचं पण ती फक्त उच्चं वर्णीय, राजे महाराजे अती श्रीमंत लोकांत हीं प्रथा होती. हां वर्ग समाजात जेम तेम 5% चं होता. ईतर 95% च्या वर बहुजन स्त्रिया सती जातं नव्हत्या. 5% समाजातील स्त्रिया फक्त सती जातं होत्या आणि त्याही सरसकट नाही. स्वेच्छेनें जातं असत. जबरदस्ती नाही. असं असलं तरी, हे प्रमाण अत्यल्प असलं तरी स्त्रिया सती जातं होत्या ते अघोरीं कृत्य होते त्याला धर्माची मान्यता नव्हती. पुढे राजाराम मोहन रॉय यांनी लॉर्ड बेंटिंग या भारतीय गव्हर्नर जनरला सांगून हीं प्रथा बंद पाडली. सती जाणे हां कायद्याने गुन्हा ठरविला गेला. हिंदू कोड बिला नंतर तर हिंदू धर्मात कोणतीही अनिष्ट प्रथा पाळने गुन्हा आहे.
        दुसरं अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, विधवा विवाह. आता सर्व जातीत विधवा विवाह होतं आहेत. पूर्वी काही उच्चं जाती आणि श्रीमंत घराणी बाल विधवांचं लग्न लावून देत नव्हते. पण आता यात सुधारणा झाली आहे.
        याच एक आदर्श उदाहरणं सांगतो. खांदेशात कुणबी पाटील हीं एक प्रतिष्ठित समाज आहे. आता ते स्वतःला मराठे म्हणवून घेतात. यांचे पूर्वी वाडे माड्या, भरपूर शेतीवाडी असायची यांच्यात एखादी 7/8 वर्षाची बालिका विधवा झाली तर ती मरे पर्यंत माहेरी रहायची. तिला तीच दुःख कळू नये म्हणून तिला खूप मानपान देत. घरातील सर्व आर्थिक व्यवहार तिच्या हातात देत. पण आता हे बदलल आहे.
        स्व उत्तमराव नाना पाटील वाघळीकर असेच उच्चं कुलीन. ते राज्याचे मोठे मंत्रिही होते. त्यांचा मुलगा रस्ता अपघातात वारला. त्याला एक मुलगी होती 7/8 महिन्याची पत्नी फक्त 21 वर्षाची. शिक्षण 11 पर्यंत. हीं विधवा उत्तम नानाची सून. तिच माहेरही तसंच प्रतिष्ठित. तिचे भाऊ दौलतराव आहेर हेही मंत्री होते. उत्तमराव नानानी या सुनेला परत महाविद्यालयात घातली. तिला पदवीधर केली. नंतर एका बँकेत नोकरी लावली. आणि सुनेचं लग्न एका चांगल्या संस्कारीत मुलांशी लावून दिलं. सून नाही म्हणत होती. पण सासऱ्याने समजवल बाळ तुझं वय खूप कमी आहे. आमच्या म्हाताऱ्याचं काय आज आहे तर उद्या नाही. आणि कन्यादान स्वतः सासू सासर्यांनी करून दिलं. म्हणाले पोरी तुझं हे सासर आज पासून तुझं माहेर झालं. तुला आठवण आली तर कधीही येत जा माहेरी. चार दिवस माहेरचा पाहूनचार घेऊन, क्षीण घालवून पुन्हा सासरी जातं जा. माझी नातं. तू तिची आई आहेस. आम्ही तिला तीच लग्न होई पर्यंत सांभाळू. पण तुला वाटेल तेंव्हा तुझ्या लेकीला घेऊन जातं जा.
        यांचा आदर्श घेऊन अनेक लोक आता विधवा घाटोस्फ़ोटीत मुलेंची लग्न लावून देत आहे. ईतर जातीत तर सुरवाती पासून पुनर्विवाह होतं होतेच. पण ज्या जातीत विधवा विवाह होतं नव्हते त्याला देव धर्म जबाबदार नाही. रूढी वाले जबाबदार आहेत. स्वतः प्रभू राम आणि श्रीकृष्णानी असे विवाह लावून दिले आहेत.
        रामानें वालीची विधवा पत्नी तारा हिचा सुग्रीवसी पुनर्विवाह लावून दिला. रावणाच्या मृत्यू नंतर रामानेंच मंदोदरीचा विवाह बिभीषणाशी लावून दिला. महाभारतात दुर्याधनाची विधवा पत्नी भानुमती हिचा विवाह श्रीकृष्णानें अर्जुनाशी लावून दिला होता. म्हणजे हिंदू धर्मात विधवा विवाह होतं होते. बहुजन वर्गातील इतर सर्व जातीत विधवा विवाह होतं होते. त्याला पाट लावणे किंवा गंधर्व लावणे म्हणतं होते. खोट्या प्रतिषठे साठी लोकांनी विधवा विवाह बंद केले आणि बदनाम धर्म झाला.
खुदा तुने बी क्या खूब दुनिया बनाई हैं
बेगुनाह सजा काट रहे हैं और गुनहगार बा-इज्जत बरी हैं!
पुढच्या भागात बघू स्त्री शील भ्रष्ट असतें का?
क्रमश:
👩🏻‍🦱👱🏻‍♀️🙏🏻👵🏻👩🏻‍🦱 बापू हटकर
👩🏻‍🦱👱🏻‍♀️👵🏻👩🏻‍🦱👱🏻‍♀️👵🏻👩🏻‍🦱👱🏻‍♀️

मराठी कविता कधी नावास जागशी कवियत्री सौ मंगला मधुकर रोकडे

🌾📖🌾कधी नावास जागशी🌾📖🌾
अवेळीच पावसारे 
ढग तुझे गडगडे
नको तेंव्हा नको तसे
         उगा टाकतोस सडे॥धृ॥
ऐन परिक्षा काळात
कसे वाचावेत धडे
तुझ्या गडगडण्यानं
         लक्ष त्यातूनही उडे॥१॥
तुझ्या असल्या येण्यानं
बळी संकटात पडे
हाती आलेल्या पिकाची
         बघ धुळधाण उडे॥२॥
नको वाजवू उगाच
गडगड चे चौघडे
नको इथे तिथे टाकू
       अवकाळी तुझे सडे॥३॥
नाव पर्जंन्यराजा हे
आम्ही दिले तुला बडे
कधी नावास तुझिया 
       सांग जागशिल गडे॥४॥
      --निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं. ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव. 
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३. 
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

डॉ.बाबासाहेब तुमच्यालेखनीने केली कमालसंविधान लिहून तुम्हीउडवून दिली हो धमाल

डॉ.बाबासाहेब अंबेडकर
 दि.१३/४/२०२३

डॉ.बाबासाहेब तुमच्या
लेखनीने केली कमाल
संविधान लिहून तुम्ही
उडवून दिली हो धमाल..!

कायदा कानूनचे महत्व
पटवून दिले गरीब जनतेला
कोणी वंचित राहू नका 
हे ज्ञान सांगितले समाजाला..!

भारतीय राज्यघटना चे
तुम्हीच खरे शिल्पकार
लिहून ठेवले पुस्तकात
आमचे हे सारे अधिकार..!

आता कोणी नाही लाचार
आजवर होते अंधारात
खुले केली मंदिर गावतळे
आणले सर्वांना प्रकाशात..!


कवी.दिलीप हिरामण पाटील
       कापडणे ता जि धुळे
       मो.नं.९६७३३८९८७३

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...