÷÷÷पार गेलास बुडूनी÷÷÷
पैसा रुपया नि नाणी
सारी आम्ही बनवूनी
गेली कल्पित लक्षुमी
श्रेय आमुचे घेऊनी॥धृ॥
झाला कागद रुपया
नाणी बनली धातूंनी
दाग दागिने बनले
अति मौलिक धातूंनी॥१॥
अलंकार बनविले
स्वर्ण कारांनी श्रमुनी
मुर्ख आम्हा बनविले
लक्ष्मी यांस संबोधुनी॥२॥
कलावंत झाले शुद्र
देवी लक्ष्मीस स्मरुनी
जन्मदाते खरेखुरे
हिचे आम्हीच असुनी॥३॥
गृह लक्ष्मीला ठेविले
दासी पायाची म्हणुनी
गुण तिचे ना कुणीही
देखियले पारखुनी॥४॥
श्रम झाले श्रमिकांचे
लक्ष्मी झाली केरसुणी
आम्ही श्रमही आमुचे
लक्ष्मी राहिलो बनुनी॥५॥
कधी पाहशी माणसा
दोन्ही डोळे उघडूनी
तूच तुझ्याच देशात
पार गेलास बुडूनी॥६॥
--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
÷÷÷÷÷÷÷÷ ÷÷÷÷÷÷÷÷÷ ÷÷÷÷÷÷÷÷
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा