एकलव्य आणि द्रोणाचार्य
➿➿➿➿➿➿➿➿
द्रोणाचार्य प्रचंड प्रतिभान शिक्षक पण त्याचं वेळी परिस्थिने गांजलेला सामान्य माणूस होता. सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत असं म्हणतात आणि ते खरही आहे. पण नशिबाने साथ दिली आणि या विद्याधर द्रोणाला लक्ष्मीधर भीष्मानी आश्रय दिला हां आश्रय टिकावा म्हणून द्रोणाचार्यानी एकलव्याचा विश्वासघात केला. त्याचा अंगठा कापून घेतला. अंगठ्या विना धनुष्य वापरताच येत नाही. पण एकलव्या सारखे प्रतिभावान माणसं नदीच्या उफाळणाऱ्या प्रवाहा सारखे असतात. हां प्रवाह कोणी कसाहीं आडवीला तर त्याला अडवून ठेवता येत नाही. हां लोंढा आपली वाट स्वतः तयार करतो.
गुरुकुलात प्रवेश नाकारला म्हणून एकलव्य रडत बसला नाही. त्याने पर्याय शोधला. तों स्वयंभू धनुर्धर झाला. त्याचं श्रेय त्याने गुरुद्रोणाचार्य यांना दिलं. द्रोणाचार्य यांनी अंगठा कापून घेतला इथेही तों रडत बसला नाही. येईल त्या परिस्थिवर मात करत विजयी ध्वज फडकवत ठेवणाऱ्या पैकी तों एक होता. यावरही त्यांनी मात केली. अंगठा गेला म्हणून काय झाले? चार बोट तर शिल्लक आहेत. या चार बोटांच्या सहाय्याने त्याने सरावं सुरु केला आणि त्यातून एक नवं तंत्र शोधून काढण्यात तों यशस्वी झाला. अंगठा नसलेला धनुर्धर पुन्हा ब्रह्माण्डातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. ज्याला पाहून प्रत्येक्ष श्रीकृष्णाला भीती वाटली.
या प्रसंगातील अंगठा कापून दिला हीं कथा एक कथा आहे आणि त्यावर मात करण्याची एकलव्याची दुर्दम्य इच्छा आहे आणि हेच जास्त महत्वाचे आहे. पण यातील अंगठा कापून घेणं हे जेवढ रंगवून सांगतात, तेवढं एकलव्याची जिद्द सांगितली जातं नाही. खरं तर त्याने अडचणीत कशी मात केलं हे तरुणांना सांगण अती महत्वाचे असतें.
बिहार उत्तरप्रदेश यांच्या मध्ये कुठेतरी पुराण काळातील शृंगबेर नावाचे निषाद राज्य होते. बिहारचे पुराण काळातील नाव मगधदेश होते . या मगधचा सम्राट जरासंघ होता. त्याचा एकलव्य अंकित राजा होता.
महाभारतात नल दमयंती तुम्हाला माहीत आहेत. यातील दमयंती विदर्भ राजा भीम याची कन्या होती तर निषाद देशाचा राजा विरसेन याचा पुत्र नल होता. कुठे होता हां नल विरसेनाचा निषाद देश?
दक्षिण खांदेशात बागलान तालुका आहे. या त्यालुक्यात नलकसं नावाच एक छोटंसं गाव आहे. या गावांत जगातील नलदमयंतीचं एकमेव मंदिर आहे. नलकसं गावा जवळ कंसारा डोंगर आहे. या कंसारा मधील कसं शब्द आणि नल हे नाव घेऊन नलकस नाव तयार झालं. म्हणजे बागलान हां परिसरही निषाध देश असू शकतो. बागलान, डाँग, साक्री, नंदुरबार, तोरणमाळ, शिरपूर ते थेट बऱ्हाणपूर पर्यंतच्या डोंगरी पट्यात मोठ्या प्रमाणात आदिवाशी वस्ती आहे. हां सर्व भाग म्हणजे निषाद देश असावा. याच निषाद देशाचा राजा एकलव्य होता. या एकलव्य परिवाराच्या मनात द्रोणाचार्य आणि त्यांच्या परिवारा बद्दल शेवट पर्यंत नितांत प्रेम आणि आदर होता.
महाभारत युद्धा पूर्वीच जरासंघा सोबत झालेल्या युद्धात श्रीकृष्णानें एकलव्याचा वध केला होता. हां राग एकलव्य पुत्र केतूमानच्या मनात होता. महाभारत युद्धात केतूमान याने कौरावांच्या बाजूने भाग घेतला होता. तोही बापासारखा पराक्रमी होता. कुरुक्षेत्रात उतरताच त्याने पांडव सेनेची दाणादाण उडवून दिली. त्याला रोकायला भीम त्याचं सैन्य घेऊन पुढे आला. पण केतूमानला भीमालाहीं आवरता येत नव्हता. तेंव्हा भीमाने त्याचा बुद्धी भेद करण्याचा प्रयत्न केला,
भीम-अरे केतूमान चूक करतोयस तू. तू द्रोणाचार्याची मदत करत आहेस. अरे हे तेच द्रोणाचार्य आहेत, ज्यांनी तुझ्या वडिलांना गुरुकुलात प्रवेश नाकारला. एकलव्याने स्वकष्टाने धनुरविद्या प्राप्त केली तर त्याचा अंगठा कापून घेतला. आमच्या सोबत ये. आपण मिळून द्रोणाचार्याचा वध करू. सूड घे सूड.
केतूमान-नाही द्रोणाचार्य आमचे आदर्श आहेत. माझ्या पित्याचे गुरु म्हणजे माझे ते गुरुमह आहेत. मला माझ्या बाबांची हत्या करानाऱ्या कृष्णाची हत्या करायची आहे. आणि त्या दोघांत घनघोर युद्ध सुरु झाले. केतूमानला वीरगती प्राप्त झाली.
केतू्मानंचा पुत्र तोरणमाळच्या गादीवर बसला. महाभारत युद्ध संपलं. चिरंजीव पण रक्तबंबाळ अश्वत्थाम्याला घेऊन केतूमान पुत्र तोरणमाळ येथे घेऊन गेला. त्याच्या जखमा धुतल्या. त्यावर औषध उपचार केले. आपल्या राज्यात त्याला दोन जहागीर्या भेट म्हणून दिल्या. पहिली जहागिरी म्हणजे तळोदा तालुक्यातील अस्तंबा डोंगर परिसर, दुसरी जहागिरी अशीर गड. या दोन्ही ठिकाणी आजही अश्वत्थामा लोकांना आढळतो म्हणतात. डोंगरात कोणी वाट चुकला तर त्याला वाट दाखवितो. वर्षातून एकदा अस्तंबा डोंगरावंर अश्वत्थाम्याची यात्रा भरते. या यात्रेला आदिवाशी बांधव मोठ्या संख्येने येतात. आपल्या राजाचा गुरुपुत्र अश्वत्थामा त्याच्या बद्दल आस्था, प्रेम, आदर आणि निष्ठा व्यक्त करायला येतात. अस्तंबा म्हणजे आदिवाशी भाषेत अश्वत्थामा.
अशी हीं भारतीय संस्कृतीतील गुरु परंपरा आहे. इथे देवापेक्षाही गुरुचे स्थान मोठे आहे.
*गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवे महेश्वरा!*
*गुरुर साक्षात परर ब्रह्म तस्मै: श्री गुरवे नम:!*
कबीर जीं तर म्हणतात,
*गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय!*
*बलिहारी जाऊ गुरु अपने जो गोविंद दियो बताय!*
गुरु आणि गोविंद हे एकाच वेळी माझ्या समोर प्रकट झाले तर मी आधी गुरुला शरण जाईल. कारण माझी आणि ईश्वराची ओळख नव्हती. ती ओळख गुरूने करून दिली आहे.
शीख पंथात गुरु शिवाय ईतर कोणालाच महत्व नाही. गुरुसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शिख बांधवांच्या कथा इतिहासाच्या पानां पानांवर लिहिल्या आहेत. हीं भारतीय परंपरा आहे. ती एक लव्य आणि त्याच्या परिवारानें पाळली आहे. पिढ्यानं पिढ्या पाळाली आहे.
अंगठा कापून घेण्याचा प्रसंग हे पापच आहे पण त्या घटनेचा गैरफायदा घेत हिंदू द्वेष्टे लोक, भिल्ल बांधवाना हिंदू पासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे घातक आहे. हिंदू संपला की राष्ट्र संपत. मी आधी सांगितलंच आहे. हीं फूट पाडण्याच काम हिंदूच करत आहेत. सावधान!
स्त्रियां वरील आत्याचारा बाबत बोलू पुढच्या भागात.
क्रमश:
🏹🦌🙏🏻🦌🏹 बापू हटकर
🏹🦌🏹🦌🏹🦌🏹🦌
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा