गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

बाबरी नक्की कोणी पाडल? लेखक बापुसाहेब हटकर

🕌⛏️🕌⛏️🕌⛏️🕌⛏️
बाबरी नक्की कोणी पाडल?
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
       (हां लेख निव्वळ काल्पनिक आहे. लोकांच निखळ मनोरंजन करावं म्हणून लिहिलेला एक ललित लेख आहे. याचा सत्य घटनेशी काही संबंध नाही)

            सध्या दुरदर्शनवर एक चर्चा जोरात सुरु आहे. बाबरी आम्ही पाडली, तुम्ही नाही पाडली असा वाद जोरात सुरु आहे. त्याबद्दल असं सांगता येईल की, बाबरी पाडली या घटनेत तीन घटक होते. एक भाजप कार्यकर्ते, दोन शिव सेना आणि तिसरा घटक कोणत्याही पक्षासी संबंध नसलेले हिंदुत्ववादी असलेला कार सेवक होता. त्यात विश्व हिंदू परिषद, बजरंगदल वगैरे संघटना होत्या. या गर्दीत भाजपचे लोक भाजपचे नेते आदेश देत होते तसें चालत होते. शिव सेनेचे लोकही आपले नेते आदेश देतील तसें कृती करत होते. पण तिसरा जो घटक होता हिंदुत्ववादी कारसेवक हे मोकाट सुटले होते. त्यांना आदेश देणारा कोणीच नव्हतं. हे लोक अनिर्बंध धावत होते. हीं गर्दी बाबरीचा ढाचा जमेल तिथे तोडत होता. मुख्य घुमटावर हीं गर्दी चढली घुमट पाडला त्यासोबतच घुमटा वरील लोक खाली कोसळले. त्यातील दोघांच्या गळ्यात शिव सेनेचे गमचे होते. लोकांनी या दोघांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली. त्यांचा सत्कार करू म्हणत होते. पण हे दोघे वीर भयंकर संतापले होते. ते जोराजोरात ओरडून काही तरी सांगत होते. पण त्या कोलाहलात ते काय बोलत होते ते कळत नव्हतं. गोंधळ कमी झाला तेंव्हा नीट कान देऊन ऐकल्यावर कळलं. ते दोघ ओरडून सांगत होते. तों सत्कार बित्कार घाला तिकडे चुलीत आधी हे सांगा आम्हाला घुमटा वर फेकलं कोणी? नीट चौकशी केल्यावर खरी परिस्थिती कळली.
       भाजप मुळात चतुर लोकांचा पक्ष आहे. भाजप सेनेचे लोक एकाच वेळी बाबरी जवळ पोहचले. आता पुढे काय? नी:पक्ष कारसेवक मात्र तीनही घुमटावर चढून ढाचा पाडत होते. इकडे भाजपाचे कार्यकर्ते आपसात खलबत करत होते.
पहिला-ते बघ दोघ उभे आहेत.
दुसरा-शिवसेनेचा गमचा गळ्यात अडकवलेले?
पहिला-हां ते दोघे.
तिसरा-बरं काय करायचं त्यांच?
पहिला-आपण सर्व मिळून त्यांना अलगद उचलून घुमटावर फेकायचं.
चौथा-त्याच्यानें काय होईल?
पहिला-ते वर जाऊन बाबरी पाडतील.
पाचवा-म्हणजे आपलं काम बिन बोभाट पार पडेल.
पहिला-आणि पोलीस आले तर कारवाई त्यांच्यावर होईल.
सातवा-हां म्हणजे त्यांच्या गळ्यातील गमच्या मुळे ते ओळखले जातील.
आठ-आणि आपण सुरक्षित निसटून जायचं.
           ठरल्या प्रमाणे सर्वांनी मिळून त्या दोघां गमचा धारिना उचलून घुमटावर फेकलं. वरती नि:पक्ष कारसेवाकानी घुमट पाडत आणला होता. जसं हे गमचाधारी घुमटा वर आदळले त्याच क्षणी घुमट खाली कोसळला. सर्व लोक धावले. त्या दोघांना उचलून खांद्यावर घेतलं. घोषणा सुरु झाल्या. त्यात काही लोक म्हणाले यांचा सत्कार करू त्यावेळी हे दोघे जीवाच्या अकांताने ओरडत होते. तों तुमचा सत्कार घाला चुलीत. आधी सांगा आम्हाला घुमटा वर कोणी फेकलं?
🕌⛏️🙏🏻⛏️🕌 बापू हटकर
🕌⛏️🕌⛏️🕌⛏️🕌⛏️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...