अवेळीच पावसारे
ढग तुझे गडगडे
नको तेंव्हा नको तसे
उगा टाकतोस सडे॥धृ॥
ऐन परिक्षा काळात
कसे वाचावेत धडे
तुझ्या गडगडण्यानं
लक्ष त्यातूनही उडे॥१॥
तुझ्या असल्या येण्यानं
बळी संकटात पडे
हाती आलेल्या पिकाची
बघ धुळधाण उडे॥२॥
नको वाजवू उगाच
गडगड चे चौघडे
नको इथे तिथे टाकू
अवकाळी तुझे सडे॥३॥
नाव पर्जंन्यराजा हे
आम्ही दिले तुला बडे
कधी नावास तुझिया
सांग जागशिल गडे॥४॥
--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं. ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा