गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

अहिराणी कविता शापित कवी देवदत्त बोरसे

😢 शापित..😢

दोन डोळास्न धरन
गयं भरी,कोठे सांडू ?
वल्ला दुष्काळी मननी
वेथा कोनपन मांडू ?

बाप मांगे माय गयी
म्हनी शाळले मूकनू
भाऊ बहीन शिकाडी
बाप त्यास्ना मी बननू..!

भाऊ बहिन दोन्हीस्नी
घिदं सम्द बागायीत
नौकरीबी करी त्यास्नी
ठेवं मालेचं पडीत..!

नादारीना सौंसारात
व्हती घरवाली तरी
जल्म लेकरस्ले दीस्नी
तीबी गयी देवदारी..!

दुःख गिळीस्नी सगळं
आख्खी हयाती झिजनू
वाडे लायी पोऱ्या पोरी
माय त्यास्नी मी व्हयनू..!

पंख फुटताच चिडा
गांव सोडी उडनात
जल्मदाता ईसरीस्नी
शहेरमा रमनात..!

सोता रांधस भाकर
खास कोल्लावल्ला घास
कोना आधारनी आते
उरनीच नही आस..!

हात जोडीनी देवले
रोज मांगस मरन
देऊ नको माले कधी
आशी शापित जीवन..!

✍️कवी-देवदत्त बोरसे✍️
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.

बुधवार, १२ एप्रिल, २०२३

🌹शानी व्हय पोरी🌹

🌹शानी व्हय पोरी🌹
........................................
तुन्ही माय म्हनस रोजच माले
म्हने ढुंडी लया नवरदेव पोरले!!

तुन्हा नखरा दखिनी कायजी माले
तू आशी वागस,मी काय सांगू तुले

शानी व्हय पोरी,नको झित्रा कापू
मंग तुन्ह्या लगिनन्या पत्रिका छापू

मन्हा जीवले घोर,आलू गयाले दोर
घरमा वर तुन्हा मायना जोर!!

आत्ते करू मी काय?काय सांगू तुले
तू शांती व्हय पोरी,वरदेव ढुंडू दे माले
......... ✍️ रमेश महाले, शहादा

सोमवार, १० एप्रिल, २०२३

मन्ही कविता,मन्हा स्वास,मन्हा ध्यास माय माय तू आत्ते करी रहायना

🌿मन्ही कविता,मन्हा स्वास,मन्हा ध्यास🌿

🤨माय माय तू आत्ते करी रहायना.🤨.

[या रचनाले नासिकले बक्षित भेटेल से,तसच यक पुस्तकम्हा प्रकाशित व्हयेल शे बायाजा कविता संग्रोम्हा]

माय माय तू भाऊ आत्ते करी रहायना

जित्ता पने तू मायले हिंग लाये नयीना

बायकोना तालव्हर तू नंदी बैल व्हयी डोलेना

तिन्हा सिवाय तुन्ह पानबी हाले नयीना

तिन्ह आयकी तू मारक्या बैलना माइक मायकडे देखेना

तिन्हा कोंडमारा करी तू हालहाल करेना

मोठायकी दखाडा करता तू माय माय करी रहायना

पोटम्हा व्हथा तू तव्हय ती जीवले मारेना

खार,आल्न,आंबट,चिंबट खानं तिन्ही सोडी दिंथना

आत्ते तू तिन्हा नावन्या पितरीनी घाली रहायना

तव्हय ते तू मायले बलका बलका करता तरसायेना

ना खाता देवले निवत आत्ते उपेग व्हनार नयीना

म्हनून हातपाय जोडी इनंती तुम्हले मी करसना..

जलमभर मायबापनी करा सेवा,कमी पडाऊ नयीना

मरा नंतर मंदिर बांधी उपेग व्हवाऊ नयीना

आत्तेज इठ्ठल-रखमाई समजी सेवा तेस्नी कराना

सरगनं दार तुम्हले आपेआप खुली जाईना..

नयीते नरक तुम्हना ठयरेल जित्तापने समजी ल्याना

रचनाकार🙏

मझिसु✍️🌷प्राचार्य मगन सुर्यवंशी

सैसांज अहिराणी कवीता

सैसांज अहिराणी कवीता

दिन भर पोटसाठे 
पोटसाठे वनवन,
सरनात आठ तास
तासं सर तन मन.....

कुनबीन बांधे भारा 
भारा गोधनले टाका, 
शेतकरी राजा कशा 
कशा धरतीले वाका..... 

पाखरेस्नी किलकिल 
किलकिल करे चिडी,
दाना आना वाहिसन 
वाहिसन दे खावाडी.....

सूर्य  दिनना व राजा
राजा चाले दिन झाके,
त्याले निरोप जी देता 
देता शेंदूरज टाके.....

गोठाम्हान धन खूर 
खूर जशी वाजे टाया,
दिशे परतेक वाटे
वाटे काढ्यात रांगोयी.....

वना बागे बागे चांद 
धव्यी चांदन्यास्नी शाल,  
पारवर दिम्हयले
दिम्हयले गप्पा ताल..... 

इठायीना मंदिरात 
मंदिरात शिव,गन,
टायकरी रंगनात 
रंगनात जी भजन.....

माय लाये सांजवात
सांजवात तुयशीले,
खेतमया करे झोप
झोप रान गवतले.....

रांधे माय चुल्हावर
चुल्हावर भाकरले,
खाये चटमट जीभ 
जीभ गोडी त्या बट्टाले.....

खोय भरे आभायन 
आभायना भारी गुण,
वनी दुडकत रात 
रात दिन सुनसान.....

काशीकन्या पाटील जालना 
काशीकन्या काव्य संग्रह

काय दिन व्हतात त्या " .............................. " कारे वो भट्या ss ... पानी बीनी दखाडकारे ढोरेसले . . ?

" काय दिन व्हतात त्या " ..............................    " कारे वो भट्या ss ... पानी बीनी दखाडकारे ढोरेसले . . ?

 " दख ते ती पाल्लु कव्व्यसनी वरडी राहयनी . मायन्यान भो ह्या पोरेसनं काई खरं दखात नई .. दख ते रे .. दखरे भाऊ दख रे ss . " तिरमक आन्ना घरम्हाईनच वरडी राह्यंता ...                       खरच काय सोना सारखा दिन व्हतात हो त्या .. मायन्यान भो . मंडई हाई वरनन अवलोंग जुना धुय्यामा दखाले भेटे बरं . . ! मज जुनी गोट शे . . आमनं जुनं धुये म्हंजी एक खेडानाच भाग व्हता अशीच समजा तुमेन . आख्खा खेडाना संस्कार व्हतात आठे . जथा तथा बैलगाडा सोडेल राहेत . बठ्ठा शेतकरी लोके राहेत आठे . बैलेसले चारा ' कडबा टाकेल राहे आठे . बैले चारा खाता मान हालायेत घुंगरू घाट्यासना आवाज कानले मस्त वाटे . पन तुमीन कायबी म्हना असं मस्त वातावरन व्हतं ईचारू नका . आमना चौकमा दारपुढे तीन बैलगाड्या सोडेल राहेत . जथं तथं ढोरेसनं शेन ' शेनना पोहो ' त्यासनं मुतेल मातेल तो वास जसा नाकमा भेदाले करे . आमना दारसे शेनन्या पहुट्या जसं बये आट्यापाट्या खेयेतच चालनं पडे असंच समजा . बैलगाडा सोडेल राहेत . जुव्वारीना तोटा ' कडबा ' उसन्या चिवठ्या ' असामा एखादी गाय त्या बैलेसन्या मव्हरे चारामा तोंड घालाले लागनी का मंग तिरमक आप्पा वरडा शिवाय राहेच नई . " गावडी ss अय गावडी ' .. बये कथा गयात रे ' ईना पायनारना .. नई ते जीवान आपला गावरानीमा गायी टिकाडी टाके .                               झापाटामा बाया आडवर पानी भराले येत . आमना मांगना दार जुना आड व्हता . पानी मातर नित्तय काचना मायेक राहे बरं ! आडनं पानी दोर वरी व्हडानं नी तो कुरु कुरु असा आवाज झापाटामा त्या वखतले भलता कानले गोड लागे . आमले ती ऐकानी सवयच पडी गयथी . तवय नय नई व्हतात . कथा मथा राही जाये .                               काई बायासनी वावरेसमा जावानी तयारी राहे . डोकावर डालकं ' ... डालकामा धुडकामा भाकर ' तिखं ' कैरीनी चिरी गुंडायेल राहे . संगे इय्या ' वाव्हन्या डालकामा ' तुमी म्हंशात वाव्हन्या डालकामा ? मंडई कव्हढी मानमरातब व्हती . गावमा जेठा लोक राहेत . त्यासना समोर पायमा व्हावन्या घालीसन चालानं ? सरम लागे .. हाई व्हती आमनी संस्कृती मंडई .. दखी .. ? आत्तेसना पोरीसली पटाव नई . त्या बाया जाता जाता म्हनेत " चाल वं सकु ' घान पानीना वावरमा ' धोंडु तात्याना वावरमा . चाल वं थांबतीस आमीन . तुन मामलेबी धाडी देजो वं पोरी " ... तवय लंगा पोलकं घालेल पोरगी मायना संगे शेंगा येचाले । कपाशी येचाले निंदा खुपाले जायेत. तव्हढीच घरले दोन पैसानी मदत व्हई जाये . आन तवये कोठे पोरी शायमा जायेत हो ... थोडी चांगली दिखाली लागनी हात पिव्या करी टाकेत पोरना . संध्याकायले दिनमावतले बाया वावरेस म्हाईन बाया वावरेरम्हाईन घर येत . . . पन मंडई उन राहो की काय राहो पाय चट चट बयोत की काय व्हवोत पन पायन्या व्हावन्या मातर गावनी शिवार येताच डालकामा टाक्या मिचुक राहे नईत . आव्हढी मान मरातब व्हती मंडई . ह्या आम्हना जुना धुयाना संस्कार व्हतात . गावना जेठा लोके समोर वाव्हना घालीसन जावानी रित नई व्हती . मी मना डोया वरी दखेल शे . . आत्तेना पोरीसले पटी का हाई गोट ? नईच पटाव . डोकावरना पदर बी ढवू नई देत . खरच ह्या आमन्या चालीरिती संस्कार व्हतात . तवय सन उत्सवसले धूम राहे . चैत्र महिनामा झाडेसली नवी पालवी फुटे ' कोकिळा न कूजन चाले . पाट व्हाये . तवय आखाजीना सन राहे . माहेरले नुकत्याच लगीन व्हयेल पोरी खास आखाजीना करता माहेरले येत . तवय सनेसनी धूम राहे . पोर सासर मा दबीसन राहे . मन मोकये हसन खिदयनं दूरच राहे . मंग माहेर याना करताच लायेल राहास . आखाजी ले पोरी बोखलं सजाडेत . लाकुडनी गौराई मांडेत . गौराई ले फुलेसना हार नई चालेत . धनधान्य चांगल पिकायेल राहे . म्हनीसन शेंगासना ' बोरेसना हार ' टरबुजना बीय्या सना हार ' गोड शेवना हार ' रामफळ ना घड ' कैरीसना सिजन कैरीसना मोठ्ठा घड . अशी आमनी गौराई सजे . रोज मंग टीपर्‍या लिसन गाना म्हनेत . आमराईमा जायेत. गाना म्हनेत आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं " डोकावर तांब्या तठे गाना ' फुगड्या ' हसनं खिदयनं असं चाले . सासरनं दाबी ठेल मन माहेरी पोरी मनमोकळे पने खेयतीस . झोका खातीस .. मस्त मजा आनन मा त्या रमी जातीस . न्यारा न्यारा परकारना सन साजरी करतीस . सांजोऱ्या घरोघर लाटाईतीस . घरोघर बाया एकमेकले मदत करतीस .                          गावमा बारागाडा ' तगतराव ' धोंड्या कोंड्या भोकर बादली ना तमासा रातभर चाले . दिन उजाडा लोंग गम्मत चाले . गॅसबत्ती राहे . तवय कसाना लाऊड स्पीकर हो ?                                  सार सामान ना दिनमा एकमेकना वट्टावर भर दुपारे पाखरन्या शिय्या करू लागेत . उडीदना पापडे करू लागेत . पान्या पापडे ' कुरडाया ' वड्या बठ्ठ बठ्ठ करेत . पन सगया जमी जायेत. हिनी मिनी गुन्या गोविंदा सारसामान कराना कामे चालेत . हसी मज्याक ' थट्टा मस्करी खेचर मंग ते चालू च राहे . पापडेसनं पीठ घेरनारी एक स्पेशल बाई राहे . खरच सार सामान म्हंजी भलतं मंतरेल वातावरन राहे हो ...                               आते नका ईचारा . आते बठ्ठ रेडिमेड भेटाले लागनं . पन एकमेकना सामान करामा जो जिव्हाया तो नई दखाले भेटाव मंडई .                               आमना जुना धुर्याम्हाईन पाट व्हात जास . पाटमा पानी महामुर राहे . वावरेसमा गाडा कोथमेरे ना ' मेथीना भरी येत आनी पाटना पानीमा धोयेत . भाजीपाला ' मुया बठ्ठा या पानीमाच धोयेत . कोनीबी कोथमेरनी जुडी उचली लेत . पन कोनी एक सबद पन बोले नईत . गावना पाट वलांडा का थय लागे . मया लागे . आमराई लागे . बोरेसना झाडे ' आंबासना झाडे ' लागेत . अंबासना दिनमा कैऱ्या काय ते झाडवरना पिकेल सागा काय कोनी बी खाये कोनताच शेतकरी कोनले वरजे नई . . जामना (पेरू ) ना झाडे मनसोक्त झाडवरथीन जाम तोडी ल्या ' बोरे पिकेल बोरे पोट भरी खा ... हाई सुख आमीन तवय उपभोगेल शे मंडई . मस्त सारंग मा नित्तय पानी व्हाये . ते पानी पीसन आखो वरथीन ढेकर देवाना . काय दिन व्हतात त्या ?                                घरे मोठमोठाला राहेत पन माटीना ' धाबाना मांगना पुढना दारना राहेत अवडा चवडा घरे राहेत . कितला बी पाहुना येऊ द्या मुक्कामे . असा घरे व्हतात . वाडा राहेत . वाडासमा धान्यान्या कनग्या भरेल राहेत . जुव्वारी ' बाजरी महामुर राहे . पोताना पोता भरेल राहेत .                              समोरा समोर भित ले भीत घरे राहेत . कोना घरमा काय शिजी राहयनं हाई न इचारताच समजी जाये . याना घरनी पारोड्यासनी भाजी ' डबुकवड्यासनं बट्ट एकमेकना घर जावा शिवाय नई राहे . त्यामा एक प्रेम व्हतं मंडई जिव्हाया राहे . हाऊ तुमले कोठेच दखाले भेटाव नई बरं . ते आमना जुना धुय्यामाच दखाले भेटे .                             कोना घर लगीन राहे ते भट्टाकडे चुल्हाना निवता . पाच मांडोनी हयद ' नुसती धूम राहे . त्या लगीनना गाना ' रातभर बाया नाचेत . लगीन वालाले म्हनेत तु दूरच बस . आख्खी गल्लीनी मदत राहे . .                               हर एक सन साजरा करेत . बारा गाडा ' आसरासनं बोनं ' वीर काढानं ' मानता ' जावुय हाई आते बदल व्हत चालना . पोरी शिकाले लागन्यात . त्यासना क्लासेस ट्युशन ' कीक मारीका चालन्यात . आते कथाईन जातीन त्या गौरना पानीले . . गया तो काय . धाबाना घरे गयात . सिंमेटना बिल्डिंगा उभ्या राही राहन्यात . खैरनार आप्पान्या गटलु नी सिमेंटनी उच्ची बिल्डिंग बांधी ' मंग आम्हना वकीलनी बी उच्ची बिल्डिंग बांधी . चूरसच लागनी ' सिमेंटन जंगल सिमेंटना रस्ता . शाळाना पोरीसले आभ्यासले ये ते भेटाले जोयजे ना ? गयात त्या टिपरा नी गवराई डोकावर लिसन मयामा टिपरा खेवानं .                            मंडई गये . पुर्वी बाया आडनं पानी काढेत . पुंजा उखल्ला फेकेत ' निंदे ' खुपेत . वझा व्हायेत . जड घट्यावर दयेत. चुल्हा फुकेत . डोया मा धूर जाये . पन चष्मा कधी लागे नई . एव्हढा मेहनती कामे करेत तवय एक बी पी . ना गोयी लागे नई .                                 मंडई जमाना बदलना .                            कशा व्हत्यात तवय बाया आनी आत्तेना बाया ?                                

   एस मंग मंडई ...                            राम .. राम ...                          
 विश्राम बिरारी .                             9552074343 .     .         .

सासरनी याद भारी

सासरनी याद भारी

आस्स सासर मज्यान
वठे गिरनाना थडे
बैलगाड जुपीसन 
जैठ घेवालेज दौडे 

याद भारी व मज्यानी
लागे सयदनी गोडी
काय सांगू सयी तुले
तीन तालनी  माडी

वनू माप वलांडीस 
लाया आडा तो मुसय
लवसव देर मन्हा
ननीदंले ना कुसय

माय बापनी पुन्यायी
मिते आचंबीत जऊ
आत्याबाई माले म्हने
तुन्ह माहेर व व्हऊ 

शिकाड्यात रितीभाती
माय उमरट गुन
म्हने मामंजी इठोबा
लक्समाना पायगुन

व्हाये गिरनाना पाट
मयाथया भारंभार
दुध व्हाये व धांड्याम्हा
बैलपोया ना जागर

सन वनात गयात
वरिसले लागी वरिस
ग्यात त्या देवमानसे
पटपट व निंघीस

याद मुकली ठी मांगे
आशे आते नै भेटाऊ
काय थाट व्हता मन्हा
आते आरती ववाऊ

काशीकन्या
काशीकन्या लिव्हस काव्य संग्रह

मन्ही रचना मन्हा ध्यास मन्हा स्वासजरासं आम्हनाकडेबी

🌿मन्ही रचना मन्हा ध्यास मन्हा स्वास🌿
    🌵जरासं आम्हनाकडेबी🤨
जरासं आम्हन्हाकडेबी,
ध्यान द्या मायबापहो,
बठ्ठी आथीपोथीबी,
*गुताडी आम्हीन दिधीहो.१
किटूकमिटूक उरेल सूरेल,
मजूर पयाडी लयीग्यात,
कपासी घरम्हा सडत पडेल,
 आडनडले बेपारी धूई रहायनात.२
मध्यमवर्ग शेत मस्त मज्याम्हा,
आयीपीएल दखी रहायनात,
विरीधी पक्स अॕसिडीटीना आजारम्हा,
सरकारवाला आयोध्याले पयी गयात.३
आत्ते आसं करा मायबापहो,
मरानी नही व्हस आम्हनी हिंमत,
आम्हनी खेती तुम्ही कराहो,
आनी दी टाका तोंडनी किंमत४
 गयाम्हा माय,हातम्हा टाय,
ली ली आम्ही फिरसूत,
ताडगापने धरतस रामना पाय,
आवकायी,दुस्काई तरी टायसूत!५
 बयीना येथीत पोर्या🤨
मझिसु✍️🌷प्राचार्य मगन सुर्यवंशी

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...