सैसांज अहिराणी कवीता
दिन भर पोटसाठे
पोटसाठे वनवन,
सरनात आठ तास
तासं सर तन मन.....
कुनबीन बांधे भारा
भारा गोधनले टाका,
शेतकरी राजा कशा
कशा धरतीले वाका.....
पाखरेस्नी किलकिल
किलकिल करे चिडी,
दाना आना वाहिसन
वाहिसन दे खावाडी.....
सूर्य दिनना व राजा
राजा चाले दिन झाके,
त्याले निरोप जी देता
देता शेंदूरज टाके.....
गोठाम्हान धन खूर
खूर जशी वाजे टाया,
दिशे परतेक वाटे
वाटे काढ्यात रांगोयी.....
वना बागे बागे चांद
धव्यी चांदन्यास्नी शाल,
पारवर दिम्हयले
दिम्हयले गप्पा ताल.....
इठायीना मंदिरात
मंदिरात शिव,गन,
टायकरी रंगनात
रंगनात जी भजन.....
माय लाये सांजवात
सांजवात तुयशीले,
खेतमया करे झोप
झोप रान गवतले.....
रांधे माय चुल्हावर
चुल्हावर भाकरले,
खाये चटमट जीभ
जीभ गोडी त्या बट्टाले.....
खोय भरे आभायन
आभायना भारी गुण,
वनी दुडकत रात
रात दिन सुनसान.....
काशीकन्या पाटील जालना
काशीकन्या काव्य संग्रह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा