दोन डोळास्न धरन
गयं भरी,कोठे सांडू ?
वल्ला दुष्काळी मननी
वेथा कोनपन मांडू ?
बाप मांगे माय गयी
म्हनी शाळले मूकनू
भाऊ बहीन शिकाडी
बाप त्यास्ना मी बननू..!
भाऊ बहिन दोन्हीस्नी
घिदं सम्द बागायीत
नौकरीबी करी त्यास्नी
ठेवं मालेचं पडीत..!
नादारीना सौंसारात
व्हती घरवाली तरी
जल्म लेकरस्ले दीस्नी
तीबी गयी देवदारी..!
दुःख गिळीस्नी सगळं
आख्खी हयाती झिजनू
वाडे लायी पोऱ्या पोरी
माय त्यास्नी मी व्हयनू..!
पंख फुटताच चिडा
गांव सोडी उडनात
जल्मदाता ईसरीस्नी
शहेरमा रमनात..!
सोता रांधस भाकर
खास कोल्लावल्ला घास
कोना आधारनी आते
उरनीच नही आस..!
हात जोडीनी देवले
रोज मांगस मरन
देऊ नको माले कधी
आशी शापित जीवन..!
✍️कवी-देवदत्त बोरसे✍️
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा