सोमवार, १० एप्रिल, २०२३

मन्ही कविता,मन्हा स्वास,मन्हा ध्यास माय माय तू आत्ते करी रहायना

🌿मन्ही कविता,मन्हा स्वास,मन्हा ध्यास🌿

🤨माय माय तू आत्ते करी रहायना.🤨.

[या रचनाले नासिकले बक्षित भेटेल से,तसच यक पुस्तकम्हा प्रकाशित व्हयेल शे बायाजा कविता संग्रोम्हा]

माय माय तू भाऊ आत्ते करी रहायना

जित्ता पने तू मायले हिंग लाये नयीना

बायकोना तालव्हर तू नंदी बैल व्हयी डोलेना

तिन्हा सिवाय तुन्ह पानबी हाले नयीना

तिन्ह आयकी तू मारक्या बैलना माइक मायकडे देखेना

तिन्हा कोंडमारा करी तू हालहाल करेना

मोठायकी दखाडा करता तू माय माय करी रहायना

पोटम्हा व्हथा तू तव्हय ती जीवले मारेना

खार,आल्न,आंबट,चिंबट खानं तिन्ही सोडी दिंथना

आत्ते तू तिन्हा नावन्या पितरीनी घाली रहायना

तव्हय ते तू मायले बलका बलका करता तरसायेना

ना खाता देवले निवत आत्ते उपेग व्हनार नयीना

म्हनून हातपाय जोडी इनंती तुम्हले मी करसना..

जलमभर मायबापनी करा सेवा,कमी पडाऊ नयीना

मरा नंतर मंदिर बांधी उपेग व्हवाऊ नयीना

आत्तेज इठ्ठल-रखमाई समजी सेवा तेस्नी कराना

सरगनं दार तुम्हले आपेआप खुली जाईना..

नयीते नरक तुम्हना ठयरेल जित्तापने समजी ल्याना

रचनाकार🙏

मझिसु✍️🌷प्राचार्य मगन सुर्यवंशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...