सोमवार, १० एप्रिल, २०२३

सासरनी याद भारी

सासरनी याद भारी

आस्स सासर मज्यान
वठे गिरनाना थडे
बैलगाड जुपीसन 
जैठ घेवालेज दौडे 

याद भारी व मज्यानी
लागे सयदनी गोडी
काय सांगू सयी तुले
तीन तालनी  माडी

वनू माप वलांडीस 
लाया आडा तो मुसय
लवसव देर मन्हा
ननीदंले ना कुसय

माय बापनी पुन्यायी
मिते आचंबीत जऊ
आत्याबाई माले म्हने
तुन्ह माहेर व व्हऊ 

शिकाड्यात रितीभाती
माय उमरट गुन
म्हने मामंजी इठोबा
लक्समाना पायगुन

व्हाये गिरनाना पाट
मयाथया भारंभार
दुध व्हाये व धांड्याम्हा
बैलपोया ना जागर

सन वनात गयात
वरिसले लागी वरिस
ग्यात त्या देवमानसे
पटपट व निंघीस

याद मुकली ठी मांगे
आशे आते नै भेटाऊ
काय थाट व्हता मन्हा
आते आरती ववाऊ

काशीकन्या
काशीकन्या लिव्हस काव्य संग्रह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...