गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

अहिराणी कविता माय येना जलदीसांगू काय तुले माडी कस सांगू समजाडी रिती पडनी व मायमनी दिहम्हान कुडी

माय येना जलदी

सांगू काय तुले माडी 
कस सांगू समजाडी 
रिती पडनी व माय
मनी दिहम्हान कुडी

घाल दोनज बलका 
रव जराखज संगे
पदरेना रूमालथी 
तोंड पुशी दे ना मंगे 

घिस मांडीवर जरा
थोपडीस तू निजाड
माडी तुन्हा बगलम्हा 
जरा माले बी वागाड 

माले खिजाव कताव 
पन येक साव बोल
घिस शिराई बुडूखे 
करू मारान व मोल

तुन्हा बोट धरी माले
दुन्या समदी दाखाड
नव निव्हायन करी
माडी माले न खावाड

माय माय कोकावस 
मन्ह जराख आयेक 
कशी गया दुर सोडी
कोमजायानीज लेक

माय ये व परतीस
माले येखल गमेना 
कधी दपी गयी तुले
डोया निहायी पाहेना

कसा देवबा रूसना
मन्ही माय दे वापस
काही नही ती सवाय
माले कर रे सोबत

सांगू पख रे पाखडी
मन्ही माडीले सांगावा
आसे करू रे देवबा
ल्हेवो ना कोना इसावा

काशीकन्या पाटील 
काशीकन्या लिव्हस काव्य संग्रह

डॉ.बाबासाहेब तुमच्यालेखनीने केली कमालसंविधान लिहून तुम्हीउडवून दिली हो धमाल

डॉ.बाबासाहेब अंबेडकर
 दि.१३/४/२०२३

डॉ.बाबासाहेब तुमच्या
लेखनीने केली कमाल
संविधान लिहून तुम्ही
उडवून दिली हो धमाल..!

कायदा कानूनचे महत्व
पटवून दिले गरीब जनतेला
कोणी वंचित राहू नका 
हे ज्ञान सांगितले समाजाला..!

भारतीय राज्यघटना चे
तुम्हीच खरे शिल्पकार
लिहून ठेवले पुस्तकात
आमचे हे सारे अधिकार..!

आता कोणी नाही लाचार
आजवर होते अंधारात
खुले केली मंदिर गावतळे
आणले सर्वांना प्रकाशात..!


कवी.दिलीप हिरामण पाटील
       कापडणे ता जि धुळे
       मो.नं.९६७३३८९८७३

अहिराणी कविता जनताना आशिर्वाद

क्रांतीसूर्य तात्यासाहेब जोतिराव फुले यांच्या जन्मोत्सव निमित्त त्यांना माझे विनम्र अभिवादन 🌼📚जोतिराव विद्यापती📚🌼नाही ठाऊक आम्हास गजानन गणपती आम्हा ठाऊक जोतिबा

[क्रांतीसूर्य तात्यासाहेब जोतिराव फुले यांच्या जन्मोत्सव निमित्त त्यांना माझे विनम्र अभिवादन 

  🌼📚जोतिराव विद्यापती📚🌼

नाही ठाऊक आम्हास 
गजानन गणपती 
आम्हा ठाऊक जोतिबा 
          देव खरा विद्यापती ॥धृ॥
ज्यांनी निर्मियली साऊ 
ज्ञानदेवी आम्हा प्रती 
किती वर्णू  गुणगुणू 
              माय साऊची महती॥१॥
झिजलीही अव्याहत
माय समाजाच्या प्रती
जोति साऊंनी मानिला 
              एक समाज भारती॥२॥
केला त्यांवरी प्रहार 
ज्यांनी निर्मियल्या जाती
किती सांगू आणि कशी
        जोति सावित्रींची ख्याती॥३॥
धर्म मानवता एक 
एक सार्यांच्याच जाती
जात मानव एकच 
        जोति साऊंची ही निती॥४॥ 
जोति साऊंची ही निती 
औघ्या विश्वावरी प्रिती
साऊ आम्हा ज्ञानदेवी 
            जोतिराव विद्यापती॥५॥
       --निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव. 
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३
📚🙏📚🙏📚🙏📚🙏📚🙏📚

महात्मा ज्योतिबा फुले जयंती भारत अशिक्षित अज्ञान आणि अंधश्रद्धा यात खितपत पडला होता त्याला या अंधार खाईतून बाहेर काढण्याच काम म ज्योतीबानी केलं. त्यातून देशाची विकास गती वाढली त्यांचा सिद्धांत होता

🇮🇳📚🇮🇳🤝📚🇮🇳🤝🇮🇳
  महात्मा ज्योतिबा फुले जयंती

          भारत अशिक्षित, अज्ञान आणि अंधश्रद्धा यात खितपत पडला होता त्याला या अंधार खाईतून बाहेर काढण्याच काम म ज्योतीबानी केलं. त्यातून देशाची विकास गती वाढली. त्यांचा सिद्धांत होता,
        विद्येविना मती गेली!
        मती विना नीती गेली!
        नीती विना गती गेली!
        गती विना वित्त गेले!
        वित्ता विना शूद्र खचले        
    इतके अनर्थ एका अविद्यने केले!
          जाती या देव निर्मित नाहीत माणसांनें त्या तयार केल्या आहेत. माणसा माणसांत भेद करू नका. उच्चं निचता पाळू नका. सर्वांनी शिक्षण घ्या. त्यासाठी केवळ त्यांनी भाषण केली नाहीत. स्वतः पैसे खर्चून काम केले. शूद्र, स्त्रिया अस्पृश्यासाठी शाळा सुरु केली. आपल्या घरातील पाण्याचे हौद त्यांनी अस्पृश्यांना खुले केले. शेतकऱ्यांची कैफियत, ग्रंथ, वृत्तपत्र, सरकार दारबारत मांडली. त्यांना जातं हीं गोष्ट कधीच मान्य नव्हती. दलित ते ब्राह्मण सर्व मानव जातं एक आहे असं ते मानत. म्हणून तर त्यांनी स्वतःचे नात्यात अनेक तरुण असूनही एका ब्राह्मण अनाथ मुलाला दत्तक घेतले. आजच्या भावातील करोडो रुपयाची संपत्ती या दत्तक पुत्राचे नावे केली. जातं न माणण्याचा एवढा मोठा आदर्श आजही कोणी लोका समोर ठेवू शकला नाही.
          भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म फुलेना गुरु मानून त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला. समतेच्या लढ्यात अशी गुरु शिष्याची जोडी जगात दुसरी नाही.
              अमेरिकेचे एक अत्यंत सुंदर आणि समृद्ध मिशीगन नावाच राज्य आहे. या राज्याच्या महिला गव्हर्नंर म्हणजे मुख्यमंत्री आहेत ग्रेचेन व्हिटमर. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्या मिशीगन मध्ये साजरे कारण्याचे आदेश दिले आहेत. तिथे 9 एप्रिल पासून 15 एप्रिल 2023 हां संपूर्ण साप्ताह फुले आंबेडकर जयंती सप्ताह साजरा होतं आहे. या साप्ताहात येणाऱ्या 11एप्रिलला फुले जयंती आहे तर 14 एप्रिलला आंबेडकर जयंती आहे. साता समुद्रापार या समतेच्या पुजाऱ्याचं पूजन होतंय तेंव्हा भारतीय असल्याचा गर्व वाटतो!
          त्या दोनही महामानवांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!
🙏🏻🌹🌹📚🌹🌹🙏🏻
✍🏻📚🙏🏻✍🏻📚 बापू हटकर
🇮🇳📚🇮🇳🤝🇮🇳📚🇮🇳🤝

हरेक धर्म समता शिकाडी जास, ते शिक्षनथून समजी उमजी येस याकरता आख्खास्ना करता जीवन प्रवास करनारा दैवत अहिराणी लेख

हरेक धर्म समता शिकाडी जास, ते शिक्षनथून समजी उमजी येस याकरता आख्खास्ना करता जीवन प्रवास करनारा दैवत
गरजवान, न्याय, हक्क, समता, ममतासंगे वास्तव शास्त्र, प्रथा परंपरा सांगत दीन हिन यासना नी मायमाऊलीस्ना उत्कर्षासाठे अनेक तरास सहीन करीन *समता* करता रोखठोक ज्ञान आमृत देनारा..
हरेक धर्म, जातपात पंथ करता आयुष्यभर लोके खराकरता जागृत करीन आख्खा देश समाज करता *माणुसकीनी पयेरनी* करनारा, छत्रपती शिवाजी महाराज यासले आदरस्थानी मानं, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यास्नी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यासले आदरस्थानी मानं सत्यशोधक, निर्भीड, स्पष्टवक्ता, जरासा इच्यार करा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आनी क्रांतीसुर्य यास्नी काय काय उपकार आपलावर करेल शेत..
जर त्या नही ऱ्हातात ते इच्यार करासारखी गोट शे.
आज स्मरन आदरथुन त्यासनं संगे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील 
 यासनाभी कार्य कामनी, सर्व समाज एकतानी उत्कर्षनी कायपात, एकी नेकीनी याद करानी शे,
 गरीबफाईन श्रीमंत लगून अशक्य ते शक्य कराकरता कैक मानापमान सहीन करीन खराखाती जीवन अमर करी जानारा
 *दैवत परमपूज्य युगप्रवर्तक तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यासना जयंती निमित्त विनम्र अभिवादन आनी कोटी कोटी वंदन आजभी आनी हायातीभर*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

बाबरी नक्की कोणी पाडल? लेखक बापुसाहेब हटकर

🕌⛏️🕌⛏️🕌⛏️🕌⛏️
बाबरी नक्की कोणी पाडल?
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
       (हां लेख निव्वळ काल्पनिक आहे. लोकांच निखळ मनोरंजन करावं म्हणून लिहिलेला एक ललित लेख आहे. याचा सत्य घटनेशी काही संबंध नाही)

            सध्या दुरदर्शनवर एक चर्चा जोरात सुरु आहे. बाबरी आम्ही पाडली, तुम्ही नाही पाडली असा वाद जोरात सुरु आहे. त्याबद्दल असं सांगता येईल की, बाबरी पाडली या घटनेत तीन घटक होते. एक भाजप कार्यकर्ते, दोन शिव सेना आणि तिसरा घटक कोणत्याही पक्षासी संबंध नसलेले हिंदुत्ववादी असलेला कार सेवक होता. त्यात विश्व हिंदू परिषद, बजरंगदल वगैरे संघटना होत्या. या गर्दीत भाजपचे लोक भाजपचे नेते आदेश देत होते तसें चालत होते. शिव सेनेचे लोकही आपले नेते आदेश देतील तसें कृती करत होते. पण तिसरा जो घटक होता हिंदुत्ववादी कारसेवक हे मोकाट सुटले होते. त्यांना आदेश देणारा कोणीच नव्हतं. हे लोक अनिर्बंध धावत होते. हीं गर्दी बाबरीचा ढाचा जमेल तिथे तोडत होता. मुख्य घुमटावर हीं गर्दी चढली घुमट पाडला त्यासोबतच घुमटा वरील लोक खाली कोसळले. त्यातील दोघांच्या गळ्यात शिव सेनेचे गमचे होते. लोकांनी या दोघांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली. त्यांचा सत्कार करू म्हणत होते. पण हे दोघे वीर भयंकर संतापले होते. ते जोराजोरात ओरडून काही तरी सांगत होते. पण त्या कोलाहलात ते काय बोलत होते ते कळत नव्हतं. गोंधळ कमी झाला तेंव्हा नीट कान देऊन ऐकल्यावर कळलं. ते दोघ ओरडून सांगत होते. तों सत्कार बित्कार घाला तिकडे चुलीत आधी हे सांगा आम्हाला घुमटा वर फेकलं कोणी? नीट चौकशी केल्यावर खरी परिस्थिती कळली.
       भाजप मुळात चतुर लोकांचा पक्ष आहे. भाजप सेनेचे लोक एकाच वेळी बाबरी जवळ पोहचले. आता पुढे काय? नी:पक्ष कारसेवक मात्र तीनही घुमटावर चढून ढाचा पाडत होते. इकडे भाजपाचे कार्यकर्ते आपसात खलबत करत होते.
पहिला-ते बघ दोघ उभे आहेत.
दुसरा-शिवसेनेचा गमचा गळ्यात अडकवलेले?
पहिला-हां ते दोघे.
तिसरा-बरं काय करायचं त्यांच?
पहिला-आपण सर्व मिळून त्यांना अलगद उचलून घुमटावर फेकायचं.
चौथा-त्याच्यानें काय होईल?
पहिला-ते वर जाऊन बाबरी पाडतील.
पाचवा-म्हणजे आपलं काम बिन बोभाट पार पडेल.
पहिला-आणि पोलीस आले तर कारवाई त्यांच्यावर होईल.
सातवा-हां म्हणजे त्यांच्या गळ्यातील गमच्या मुळे ते ओळखले जातील.
आठ-आणि आपण सुरक्षित निसटून जायचं.
           ठरल्या प्रमाणे सर्वांनी मिळून त्या दोघां गमचा धारिना उचलून घुमटावर फेकलं. वरती नि:पक्ष कारसेवाकानी घुमट पाडत आणला होता. जसं हे गमचाधारी घुमटा वर आदळले त्याच क्षणी घुमट खाली कोसळला. सर्व लोक धावले. त्या दोघांना उचलून खांद्यावर घेतलं. घोषणा सुरु झाल्या. त्यात काही लोक म्हणाले यांचा सत्कार करू त्यावेळी हे दोघे जीवाच्या अकांताने ओरडत होते. तों तुमचा सत्कार घाला चुलीत. आधी सांगा आम्हाला घुमटा वर कोणी फेकलं?
🕌⛏️🙏🏻⛏️🕌 बापू हटकर
🕌⛏️🕌⛏️🕌⛏️🕌⛏️

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...