गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

क्रांतीसूर्य तात्यासाहेब जोतिराव फुले यांच्या जन्मोत्सव निमित्त त्यांना माझे विनम्र अभिवादन 🌼📚जोतिराव विद्यापती📚🌼नाही ठाऊक आम्हास गजानन गणपती आम्हा ठाऊक जोतिबा

[क्रांतीसूर्य तात्यासाहेब जोतिराव फुले यांच्या जन्मोत्सव निमित्त त्यांना माझे विनम्र अभिवादन 

  🌼📚जोतिराव विद्यापती📚🌼

नाही ठाऊक आम्हास 
गजानन गणपती 
आम्हा ठाऊक जोतिबा 
          देव खरा विद्यापती ॥धृ॥
ज्यांनी निर्मियली साऊ 
ज्ञानदेवी आम्हा प्रती 
किती वर्णू  गुणगुणू 
              माय साऊची महती॥१॥
झिजलीही अव्याहत
माय समाजाच्या प्रती
जोति साऊंनी मानिला 
              एक समाज भारती॥२॥
केला त्यांवरी प्रहार 
ज्यांनी निर्मियल्या जाती
किती सांगू आणि कशी
        जोति सावित्रींची ख्याती॥३॥
धर्म मानवता एक 
एक सार्यांच्याच जाती
जात मानव एकच 
        जोति साऊंची ही निती॥४॥ 
जोति साऊंची ही निती 
औघ्या विश्वावरी प्रिती
साऊ आम्हा ज्ञानदेवी 
            जोतिराव विद्यापती॥५॥
       --निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव. 
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३
📚🙏📚🙏📚🙏📚🙏📚🙏📚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...