महात्मा ज्योतिबा फुले जयंती
भारत अशिक्षित, अज्ञान आणि अंधश्रद्धा यात खितपत पडला होता त्याला या अंधार खाईतून बाहेर काढण्याच काम म ज्योतीबानी केलं. त्यातून देशाची विकास गती वाढली. त्यांचा सिद्धांत होता,
विद्येविना मती गेली!
मती विना नीती गेली!
नीती विना गती गेली!
गती विना वित्त गेले!
वित्ता विना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्यने केले!
जाती या देव निर्मित नाहीत माणसांनें त्या तयार केल्या आहेत. माणसा माणसांत भेद करू नका. उच्चं निचता पाळू नका. सर्वांनी शिक्षण घ्या. त्यासाठी केवळ त्यांनी भाषण केली नाहीत. स्वतः पैसे खर्चून काम केले. शूद्र, स्त्रिया अस्पृश्यासाठी शाळा सुरु केली. आपल्या घरातील पाण्याचे हौद त्यांनी अस्पृश्यांना खुले केले. शेतकऱ्यांची कैफियत, ग्रंथ, वृत्तपत्र, सरकार दारबारत मांडली. त्यांना जातं हीं गोष्ट कधीच मान्य नव्हती. दलित ते ब्राह्मण सर्व मानव जातं एक आहे असं ते मानत. म्हणून तर त्यांनी स्वतःचे नात्यात अनेक तरुण असूनही एका ब्राह्मण अनाथ मुलाला दत्तक घेतले. आजच्या भावातील करोडो रुपयाची संपत्ती या दत्तक पुत्राचे नावे केली. जातं न माणण्याचा एवढा मोठा आदर्श आजही कोणी लोका समोर ठेवू शकला नाही.
भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म फुलेना गुरु मानून त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला. समतेच्या लढ्यात अशी गुरु शिष्याची जोडी जगात दुसरी नाही.
अमेरिकेचे एक अत्यंत सुंदर आणि समृद्ध मिशीगन नावाच राज्य आहे. या राज्याच्या महिला गव्हर्नंर म्हणजे मुख्यमंत्री आहेत ग्रेचेन व्हिटमर. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्या मिशीगन मध्ये साजरे कारण्याचे आदेश दिले आहेत. तिथे 9 एप्रिल पासून 15 एप्रिल 2023 हां संपूर्ण साप्ताह फुले आंबेडकर जयंती सप्ताह साजरा होतं आहे. या साप्ताहात येणाऱ्या 11एप्रिलला फुले जयंती आहे तर 14 एप्रिलला आंबेडकर जयंती आहे. साता समुद्रापार या समतेच्या पुजाऱ्याचं पूजन होतंय तेंव्हा भारतीय असल्याचा गर्व वाटतो!
त्या दोनही महामानवांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!
🙏🏻🌹🌹📚🌹🌹🙏🏻
✍🏻📚🙏🏻✍🏻📚 बापू हटकर
🇮🇳📚🇮🇳🤝🇮🇳📚🇮🇳🤝
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा