बुधवार, ३१ मार्च, २०२१

खान्देशी लगीनना दांगडो

 खान्देशी लगीनना दांगडो

**********************************************फुनकं ****************

घाली गयाम्हा कट्यार  

व्हयना घोडाव्हर स्वार

मांघे  वऱ्हाडीस्नी  हार

पुढे व्हल्लर वाजा चाले रे... राजबंदडं ...

नाचे  पोरेस्नी  जिवानी

तेस्ले  पर्जाना  तासानी

टाक धोये नाकनं पानी

गगननी चान्नी देखे खाले रे... राजबंदडं...

कान्ना पर्दा  ठोके  ढोल

टिपरीवाला नाचेत गोल

लेझीमना आयका बोल

वर्माय ती खुशीम्हा डोले रे... राजबंदडं...

तुन्हा  बाप  शे जमादार

चढना  मारोतीना  पार

फोडे  बंदूकना  बार

तुन्ही फुई फुनकं झेले रे... राजबंदडं....

========================================🙏😄🙏===========

प्रकाश जी पाटील +++++++पिंगळवाडेकर

=============================

तुना प्रेमनी भाषा सखी,वेगळी नशा से

 *तुना प्रेमनी भाषा सखी,वेगळी नशा से*



*तुना प्रेमनी सखी वेगळी नशा से*

*तुन देखन मनाकडे प्रेमनी भाषा से*


*हाई शरिर मातीन एक अभिलाषा से*

*तुना प्रेमनी सखी एक वेगळी नशा से*


*तु आपला संसारले एक दायल दिशा से*

*तुन्ह देखन मनाकडे एक प्रेमनी भाषा से*


*आपला संसारनी ख्याती हाई दाहीदिशा से*

*तुना प्रेमनी सखी एक वेगळीच नशा से*


*आपली जोडी हाई सखे ढोलताशा से*

*तुना प्रेमनी सखी एक वेगळीच नशा से*


*जगान सुखी आपण हाई भविष्यानी आशा से*

*तुन देखन मनाकडे एक प्रेमनी भाषा से*


*तुना आठवणीसना सागर मनमा तशास से*

*तुना प्रेमनी सखी एक वेगळीच नशा से*


*आपला चिमणी-पाखरं पोरेस्ना घर मा हशा से*

*तुन देखन मनाकडे एक प्रेमनी भाषा से*


*कवी-*दिपक भाऊसाहेब चव्हाण*

*9975663626*

🌹जिंदगीनी नाव🌹

 🌹जिंदगीनी नाव🌹

       *********

    ......नानाभाऊ माळी


मव्हरे मव्हरे जायी ऱ्हायनी

हायी जिंदगीनी नाव......

मांगे ऱ्हायी जायी गावं

मांगे ऱ्हायी जायी गावं...!धृ🌷


रंजी गांजी सवसार हावू

काढस डोयांनां  पूरं....

आवते भवते नातं गोतं

मनलें लायी जास घोर......🌷


पोरे सोरे जातींनं पऱ्हा

यांय बुडानां ये लें......

डोयांनां आंसू गयथीनं

कुडी सोडानां ये लें.........🌷


मन्हा मनलें बिवती ऱ्हायनू

ली एक एक सुखनां धागा

व्हायी ऱ्हायनी हिरदम्हा

पवतीर करी कुडीनी जागा..🌷


मव्हरे मव्हरे जायी ऱ्हायनी

जायी ऱ्हायनी जिंदगीनी नावं

मांगे ऱ्हायी जायी गावं....

मांगे ऱ्हायी जायी गावं........🌷

     🌹**********🌹

.....नानाभाऊ माळी

मु.पो.ता.शिंदखेडा.जि.धुळे

(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)

मो.नं  ७५८८२२९५४६

        ९९२३०७६५००

दिनांक-०७जानेवारी२०२१

भावकी ते गावकी

 भावकी ते गावकी

दखा भो आते सध्या एकच चर्चा भावकी ते गावकी... १५ तारीख ले महाराष्ट्र, नी खान्देश मजार ग्रामपंचायतन मतदान शे, हायी मतदान म्हणजे भावकी आणि गावकीनी कजाक ह्रास... खान्देशी माणस तर इकास नी गोट सोडीसन वाडा, भावकी, गल्ली, जात, धर्म येणावर व्हस.. मतदार बी बठ्ठा पॅनल, उमेदवारस कडथाईन हात धुवान मांगे ह्रातस... मंग ह्या बी निवडी उन्हात की तुम्हले बी, गावले बी मस्त धोतस... 

      म्हनीसन सांगस दादास्वन चांगला माणस निवाडा, बोट्या, दारूवर इकाउ नका, तेन्हा गु व्हस... मंग ह्या निवडेल तुम्हणच बोट तुम्हणा गांड मजार घीलतस तुम्लेज ५ वरीस सुंगाले लावतस.. तरणा जुवान इचार करा.. भावकी, गावकी ना बाहेर निंघा, चांगला जुवान निवाडा, शिकेल सवरेल निवाडा, गावना जिव्हाडाना माणस निवाडी द्या.. आते जातपात, धर्माना बाहेर काम व्हवाले जोयजेत...

     केंद्र सरकार वित्त आयोग कडथाईन लाखो रुप्या देस, अनुदान, लोकवर्गणी, बरीच निधी येस... पण आपले माहित ह्रास नही, आपीन जाग्रुत नागरीक बनाले पाहिजे, राजकीय, सामाजिक साक्षर बनाले जोयजे, नी नागरीकस्ले बी राजकीय सामाजिक साक्षर बनाडाले जोयजे... जर गावोगाव इकास व्हयीन ते गावमजार रोजगार मियीन, खान्देश न स्थलांतर थांबीन... पण बठ्ठास्नी मनवर लेवाले जोयजे... भाऊ, दादा, ह्या मोठ्ठला राजकारणी भडवास्ना नांद सोडा...

       काय मियस तुम्ले इचार करा.. ५०० फुलीवर इकाई जातस नी ५ वरीस थोबाड बंद ठेवतस... काही ठराविक गावेस्ना इकास दखा, प्रगती दखा, गावन्या शाया देखा, आरोग्य... पण गावस्ले महिना, पंधरा दिनमजार पाणी येस, काही गावस्ले पाणी रोज शे, पण तेस्ना पीएच जर तपासा ते, ढोर पेव्हाव, नहीत आस पाणी ह्रास, गाव जंगल इकावस, लायेल झाड उपाडतस, गावमा सुशिक्षित पोर असिसन बाहेर ना गाव वालास्ले रेशन दुकान चालावाले देतस, खोट्या ग्रामसभा, सरकारी खोट अनुदान चाटी लेथस... गावना संडास खायी जातस, गटारी खायी जातस, आसा उमेदवार निवाडु नका, भावकी आणि गावकी चेटाळानी तयारी करणारस्ले आते चेटाळानी गरज शे... नही ते ५ वरीस तोंडले मुकस बांधीसन बसा... बाकी काय? दादास्वन राजकीय, सामाजिक साक्षर बना, गावना इचार करा, गाव करी ते राव काय करीन... बस पैसासवर इकावु नका, हाऊ टाकेल फटुक तरुणस्नी डीपी ठेवाना प्रयत्न करा.... 

     .... ..... प्रवक्ता..... 

        खान्देश हित संग्राम 

......... 

          ९००४९३२६२६...

😄 निवडणूक😄

 😄  निवडणूक😄

🙏🙏🙏🙏🙏🙏

================

दर  पाच  वरिसम्हा

येस  वाजत  गाजत...

ऊनं  हाई  इलेक्शन

दारू दर्फडा पाजत.......1

दर  पाच  वरिसम्हा

त्याच इटेल तमासा...

कुत्रा चघयी रे देखा

रोज मटण नी मासा......2

जेनी पत शे रे बांडी

तोच निवडम्हा हुबा...

चार चत्रा लांडगास्नी

ढाण्या वाघलेच दाबा.....3

झाई लोकशाही खट्टी

मन  रोज  तीन्हं  तुटे...

उठे   नंगेशाही..रोज 

अन  लोकशाही लुटे......4

समाजना आरसाम्हा

जेन्ह तोंड दिसे कायं...

तोच  धराले  पयस

सिंघासन्ना च्यारी पाय....5

जसं  एक  कुत्रीमांघे

चौदा कुत्रास्नं गव्हारं...

तसं  हाई  खुर्चीसाठे

कोन्ही कालर सव्हारं.....6

जसा पाची पांडवस्नी

लिन्हा धुर्पतीम्हा वाटा...

खुर्चीलोंग भिडासाठे 

कोण कसा लाये साटा...7

काय नाव ठेऊ त्येंस्ले

बाता करस मी मोठ्या...

सस्ता इकावस मी भी

दोन घोट, दोन बोट्या....8

======================कवी ======

प्रकाश जी पाटील..........

.............. पिंगळवाडेकर

================

कालदिन रातले धुळ्याम्हा पाऊस पडना त्या करता हायी कविता.

 *[ कालदिन रातले धुळ्याम्हा पाऊस पडना त्या करता हायी कविता...]*   

     *हिवायाम्हा पाऊस रे*                                                                       

हिवायाम्हा पाऊस रे

तुले कोन बलावसं

येता येता सांग तुले

         हिवं नही का वाजसं॥धृ॥

बिन बलावाना सांग 

कसा पाव्हना तू यसं

पानी पाऊसना दिन

           वाट देखाले लावस॥१॥

जसा तुन्हा पावसाया

तसा हिवाया बी र्हास 

देख हिवाया बी र्हास 

          दिन मान ना रे खास॥२॥

तुन्हा बिगर धरनी

माय मन्ही  रे रडसं

तिन्हा करता कसा रे

             नही तव्हयं पडस॥३॥

बयं तूच से बयीनं

तुले हात तो जोडसं

तुन्हा बिगर तव्हयं

         पिके त्याना बयतसं॥४॥

त्याना तमासा देखस

नही तव्हयं पडस

हिवायाम्हा पाऊस रे

         तुले कोन बलावसं॥५॥

    *--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये.

दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

...................................................................

हिवायाम्हा =हिवाळ्यात, तुले=तुला, बलावस=बोलावतो,

हिव=थंडी, वाजस=वाजतो, बिन बलावाना=बिना बोलवायचा, यस=येतो, पाव्हना=पाहुणा, लावस=लावतो,

पावसाया =पावसाळा, र्हास =राहतो, तुन्हा =तुझा, बिगर=शिवाय, मन्ही =माझी, तव्हय=तेव्हा, बयं=बळ, बयीनं=बळीचं, बयतस=जळतात. 

........................................................................

😄निवडणूक 😄

 😄निवडणूक 😄

================================

देखा  निवडणूकम्हा

पुढारीनी.... धडपड...

बाजरीम्हा लहयेराये

जसा चिकनीना भड......1

दर   पाच   वरिसम्हा

तोच नितना कुटाणा...

पैदा   गायेगाव  करा 

पुढारीस्ना कारखाना.....2

ज्येनी कापायेल खाट 

गाते मुडी ग्ये खाटनं...

मारे  झरपडा  तो बी

माल्हे  नवल  वाटणं......3

घर सम्हाव्हानं शिक

मंग  चलावा  रे गाव...

तुन्ही करनीम्हा देख

तुन्हा निकालनी नाव.....4

नाच्यानीच भांदो बरं

दोन्ही पायस्मा घुंगरू...

सरीभर्से  दोरी  भांदी

नको  फुकटम्हा मरू......5

खुर्ची नुस्ती नही खुर्ची

तिल्हे चारी पाय नशा...

तुन्ह  कम्मर ती मोडी

जग   देखी   उठबशा.....6

खुर्ची   म्हंजे   राजधर्म 

तीन्ही राखसी का पत...

नही  भेटावं  रे  तुल्हे 

मन्ह  आमुलिक   मत....7

================================

*********कवी********

प्रकाश जी पाटील /////////

//////////////पिंगळवाडेकर

********************

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...