बुधवार, ३१ मार्च, २०२१

😄निवडणूक 😄

 😄निवडणूक 😄

================================

देखा  निवडणूकम्हा

पुढारीनी.... धडपड...

बाजरीम्हा लहयेराये

जसा चिकनीना भड......1

दर   पाच   वरिसम्हा

तोच नितना कुटाणा...

पैदा   गायेगाव  करा 

पुढारीस्ना कारखाना.....2

ज्येनी कापायेल खाट 

गाते मुडी ग्ये खाटनं...

मारे  झरपडा  तो बी

माल्हे  नवल  वाटणं......3

घर सम्हाव्हानं शिक

मंग  चलावा  रे गाव...

तुन्ही करनीम्हा देख

तुन्हा निकालनी नाव.....4

नाच्यानीच भांदो बरं

दोन्ही पायस्मा घुंगरू...

सरीभर्से  दोरी  भांदी

नको  फुकटम्हा मरू......5

खुर्ची नुस्ती नही खुर्ची

तिल्हे चारी पाय नशा...

तुन्ह  कम्मर ती मोडी

जग   देखी   उठबशा.....6

खुर्ची   म्हंजे   राजधर्म 

तीन्ही राखसी का पत...

नही  भेटावं  रे  तुल्हे 

मन्ह  आमुलिक   मत....7

================================

*********कवी********

प्रकाश जी पाटील /////////

//////////////पिंगळवाडेकर

********************

😎बाप्पाना चष्मा😎

 😎बाप्पाना चष्मा😎


बोट्यास्न मटण न  कस रटरट शिजी ह्रायन्ह ..

दारुन आंधण कस खयखय उकाई ह्रायन्ह...

मायच्यान भो मन्ह बी गाव आज इकाई ह्रायन्ह...

जुवारी नी सपथ नी पोरस्नी सपथ लेव्हायीह्रान्ह...

घरना देव्हारा न देवपण हाली ह्रायन्ह...

लंगड्या देव बी कसा डांगेडांग पयी ह्रायन्हा...

मायच्यान भो मन्ह बी गाव आज इकाई ह्रायन्ह...

गांधी बाप्पा नोटवर हाशी ह्रायन्हा....

बाप्पानी आंधी लोकशाही चष्मा दखी ह्रायन्हा...

आंधा मतदारस्ले पाच वरीस करता...

बाप्पाना चष्मा पाचशे, हजार ले इकाई ह्रायन्हा

मायच्यान भो मन्ह बी गाव आज इकाई ह्रायन्ह...

           त्रिवेणीकुमार

🌹निवडणूक 🌹

 🌹निवडणूक 🌹

****************************************

भाऊबंद ऱ्हास काय

फ़ांद्या पारंबीस्ना वड...

झाड डौलदार त्येल्हे

पाडे   पंचायत   तड......1

झाया  निवडना पाये

भाऊ  भाऊनाच वैरी...

एक डंगना ह्या आंबा

गोडी कोन्हाजोगे थैरी....2

येरायर्ले.. देखी.. देखी

दौडे दोन्हीस्ना खकारा..

नाथे  चढनात  दोन्ही

त्येंस्ना मातना व्हकारा...3

एक  दामूना  गटम्हा

एक  शामूना  तटम्हा...

थुक लाई नामू  ठोके 

जाडी पाचेर  फटम्हा.....4

येस्ना धीरावाले कोन

काया सडेल भिलावा...

नांदे लागीसनी त्येंस्ना

भीत  सोडे रे गिलावा....5

रोज काना कोपराम्हा

उड्या  मारे  टँगो पंच...

त्येनी  भांदसू  दर्जाले

तुल्हे  कर्सु🌹सरपंच....6

नका पैरा रे 🙏जहर

नका  करू रे  इदासा...

पाच   वरिसना  साठे

नको पिढीना तमासा.....7

हाई   निवडले   देखो

जसा  कबड्डीना  डाव...

नको  ईर्षाना  गुलाल

नका  भंगाडा  रे  गाव....8

================================

********कवी ********

प्रकाश जी पाटील ----------

---------------पिंगळवाडेकर

================

हायी आम्हनं से धन

 हायी आम्हनं से धन

उनी उनी उतरानं

हिनं न्यारच से गानं

गोड गोड बोला म्हने

       हिनं हायी से गर्हानं॥धृ॥

मन्ही खान्देशी खान्दानी

हिनं भाबड से मन

हिना बोलीम्हाच हिनं

          देखा दर्सन घडनं॥१॥

आठे नित उतरानं 

काय सांगशी गर्हानं

एक ठाऊक आम्हले

          नित गोडच बोलानं॥२॥

बोली आम्हनी से भोयी

भोयं आम्हनं से मन

मनं आम्हना सारखं 

           नही कोठे दखायनं॥३॥

हायी आम्हनं से धन

आसा आम्ही धनवान 

याम्हा मिटस आम्हनं

              बठ्ठ वारा वावधन॥४॥

      *--निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे*

*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये. 

दूरध्वनी क्र. ९३७१९०२३०३.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

शब्दार्थ :- उनी=आली, उतरानं =संक्रांत, हिनं=हिचं, न्यारच=निराळच, से=आहे, गानं=गाणं, हायी=हे, गर्हानं=गार्हाणं, मन्ही =माझी, बोलीम्हाच=बोलीमधेच, देखा=पहा, दर्सन=दर्शन, घडनं=घडलं, आठे=इथे, नित =रोज, आम्हले =आम्हाला, बोलानं=बोलायचं, भोयी=भोळी,  भोयं=भोळं, कोठे=कुठे, दखायनं=पाहण्यात आलं, याम्हा=यामधे, मिटस=मटतं, आम्हनं=आमचं, बठ्ठ=सगळं,  वारा-वावधन=भांडण तंटा, 

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

मन्ह कोठे चुकायन

 मन्ह कोठे चुकायन


बायकोनी मैतरीननं तीळगुळ म्हणीसन माले हलवा दिना अन म्हणे तीळगुळ ल्या गोड गोड बोला. मी म्हणतं, वहिनी फक्त यानावरी तोंड कशे गोड व्हई. ती मैतरीन इश्य म्हणीसन चालानी गयी. तितलामा बायको जोरमा म्हणे मी काय कधी तरफडणू का तीन्हा जवळ तोंड गोड कराले मांगतस. त्यानी मायनी उपाद मारु, माले तीळगुळना लाडू जोयजे व्हता. तीले लाजाले अन ईले रूबाब कराले काय झायं.


🙏रामकृष्णहरी 🙏

सहेरम्हा वन-टू-थ्री बीयेचके फिल्याट,वावरम्हां पर्तननं

 🟢🔴🟢🔴🟢🔴🟢


✍️✍️✍️


*सहेरम्हा वन-टू-थ्री बीयेचके फिल्याट,वावरम्हां पर्तननं* *फारम हाऊस दार मवरे चाकी गाडी असा समदा भौतिक सुखेस्नी रेलचेलनं परदरशन*मांडता उनं का !*


*मंग आपीन म्हनतस,*

*अमकानी तमकानी शून्या म्हाईन जग तयार कय !*


*म्हणजे व्हस असं का ,हाई* *बठ्ठ सुख भेटी अशी आशा धरीसन*

*मानुस शिरिमंत व्हवानी गुंता*

*रातदिन पयत सुटस पन तो सुखी काही व्हता दीखत नही !*


*आपिनच म्हनूत का ब्वा,*

*आम्हना धाकल्पने भलती मजा ये ,गयरं करमी जाये,घर कसं भरेल र्हाये.दिन कवय माव्ये ते कये बी नही !*


*मंग आते काय झायं ?*


*ती मजा गई तरी कुठे ?*


*एकलं एकलं काबर लागस?*

*छातडं काबर धडधंड करस?*


*काबर करमत नही?*


*काबर ते ...*


*जग निर्मान करानी व्याख्या कोठे तरी चुकायनी.*


*जग निर्मान करनं म्हनजे ...*


*धनगोत जपनं*


*आवडी निवडी जपनं*


*पावना व्हई गाव जानं*


*पावनास्न आरस्तोल,करनं*


*पाहुनचार करनं*


*मन मोक्या गप्पा टप्पा चावय करनं*


*घरना उंबर जोगे वावन्या चपलासन्ना भुगुल जमा व्हनं मन मोकये हासनं*


*आनी बरका...*


*हिरदनी मझारलं दुक मोक्ये करीसनी रडानं !!!*


*ह्याज गोष्टी आपीन मिळावू शकनुत तवयज ...म्हनू शकतस* *का ब्वा !*


*आम्हीन शून्या माथिन जग निर्मान कय.*


*आते तुम्हींनज सांगा आपला जीवनम्हा या गोष्टीस्नी वाढ झायी का घट झायी ???*


*तुम्हनं मनंन खराखातीनं दुक तुम्ही कितला लोकेसले सांगू शकतस ???*


*असा कितला दोस्तार ,शेजारी-पाजारी,नातं गोतं आपीन निर्मान करू शकनुत ???*

*भलताज कमी,नई ते नहीच...*

*मंग आपीन खरज जग,विश्व निर्मान कय का ???*

*तर नही ना...*


*दोस्तारसव्हनं,*


*रजिस्ट्री न्या कागदी फायली म्हनजे जग ...???*


*घरम्हांना भौतिक सुक सोयी म्हनजे जग ...???*


*लॉकरम्हा ठेल सोनं नानं, हिरा मोती डाग डागीना म्हणजेच जग ...???*


*मुखोटा घालेल चयरास्नी गर्दी म्हनजे जग ...???*

*नही !!!*

*हाई पयलेंग जानी समझी लेन्ह पडी,*


*शिरिमंत मोठा व्हवाना दबावना पायरे,कामना जास्तिना तान पायरे जर नातं दूर जात अशीन ......*


*कोनले हालकं देखाना अहंकारनी पायरे जर मानसे जोडे येत नसतीन .......*


*सुक दुक सांगाले मनं मोकय कराले जागा जर उरत नशीन तर .......*


*आम्हीन शून्या म्हाईन विश्व निर्मान कय, का विश्वा म्हाईन शून्य ?*


*वाचा ,इचार करा ,अहंकार सोडा,माणुसकी जपा.बाकीना लोकेसले मदत करा तेसना कामे पडा.*


*म्हनिसन आम्हना आदरणीय कैलास नानासाहेब कैलास भामरे ह्या त्यासना कविता लिखतस ....*


*काय येस संगे*👆


✍️✍️✍️*

*कवी*

*विजय व्ही.निकम*

*धामणगावकर,चाळीसगांव*


🟢🔴🟢🔴🟢🔴🟢

निकाल

 🙏😄निकाल 😭🙏

****************************************

कसा लागना निकाल

कोठे  दंगा  कोठे धूम...

कोन्हा गाजना हल्लर

कोन्हा चुल्हा सामसूम....1

गन्ज करे आटापिटा

बेवड्यास्ना फौजफाटा...

लाये हज्जारबी नेटा

ईर्षा  खेये छापाकाटा.....2

मारे आभायमा उड्या

देखा गुलालना ताठा...

कसा जपाडा सज्जन

लाल  करा  बरामाठा.....3

बरं झायं मुक्का व्हता

ढोल तासाना आवाज...

यंदा सुतळ्याबी फुस्का

नही मिटाडी  रे खाज.....4

हाऊ नोटा मोठा खोटा

त्येनी दिन्हा जोर लाई...

दोन  फुलीकर्ता चित्ती 

झायी  पॅनेलनी  बाई......5

सातपैकी सात जागा

आमी जीकी दखाड्यात

टोप्या कांजीन्या मयेल

कश्या खाले झुकाड्यात.6

आठ  दीन  नबेदा  मी

भरू  नका  दादा रागे...

जाऊ कोठे ग्रुप सोडी

फिरी  उनु  बागे  बागे.....7

😄😄😄😄😄😄

***************************कवी *********

प्रकाश जी पाटील ====

=====पिंगळवाडेकर🙏

---------------------------------

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...