बुधवार, ३१ मार्च, २०२१

सहेरम्हा वन-टू-थ्री बीयेचके फिल्याट,वावरम्हां पर्तननं

 🟢🔴🟢🔴🟢🔴🟢


✍️✍️✍️


*सहेरम्हा वन-टू-थ्री बीयेचके फिल्याट,वावरम्हां पर्तननं* *फारम हाऊस दार मवरे चाकी गाडी असा समदा भौतिक सुखेस्नी रेलचेलनं परदरशन*मांडता उनं का !*


*मंग आपीन म्हनतस,*

*अमकानी तमकानी शून्या म्हाईन जग तयार कय !*


*म्हणजे व्हस असं का ,हाई* *बठ्ठ सुख भेटी अशी आशा धरीसन*

*मानुस शिरिमंत व्हवानी गुंता*

*रातदिन पयत सुटस पन तो सुखी काही व्हता दीखत नही !*


*आपिनच म्हनूत का ब्वा,*

*आम्हना धाकल्पने भलती मजा ये ,गयरं करमी जाये,घर कसं भरेल र्हाये.दिन कवय माव्ये ते कये बी नही !*


*मंग आते काय झायं ?*


*ती मजा गई तरी कुठे ?*


*एकलं एकलं काबर लागस?*

*छातडं काबर धडधंड करस?*


*काबर करमत नही?*


*काबर ते ...*


*जग निर्मान करानी व्याख्या कोठे तरी चुकायनी.*


*जग निर्मान करनं म्हनजे ...*


*धनगोत जपनं*


*आवडी निवडी जपनं*


*पावना व्हई गाव जानं*


*पावनास्न आरस्तोल,करनं*


*पाहुनचार करनं*


*मन मोक्या गप्पा टप्पा चावय करनं*


*घरना उंबर जोगे वावन्या चपलासन्ना भुगुल जमा व्हनं मन मोकये हासनं*


*आनी बरका...*


*हिरदनी मझारलं दुक मोक्ये करीसनी रडानं !!!*


*ह्याज गोष्टी आपीन मिळावू शकनुत तवयज ...म्हनू शकतस* *का ब्वा !*


*आम्हीन शून्या माथिन जग निर्मान कय.*


*आते तुम्हींनज सांगा आपला जीवनम्हा या गोष्टीस्नी वाढ झायी का घट झायी ???*


*तुम्हनं मनंन खराखातीनं दुक तुम्ही कितला लोकेसले सांगू शकतस ???*


*असा कितला दोस्तार ,शेजारी-पाजारी,नातं गोतं आपीन निर्मान करू शकनुत ???*

*भलताज कमी,नई ते नहीच...*

*मंग आपीन खरज जग,विश्व निर्मान कय का ???*

*तर नही ना...*


*दोस्तारसव्हनं,*


*रजिस्ट्री न्या कागदी फायली म्हनजे जग ...???*


*घरम्हांना भौतिक सुक सोयी म्हनजे जग ...???*


*लॉकरम्हा ठेल सोनं नानं, हिरा मोती डाग डागीना म्हणजेच जग ...???*


*मुखोटा घालेल चयरास्नी गर्दी म्हनजे जग ...???*

*नही !!!*

*हाई पयलेंग जानी समझी लेन्ह पडी,*


*शिरिमंत मोठा व्हवाना दबावना पायरे,कामना जास्तिना तान पायरे जर नातं दूर जात अशीन ......*


*कोनले हालकं देखाना अहंकारनी पायरे जर मानसे जोडे येत नसतीन .......*


*सुक दुक सांगाले मनं मोकय कराले जागा जर उरत नशीन तर .......*


*आम्हीन शून्या म्हाईन विश्व निर्मान कय, का विश्वा म्हाईन शून्य ?*


*वाचा ,इचार करा ,अहंकार सोडा,माणुसकी जपा.बाकीना लोकेसले मदत करा तेसना कामे पडा.*


*म्हनिसन आम्हना आदरणीय कैलास नानासाहेब कैलास भामरे ह्या त्यासना कविता लिखतस ....*


*काय येस संगे*👆


✍️✍️✍️*

*कवी*

*विजय व्ही.निकम*

*धामणगावकर,चाळीसगांव*


🟢🔴🟢🔴🟢🔴🟢

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...