बुधवार, ३१ मार्च, २०२१

🌹निवडणूक 🌹

 🌹निवडणूक 🌹

****************************************

भाऊबंद ऱ्हास काय

फ़ांद्या पारंबीस्ना वड...

झाड डौलदार त्येल्हे

पाडे   पंचायत   तड......1

झाया  निवडना पाये

भाऊ  भाऊनाच वैरी...

एक डंगना ह्या आंबा

गोडी कोन्हाजोगे थैरी....2

येरायर्ले.. देखी.. देखी

दौडे दोन्हीस्ना खकारा..

नाथे  चढनात  दोन्ही

त्येंस्ना मातना व्हकारा...3

एक  दामूना  गटम्हा

एक  शामूना  तटम्हा...

थुक लाई नामू  ठोके 

जाडी पाचेर  फटम्हा.....4

येस्ना धीरावाले कोन

काया सडेल भिलावा...

नांदे लागीसनी त्येंस्ना

भीत  सोडे रे गिलावा....5

रोज काना कोपराम्हा

उड्या  मारे  टँगो पंच...

त्येनी  भांदसू  दर्जाले

तुल्हे  कर्सु🌹सरपंच....6

नका पैरा रे 🙏जहर

नका  करू रे  इदासा...

पाच   वरिसना  साठे

नको पिढीना तमासा.....7

हाई   निवडले   देखो

जसा  कबड्डीना  डाव...

नको  ईर्षाना  गुलाल

नका  भंगाडा  रे  गाव....8

================================

********कवी ********

प्रकाश जी पाटील ----------

---------------पिंगळवाडेकर

================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...