हायी आम्हनं से धन
उनी उनी उतरानं
हिनं न्यारच से गानं
गोड गोड बोला म्हने
हिनं हायी से गर्हानं॥धृ॥
मन्ही खान्देशी खान्दानी
हिनं भाबड से मन
हिना बोलीम्हाच हिनं
देखा दर्सन घडनं॥१॥
आठे नित उतरानं
काय सांगशी गर्हानं
एक ठाऊक आम्हले
नित गोडच बोलानं॥२॥
बोली आम्हनी से भोयी
भोयं आम्हनं से मन
मनं आम्हना सारखं
नही कोठे दखायनं॥३॥
हायी आम्हनं से धन
आसा आम्ही धनवान
याम्हा मिटस आम्हनं
बठ्ठ वारा वावधन॥४॥
*--निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे*
*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये.
दूरध्वनी क्र. ९३७१९०२३०३.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शब्दार्थ :- उनी=आली, उतरानं =संक्रांत, हिनं=हिचं, न्यारच=निराळच, से=आहे, गानं=गाणं, हायी=हे, गर्हानं=गार्हाणं, मन्ही =माझी, बोलीम्हाच=बोलीमधेच, देखा=पहा, दर्सन=दर्शन, घडनं=घडलं, आठे=इथे, नित =रोज, आम्हले =आम्हाला, बोलानं=बोलायचं, भोयी=भोळी, भोयं=भोळं, कोठे=कुठे, दखायनं=पाहण्यात आलं, याम्हा=यामधे, मिटस=मटतं, आम्हनं=आमचं, बठ्ठ=सगळं, वारा-वावधन=भांडण तंटा,
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा