मंगळवार, ३० मार्च, २०२१

हायी खान्देसनी रानी

 हायी खान्देसनी रानी

अभिमानी मी आन्डेर

मन्हा धुयानी धुयानी 

नही आसा अभिमान 

         देखा कोठे दुनियानी॥धृ॥

मन्ही कविता फुलनी

आशी माटी से मयानी

दूर दूर फुलीसनी

           देखा किर्ती समायनी॥१॥

वाट झायी आपुरी वं

माले धरती मायनी

वाट देखा चाली गवू

             मीबी पुरी आभायनी॥२॥

खान्देसनी राजधानी 

राजभाषा अहिरानी 

मन्ही अहिरानी झायी

            देखा आशी राजरानी॥३॥

आशी कोनती से बोली

हिना सारखी वं रानी

म्हनीसनी म्हनतस

       हिले *हायी* से वं *रानी*॥४॥

    [हायी रानी-अहिरानी]

सब्दे हिना एक एक 

आख्या हिरासन्या खानी

मन्हा संगे दुनियानी

             करी हिनी वाखाननी॥५॥

      *--निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये.

दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

_______________________________________

फुलनी=फुलली, माटी=माती, आन्डेर= मुलगी, कन्या, फुलीसनी=फुलून,समायनी=सामावली, झायी=झाली, मयानी=मायेची, म्हनीसनी=म्हणून, म्हनतस=म्हणतात. हिले=हिला, हायी=ही

से=आहे, सब्दे =शब्द, हिना=हिचे, आख्या=सगळ्या, हिरासन्या =हिर्यांच्या, खानी=खाणी

_______________________________________

मन्ही अहिरानी बोली

 ▫️मन्ही अहिरानी बोली▫️

बोल लाखना मोलना

मन्ही खान्देशी बोलनी

बोली खडी साखरनी

         अहिरानी वं बोलनी॥धृ॥

ल्ह्यारे अहिरानी बोली

मराठीले जोडीसनी

एक गलीम्हा र्हातीन

         सया बैनी म्हनीसनी॥१॥

हिनी शिकाडं बोलाले

माय भाऊ म्हनीसनी

हिना बठ्ठा भाऊबंद

          हिले परका न कोनी ॥२॥

गोडी हिनी काय सांगू 

जशी पोयी पुरननी

नित् गोडच बोलनी

              पुरनम्हा घोयीसनी॥३॥

गोडी हिनी खान्देसले

पुरीसनी बी उरनी

काय खान्देसले हायी 

          आख्खी दुन्या फिरी उनी॥४॥

    *--निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*,  मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये.

दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

शब्दार्थ : मन्ही =माझी, ल्ह्यारे = घ्यारे, जोडीसनी =जोडून, गलीम्हा =गल्लीत, र्हातीन=राहतील, सया बैनी=मैत्रिणी, हिनी=हिने, शिकाड=शिकवलं, म्हनीसनी =म्हणून, हिले=हिला, पोयी पुरननी=पुरणाची पोळी, घोयीसनी=घोळून-मिसळून, पुरीसनी =पुरूनही, उरनी=उरली, आख्खी =सर्व-सगळी, दुन्या =दुनिया,

फिरी उनी=फिरुन आली.

  ▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️

बोलो तंस वागत निंघी जावो

 बोलो तंस वागत निंघी जावो

    🌷----------------🌷

.....नानाभाऊ माळी


भाऊ बहिनीस्वन!

काही मानसे माणूसपन लिसनी जगत ऱ्हातसं!चांगला इचार पह्येरी जगतं मव्हरे जात ऱ्हातसं!बोलतस तसा वागतं ऱ्हातसं!मन मनम्हा जायी बठी ऱ्हातंस!हिरदलें पटी तंसचं जगत ऱ्हातंसं!...अश्या गनज आशीर्वादनां फुलें देनारा महानुभाव आपला आंगेपांगे नशीबथिन भेटत ऱ्हातसं!🌷


काहीस्ना पायवर फुले टाकी पूजा करो!अश्या पूजनीय,वंदनीय जेठा मोठा ह्या जगम्हा भेटत ऱ्हातंस!त्यास्ना इचार गय्यरा बुद्धीलें

पटा जोगता ऱ्हातंस!            भाउस्वन!...हायी जग न्यामिंन सुंदर से!उज्जी आल्लग से!   ऊसनां रस से!मधाय से!गोड से! कमळ-गुलाबनं फुल से!डोयांनं पारंनं फिटस इतलं सुंदर से!मातरं सुंदरतांनी वयख लागालें जोइजे!बुद्धीनां खोल खड्डाम्हा उतरालें जोइजे!बुद्धीलें तान देवालें जोइजे!तव्हय कोटे सुंदरतांनां आंगे पोहचतंस!आपलं मन हाशी खुशी ऱ्हायनं!धीरधरी.. दुःखलें टिपरं धरी दूर तंगांडत ऱ्हायनं!ते बल्ला इतलं मोठं दुःखलें तोंड दि, मव्हरे सुखन्ह भूगलं नजरे पडतं ऱ्हास!🌷


भाऊ बहिनीस्वन!

आपुन सुखनां भूगला बनाडंतं ऱ्हावो!दुःखलें लामीनम्हा तंगाडतं ऱ्हावो!बठ्ठा आटा-फाटास्ले जोगे बलावतं ऱ्हावो!त्यास्नाघायी  सुखन्ह्या माया बनायी आखो  देव्हाराम्हा सुंदरफुलेस्ना साज चढावतं ऱ्हावो!जग सुंदर व्हत ऱ्हायी!मन सुंदर व्हत ऱ्हायी!मन मनम्हा अमृद संगयेत ऱ्हायी!थेंब थेंब दुन्यालें वाटत ऱ्हावो!जग दुन्यानां आशीर्वाद संगेसंगे लयी फिरो!त्या आशीर्वादस्न ऋण रुपी वझ कायम उतारतं ऱ्हावो!     त्याम्हा भारी सुखून भेटस!    आननं भेटत ऱ्हास!🌷


भाऊ-बहिनीस्वन!

आथान्या तथान्या दुसरासन्या उलट्या उडतीन उतारा पेक्ष्या  लोकेस्ना कामे येवो!सुख दुःखलें दवडी जावो!दुसरास्न कनभर दुःख हालकं करालें भेटनं ते आपलं कर्म संमजी पयेत जावो!आपला जीव धाकला से!जीवन धाकलं से!कालावधी कमी से!आपला खाताम्हा येयेलं दिन कमी सेतस!भाऊस्वनं!...कमी दिनम्हा आपले चांगलं आनी मुकलं काम करी जानं से!🌷


धन दौलत व्हयी ते गरीबदुब्या गुंता थोडंफार मदतनां मोक्या सोडी देवो!इतलां भी लोभी व्हवो नयी ते बठ्ठ मालेच भेटो!..इतला भी कंजूस व्हवो नयी गरीब खाले हाते दारवरथींनं मव्हरे चालना जायी!कर्म आनी नशीबन्हा भागे आपला पदरे मुकल भेटेल ऱ्हास!...कष्ट आनी चांगला आशीर्वाद त्यांमांगे ऱ्हातंस!दान म्हा मोठी ताकद से!...मनन्ही तयारी लागस तव्हय हातम्हायीन सुटस!.....तव्हय हात वाटत ऱ्हातंस!...🌷


भाऊ बहिनीस्वन!

गरीब व्हयी ते लोकेस्ना कामे पडो!..रात दिन याद ऱ्हायी इतला कामे पडो!तुम्हनां दारे बलावर नारस्नि लाईन लागालें जोइजे!आपले नई!...आपलं काम लोके वयखतंस!...दारे येतस!....बलायी-बलायी कामलें लावतंस!..आखो मुखे हिरदथिन मुकला आशीर्वाद दि जातस!....अश्या लोके कायम दुन्यानां मनम्हा!...नजरम्हा ऱ्हातंस!लोकेस्ना दारे कायम सुख नां रोपे लावत ऱ्हावो!मव्हरे रोपेस्ना झाडे सावली देतस!..फय-फयावळ देतस!🌷


आपले देवबानी टाइम नेमी द्येल से!टाइम सरावर बठ्ठा हिशोब करी  बयतंनं संगे बांधी लयी जाना से!बयावर लोके उब्यानां ईस्तोकडे दखथिन!राखकडे नजर टाकथिन!...चांगला-वाईट बोल मनम्हा ठी घरेघर चालना        जाथिन!🌷


भाऊ-बहिनीस्वन!

मानोस कायमन्हा निंघी जावावर मांगे त्यांनी किर्ती ऱ्हायी जास!किर्ती त्यांना कामन्ही वयख ऱ्हास!....आपले आपली वयख तयार करनी से!डोयांस्ना आंसू पुसी हासू लंयन से!...हासूनं सुख दुन्यालें वाटतं मव्हरे अशीच एक दिन निंघी जानं से!.....🌷

           🌷---------------🌷

......नानाभाऊ माळी,

मु पो ता शिंदखेडा जि धुळे( ह मु हडपसर, पुणे-४११०२८)

मो नं ७५८८२२९५४६

        ९९२३०७६५००

दिनांक-१३मार्च२०२१

तुन्हा बिगर रे मना

✴तुन्हा बिगर रे मना✴

मन्हा व्हयीसनी माले

कसा नही रे दिसना

सांग माले एक डाव

         कोठे दपी तू बसना॥धृ॥

मन्हा संगेच हासना

मन्हा संगेच रुसना

लपाछपी मन्हा संगे 

         सांग बा रे खेयसना॥१॥

धुंडी उनू घरभर

नही कोठेच दिसना 

तुले देखाना करता

         जीव मन्हा तरसना॥२॥

मन्हा कलेजाम्हा र्हास 

नही तरी बी दिसना 

डोया लायीनी बसनू

       मंग दिसना दिसना॥३॥

नही दिसना तरी बी

माले समजी तू उना

रस्ता जीवनना मन्हा

        तुन्हा बिगर से सुना ॥४॥

    --निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे

शब्दसृष्टी, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये.

दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

✴✴✴✴✴✴✴✴✴✴✴✴

तो आन् ती

 तो आन् ती


मुटकय ते दिहन

निमखाल्ते व झोपन

हायी उंढायान उन 

त्याले चौघडी वाटनं 


सर घरन आवरी 

घिस चाले  मांजनीस्ले

रानी राजानी निंघनी 

गान सुकाय म्हानले 


दुर आंबानी फांटीम्हा

राघो जोरम्हा घोरस

कथ काहीज दिशे ना 

जशी दुफार निजस


लाल्यागोल्या शेत त्यास्ना 

परधान  वावरना

जशा झिजना खंगना 

वास घाम कस्तुरीना 


चुरा कया चतकोर

मेंगराना माय तिन्ही

टाक चिडी नी मुंगीस्ले 

वनी बांध भवडीनी


चाल चालता घुसन 

धसकट टाचम्हान

तिन्ही झामलीस चोया 

रस काढे टंनटनीन


राजा पाहीसन हासे 

सोना मायेक सौसार 

काटाकुटा शेज जशी 

त्यान्ह हिरद झुंबर.


डोयाम्हान नाचस ती 

रात पुनीनी शेलाटी 

वन पिक राजीखुषी

चाले दिम्हय व दाटी..


काशी कन्या लिव्हस काव्य संग्रह

🔥काय व्हयी करतस🔥

 🔥काय व्हयी करतस🔥

झायी झाडेसनी कमी

माय धरनी हापसं

हवा पानीनी बी कमी

      नही तिसं बी भागसं॥धृ॥

देखा धरती धपसं

काय व्हयी करतसं

हिना हिरदाम्हा आग

       व्हयी आखो वाढावसं॥१॥

हिनासाठी पुरननी 

बठ्ठा  पोयी करतसं

व्हस व्हयीना ती घास

         आन्न व्हयीम्हा बयसं॥२॥

बयी ऊनम्हा तानम्हा

देखा घाम रे गायसं

अरे तव्हयच आम्ही 

            पिक पानी देखतसं॥३॥

देखा हात जोडीसनी

हायी बहिना सांगसं

बठ्ठासना जीवननी

           देखा मंग व्हयी व्हसं॥४॥

पानकाय ना दिनम्हा

पानी पानी करतसं

पानीसाठी एक एक

             देखा जीव तरससं॥५॥

       -निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.

दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३. 

🔥🌮🔥🌮🔥🌮🔥🌮🔥🌮🔥

सन उना रे व्हयीना

 सन उना रे व्हयीना

बारा महिनाम्हा उना

उना फाल्गुन महिना 

उना फाल्गुन महिना

        सन व्हयी लयी उना॥धृ॥

सन उना सन उना

सन उना रे व्हयीना 

उब्या कराले हौ उना

         पिडा रोग ना राईना॥१॥

हिव इसराले उना

हाऊ सन से उब्याना

पन कीव करा यानी

         झाडे तोडाले बी उना॥२॥

झाडे तोडीसनी उब्या 

नका करु रे व्हयीना 

हात जोडीसनी देखा

           हायी सांगस बहिना ॥३॥

म्हौरे दिन से पानीना

देख पानी बी येयीना

झाडे झुडे वनराई

        पानी तठेच रे यीना॥४॥

   --निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.

शब्दसृष्ट, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुळे. 

दूरध्वनी क्र. ९३७१९०२३०३.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...