मंगळवार, ३० मार्च, २०२१

तो आन् ती

 तो आन् ती


मुटकय ते दिहन

निमखाल्ते व झोपन

हायी उंढायान उन 

त्याले चौघडी वाटनं 


सर घरन आवरी 

घिस चाले  मांजनीस्ले

रानी राजानी निंघनी 

गान सुकाय म्हानले 


दुर आंबानी फांटीम्हा

राघो जोरम्हा घोरस

कथ काहीज दिशे ना 

जशी दुफार निजस


लाल्यागोल्या शेत त्यास्ना 

परधान  वावरना

जशा झिजना खंगना 

वास घाम कस्तुरीना 


चुरा कया चतकोर

मेंगराना माय तिन्ही

टाक चिडी नी मुंगीस्ले 

वनी बांध भवडीनी


चाल चालता घुसन 

धसकट टाचम्हान

तिन्ही झामलीस चोया 

रस काढे टंनटनीन


राजा पाहीसन हासे 

सोना मायेक सौसार 

काटाकुटा शेज जशी 

त्यान्ह हिरद झुंबर.


डोयाम्हान नाचस ती 

रात पुनीनी शेलाटी 

वन पिक राजीखुषी

चाले दिम्हय व दाटी..


काशी कन्या लिव्हस काव्य संग्रह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...