खान्देशी व अहिराणी साहित्याचे संपूर्ण व्यासपीठ! येथे वाचा खान्देशी व अहिराणी कवींच्या कविता, लोकगीते, ओव्या, लोककथा, म्हणी व सांस्कृतिक लेख. जाणून घ्या अहिराणी भाषेची गोडी, साहित्य संमेल अहिराणी साहित्य अहिराणी कवीता लोकगीते,ओव्या, लोककथा,म्हणी, खानदेशी कवीच्या कवीता,लोकगीते,ओव्या,लोककथा,म्हणी अहिराणी साहित्य संमेलन,अहिराणी बोलीभाषा,खानदेशी लेख,अहिराणी लेख, Ahirani Sahitya Blog,Poetry,Story, kaanhadeshee Saahityik Blog,Poetry,Story, Ahiran language Blog,Poetry,Story, Khandeshi Blog,Poetry,Stor
मंगळवार, ३० मार्च, २०२१
बळीराजा
🔸️कर साखर पेरणी🔸️
*[दै. श्रमराज्यदिवाळी अंक २००५ मधून प्रकाशित कविता..]*
अहिरानी खान्देशी बोली भाषा
घट्या =जातं, बहिनाबाईनं घरोटं
🔸️कर साखर पेरणी🔸️
कोठे दवडी जातसं
सासर्वाशिनना बोलं
तुले देखिसनी घट्या
तिन्हा खुलतस बोल॥धृ॥
तुन्हा सारखीच देख
धरतीबी फिरे गोल
कोडं सुटनं सुटनं
चंद्र सुर्य कसा गोल॥१॥
चंद्र सुर्य ना गतच
नियं आभायबी गोल
फिरे तसा घरभर
तुन्हा घरंघरं बोल॥२॥
कोन्ही काही बी म्हनोत
तुन्हा साखरना बोल
बोल बोल घट्या बोल
तुन्हा बोल बहुमोल॥३॥
तुन्हा बोलम्हा भेटस
देख माहेरना बोल
सासर्वाशी ना व्हटम्हा
जास दवडी ज्या बोल॥४॥
आरे माहेरना बोल
त्याले सोनानं रे मोल
घट्या तूच रे जानस
खरा बोल अनमोल॥५॥
देख सोनाना व्हतस
तुन्हा गानाम्हा त्या बोल
कर साखर पेरनी
बोल बोल घट्या बोल॥६॥
*--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर,देवपूर, धुळे.
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.
🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️
गई निसटीसन पहाट
गई निसटीसन पहाट
बाप मायले सांगस
माय म्हणस सुर्य उगवणा तो मावळस
मी तुम्णापा काय मांगस??
आव्व येडी तुना मांगमा प्रेम से
माले काय फरक पडस
लिंघी चालणात आपला दिवस
तु कसाले रडस
तुम्ही मनी तलवार आणि
तुम्ही मनी ढाल सेत
बाकीना आजी बाबा देखा
तेसना काय हाल सेत
सोबत जगा मरान्या
लिध्या व्हत्यात फेर्या
सुख-दु:ख न्या पंक्ति
आपण इसरी जाऊ सार्या
दिपक भाऊसाहेब चव्हाण
9975663626
सहजच सुचन मोहन दादा म्हणून मी लिवाना प्रयत्न कयात
धन्यवाद
🙏उनु कुणबिना पोटे 🙏
🙏उनु कुणबिना पोटे 🙏
****************************************
उनु कुणबीना पोटे
गैर्ह डोकाव्हर जाव्वी...
भार तिन्हा फेडाम्हा रे
गयी हयातीच माव्वी......1
कव्व्या खांदाव्हर लिन्ही
सौसारनी ती पालखी...
नाकेसीके पोट भरे
तैसाव्हर्नी ती डालकी....2
अख्खी हयात मी करी
रोज वावरनी वारी...
तरी बेईमान देव
नहीं मन्हा तो किवारी....3
वारकरी वावर्ना मी
नित ढेकायास्मा वस्ती...
गयी माटीम्हा पघयी
मन्हा रंगतनी मस्ती.......4
रोज भात्याम्हा भाकर
दोस्ती तीन्हासंगे खरी ...
घाटाघुग्री खाई खाई
पार हयातिले करी......5
काय कुणबीनं जीनं
जसा दाना मट्याराम्हा...
सदा तुटेल खाटना
माचा नांदे खटयाराम्हा ..6
ऊन वारासंगे रोज
जीव मन्हा पाखडाये...
माल्हे म्हलायेल चुल्हा
नितनेमे आखडाये........7
ऊन शिवारम्हा शेके
दारे सावकार भुके...
त्येल्हे देखता पपनी
कशी ठायकेच झुके.......8
================================
कवी... प्रकाश जी पाटील.
.......... पिंगळवाडेकर.....
********************
सन उना रे व्हयीना
सन उना रे व्हयीना
बारा महिनाम्हा उना
उना फाल्गुन महिना
उना फाल्गुन महिना
सन व्हयी लयी उना॥धृ॥
सन उना सन उना
सन उना रे व्हयीना
उब्या कराले हौ उना
पिडा रोग ना राईना॥१॥
हिव इसराले उना
हाऊ सन से उब्याना
पन कीव करा यानी
झाडे तोडाले बी उना॥२॥
झाडे तोडीसनी उब्या
नका करु रे व्हयीना
हात जोडीसनी देखा
हायी सांगस बहिना ॥३॥
म्हौरे दिन से पानीना
देख पानी बी येयीना
झाडे झुडे वनराई
पानी तठेच रे यीना॥४॥
*--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुळे.
दूरध्वनी क्र. ९३७१९०२३०३.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
🔥व्हयी चेटनी चेटनी🔥
*[दि.२५ मार्च २००५आपला महाराष्ट्र मधून प्रकाशित कविता...]*
🔥व्हयी चेटनी चेटनी🔥
उनी फाल्गुननी पुनी
हिना संगे उनी व्हयी
व्हयी चेटनी चेटनी
आस आभायले गयी॥धृ॥
राजा वरुण तुले रे
देख बलावस भुई
नित मरस धरती
तुले दिसस का नही॥१॥
आस मन्हाथिन मोठी
तिन्ही कर आत्ये घाई
देख पिकेसनी व्हस
बारे दरसाल व्हयी॥२॥
देख धरती बसनी
तुन्हा कडे डोया लायी
जसा जंगलम्हा मोर
नाच तसा थुई थुई॥३॥
व्हयी साठी करपनी
देखा खापरनी पोयी
व्हयी चेटनी व्हयीम्हा
गोडी हिनी बयी गयी॥४॥
*निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे*.
*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर,धुळे.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
॥ घर र्हाहे तो शाना बजार जाये तो गैबाना ॥
॥ घर र्हाहे तो शाना
बजार जाये तो गैबाना ॥
——MK भामरे बापु
१)मानोस बजार करी लयना की घर बाया त्यामा काड्या कोरेत.हाई आसच,ते तसच,
हाई म्हागं लिधं,
ते सस्त भेटस
भाजी सडेलच से
बजारले टाईम लाई दिना
तुमले बजारज करता येस नही
आश्या बोलत र्हातीस.
तवय माणोस वैतागीसन म्हणेत
"घरमा बठी बठी भलतं सुचस वं तुले.
बजार करी देख."
तवय धल्ल्या हाई म्हण आयकाडेत.
वं बस कर.घर र्हाये तो शाना नि बजार जाये तो गैबाना
२)धाकलपणे बजारमा जावानी भलती हावुस व्हती.मना बाप बजार जाये तवय मी मन्हा बापना पाठ लागु.
रडु,कुभांड करु,हातपाय झटकु.
तवय मन्ही माय मनी समजुत काढे
"देख बेटा,घरच चांगलं र्हास.घर र्हास तोच शाना,बजार जास तो गैबाना र्हास.म्हणीन घरच बठो भाऊ"
३) एकादं काम करणारा माणोस झडा तरफडा मारी काम करस.पण काड्या कोरणारा बठी बठी त्याले शान्पना शिकाडस.तवय म्हणतस
बठ रे भो ...बजार जास तो गैबाना
हाई म्हण माले भलती याद उनी,
गया १५ दिन मी घरनी बठी जबाबदारी मनावर व्हती. घरनी आवर सावर, स्वच्छता,दुधवाला,पेपरवाला,फुलवाला,धोनभांडं वाली,फरशी पुसणारी
यास्ना सोबत काम करीसनी बी घरमा पसारा,अस्वच्छता र्हाये.दुध उती जाये,
रातले गेटच हुघडं राही जाये,
च्याहानं भांडच पडी जाये,
सांडशी निस्टी जाये
कपबशी फुटी जाये
तुयसी ले पाणी टाकायनं नही
देवपुजा व्हयनी नही
आजुबाजुना झाडे कोल्ला पडनात.
अश्या गंजकच चुका,गोंधय,धांदरटपणा व्हयना.
बै मंग माले धाकलपणनी हाई म्हण याद येये.
कारण आफीसमाहीन येवा नंतर आपीन मानसे घरना बाईवर चिडचिड करतस.
अाठे पसाराज से
तठे काय पडेल से
हाई ते अमुक से
तमुकज से
अासी चीडचीड करतस.
बाहेर कितला तरास से
तुले काय समजस घरमा बठीसन.
बजारमा जाई देख,
घरमा र्हास तो शाना नि बजार जास तो गैबाना.
अासं बोलत र्हातस.
पण
या १५ दिनमा समजी ऊनं की
हाई म्हण ले आते असं बोलो का?
घर र्हास तो गैबाना
बजार जास तो शाना
त्यानापेक्षा आसं म्हणवो
घर र्हास तो शाना
बजार जास तो बी शाना
घर र्हास तो बी गैबाना
बजार जास तो बी गैबाना
अशी मिच्युअल अंडरस्टॅंडींग कराले काय हारकत से हो
घरमा आनंद ते वास करी ना!
तुमनं काय मत से मंडई?
_———©MK
शेतकऱ्याची आखजी
🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...
-
😎बाप्पाना चष्मा😎 बोट्यास्न मटण न कस रटरट शिजी ह्रायन्ह .. दारुन आंधण कस खयखय उकाई ह्रायन्ह... मायच्यान भो मन्ह बी गाव आज इकाई ह्रायन्ह.....
-
चारोया घट्यावरन्या [चारोळ्या जात्यावरच्या] (अहिरानी बोली) १]माय माय करु माय माय मनम्हा वावरे सावरस मी घरले जशी माय ...
-
🌹🌿चारोया गुलाब फुलेसन्या🌿🌹 फुले फुलेस्म्हा गुलाब फुले-पानेसना राजा हाऊ फुलस काटाम्हा हायी यानी से वं सजा ॥१॥ हाऊ फुलस काटाम्हा ...