मंगळवार, ३० मार्च, २०२१

बळीराजा

🙏🙏बळीराजा 🙏🙏
****************************************
अरे बळीराजा मन्हा
तुन्हा आंगव्हर सदा...
देखी दिनले मी तापी
आणि  रातले  नर्बदा......1
च्यारी मेर फिरे रोज
तुन्ही  नर्बदाले  फेरी...
माय तापीले व्हावाडे
तुनी  पाठव्हर्नी  शेरी......2
काढे  मीटरना  पैसा
टाके पाम्भरमा खुर्दा...
हाते  हंगामम्हा  उना
फक्त  चुनासंगे  जर्दा......3
एक हातम्हा ती शेल
एक हातम्हा पुऱ्हाणं...
गाडं जुपी रोज मांडे
राजा,वावर्फा गऱ्हाणं.....4
रोज आटापिटा घेरा 
तरी  पडे  का  गठुई...?
मारे आसमान बुक्का
करे   सुल्तान   थटूई......5
नित  घामनी  आंघोई
आत्मा तुन्हा रे पौथीर...
पाचीलेच जोडी लेस
कष्टासंगे  तू  मौथीर.......6
तुन्हा घामले  रे देखी
झायं  शिवार  पर्सन...
जीवारीना कणीसम्हा
दाये  लक्षुमी  दर्सन.......7
================================
कवी.. प्रकाश जी पाटील.
......... पिंगळवाडेकर 🙏
================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...