*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज मजार - सिक्सन परसार*
*भाग.. १९*
श्रीमंत सयाजीराव महाराज येस्ले सत्ता नी संपत्ती तेस्ना भागथाईन मियेल व्हती. पण इद्या तेस्नी तेस्ना कष्टाथाईन मियायेल व्हती. जीवनमजारली सिक्सन नी संधी निंघी जायेल व्हती. फकस्त नशिबखाल आपले परत सिक्सन नी संधी मियेल व्हती, तशी संधी बाकीना लोकस्ले मियाले जोयजे हायी तयमय तेस्ना मन मजार पयदा व्हयनी. आप्ली जनताले तेस्नी शिकाडाना ध्यास धरा. तेस्ना कारभारना पयले त्या कायले बठ्ठा राज्य मजार सात आठ प्राथमिक शाया होत्यात, तठे पोरीस्ना सिक्सन ना प्रश्नज येत नही. फक्त बडोदा सयरमजार एक हायस्कूल व्हती. इतलीच सिक्सन नी परगती व्हयेल व्हती. महाराजस्ना ध्यान मजार उन्ह की, नादारी नी रोगराई येस्न मुय कारण अज्ञान शे. आणि सिक्सन आगाजा हाऊच तेन्हावर उपाय शे. म्हणीसन गाव तठे शाय व्हवाले जोयजे, आसा महाराजस्नी ध्यास लिन्हा. हर गावमजार शायनी स्थापना करीसन लोकस्ना उंबरठा लगुन सिक्सन भिडाले जोयजे. आस धोरण तेस्न व्हत. काही वरीस्ना कायमजार. ३५०० शाया राज्य मजार चालु झायात. लाखो पोर, पोरी सिक्सन लिह्रायंतात, मोठ्ठला गावमजार हायस्कूल चालु कय्रात. तसच बडोदा मजार महाविद्यालय चालु कर. आसा परकारे आधुनिक सिक्सन ना पाया जोर मजार चालु झाया. नवल करानी गोट म्हणजे त्या कायमजार सक्तीन सिक्सन, गरीब मायबाप शाय सोडीसन आप्ला पोरसोर मोलमजुरी कराले लयी जायेत. म्हणीसन आसा नादारीना. पोरस्करता धाकल्ला धंदा चालिकरीसन तेस्नी सिक्सन नी येवस्था करी. आस सिक्सन देवा करता न्याय्रा शाय काढ्यात. कमवा नी शिका हायी कल्पना तेन्हामजार व्हती. महाराज म्हणेत, "गरीब समाजना लोकस्ना पोरे सिकनात, नोकय्रा. करतीन ते माल्हे आनंदच शे. पण आप्ल हित कसामा शे हायी जरी तेस्ले कयन तरी माल्हे समाधान शे.
इचार करा महाजस्नी १५० वरीस पयले सक्तीन फुकट सिक्सन आप्ला राज्या मजार जिद्द मजार कर. नी ते चालु ठेव. तेन्हा बद्दल एकसावा भारत सपकारना सिक्सन इषयना सल्लागार जे पी नाईक बोलनात, "सरकारले जर सक्तीन फुकटन सिक्सन देन्ह व्हयीन ते श्रीमंत सयाजीराव महाराज येस्ना आदर्श लेव्हाले जोयजे".
भारत ना समाज एकगठ्ठा व्हवाकरता बठ्ठा समाजमजार सिक्सन ना परसार जोरमा व्हवाले जोयजे आस महाराजस्ले वाटे. हरिजन लोकस्ना पोरपोरीस्ले हायी संधी मियाले पाहिजे म्हनीसन तेस्नी शेकडेागणती शाया चालु कय्रात. मुसलमानस्ना पोरस्ना करता उर्दू शाया चालु कय्रात. पोरीस्ना करता पडदान्या उर्दू शाया चालु कय्रात. भारत मजारल्या स्त्रिया जर अनाडी राहन्यात ते देशमजार नयाइचारस्नी क्रांती व्हवाव नही. पण जर एक पोय्रा ले सिक्सन दिन्ह ते तो शिकेल लिखेल बनस, पण जर एक पोरगीले. सिक्सन दिन्ह ते बठ्ठा परिवार संवसकारीक व्हस. आस महाराजस्न मत व्हत व्हत. म्हणीसन सनातन लोकस्ना इरोध पचाडीसन पोरीस्ना करता शेकडेागणती शाया काढ्यात. जंगल मजार दुर राहणारा राणी ह्या आदिवासी लोकस्ना पोरस्करता सोनगढ, व्याराले आणी आखो गयरा जागासवर आश्रम शाया काढ्यात. तेन्हामजार इद्यारथीस्न, राहन, खान, नी आभ्यास नी सोय करी. आश्रम शायासले जोडीसन खेती, इनकाम, नी सिवनकला सारखा आखो बाकीना जीवनउपयोगी उद्योग सिकानी सोय करी. पयले हरिजन इद्यारथीस्ना करता न्यारी शाय व्हत्यात, त्या आस्ते आस्ते बंद करीसन, त्या इद्यारर्थी बाकिन्या शायस्मा टाकात, नी भेदभाव नी भावना कमी करी. बिगडी जायेल पोरस्ना सुधारग्रुहसमजार तेस्नी सिक्सन नी येवस्था करीसन तेस्ले माणसमजार आण. आंधा, मुक्का, बहिरा, नी निराधारस्ना करता बडेद नी महेसाणा आठे आश्रम शाया चालु कय्रात. तेस्ना जीवन ना कायापालट करी टाक. आस्या परकारन्या शाय त्या येले हिंदुस्थान मजार कोठेज नही व्हत्यात. त्या फक्त बडोदा संस्थान मजारच होत्या. शायना पोरस्ले शिस्त लागाले जोयजे, नी शिबीर जीवन ना परिचय व्हावा म्हनीसन १९०९ साल ले बालवीर संघटना भारत मजार पयले महाजस्ना संस्थान मजार महाराजस्नी प्रयत्न करीसन बडोदाले स्धापन कर. सिक्सन हाऊ जीवन नी समस्या ना कणा शे, तेन्हा मुये राज्याना प्रश्न सुटन सोप व्हयीन.
ग्रामीण भाग मजारल्या शायस्ना गुरुजी त्याच गावस्मजारला नेमात. म्हणजे तेन्हा बी खेतीबाडी न उत्पन्न व्हयीन, आप्ला आप्ला गावमजार शाय मजार शिकाडथीन. तेस्नी दुसरा गावमजार बदली करानी नही, म्हणजे तेस्ले आप्ला गावना पोरस्करता कायजी ह्राहीन. नी त्या चांगला करतबगारी बनतील.....
. *क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा