*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी - सुराज्यानी रामपायट*
*भाग... १८*
बडोदा राज्यान करता तज्ञस्नी तयार करेल पाटबंधारा नी औद्योगिक विकास न्या योजना लोकमान्य टिळकांनी टिळकस्नी महाराजसकडे धाडेल व्हत्यात. त्या योजना महाराजस्नी आम्मल मजार लयनात.
जव्हय राज्यारोहण झाय,तव्हय महाराजास्ना हातमा प्रत्यक्ष सत्ता येल व्हती, त्या येले तेस्नी बौध्दिक पातया शायकरी पोरस्ना पेक्षा जास्ती नही व्हती. पण सदा परिश्रमनी एक पल भी वाया न घालवता आप्ली प्रतिष्ठा वाढाई. शाय काॅलेज मजार जे शिकता उन्ह नही ते तेस्नी रोज ना काम करामा गयरा शिकणात. कोणतबी प्रकरण असो तेन्हा त्या खोलवर इचार करेत. आप्ला मन नी जदलगुन खात्री व्हत नही तदलगुन त्या मव्हरे जायेत नही. हाऊ तेस्ना सभाव बनेल व्हता. हर प्रकरण ना चवकसी करीसन मंग विषय समजी लेत. त्यामुये तेस्ले बठ्ठा खातास्नी माहिती झायी. काम समजाडा करता तेस्ना कडे चतुर, नी चाणाक्ष अधिकारी येत. नी ह्या तज्ञ लोकस्ना संगे वादावादी करणे हायीच तेस्न सिक्सन झाय. तेस्नी शिकाऊ वृत्तीमुये बठ्ठी जगदुन्या तेस्ना करता शाय बनी गयी. मव्हरे तर तेस्ना आसा स्वभाव बनी ग्या की, तेस्नी तपासणी हायी अधिकारीस्ना करता दिव्य शे आस वाटाले लागी गये.
महाराष्ट्र मजारला एक मोठा इचारवंत नी समाजसेवक मामा परमानंदानी "इंडियन स्पेक्टटर" ह्या इंग्रजी साप्ताहिक मजार अनावृत्त पत्रा लिखीसन काही प्रशासक सुचना दिन्यात. महाराजस्नी त्या पत्रा चिकित्सक पणे वाचेल व्हतात. पयल. पत्र १८८९ मजार मामानी लिख, त्या म्हणतस, "महाराज! आपले उदे्शीसन ह्या पत्रा का बर लिखाले प्रवृत्त व्हयनु? कारण तुम्ही तयगायना लाकस्माईन राजा व्हयेल शेत. बठ्ठा प्राणी मात्रासवर जीव लावण आस आप्ल आंतरमन शे, वरिष्ठ सत्ताना कृपावरी आपले सिक्सन ना लाभ व्हयेल शे, एक नादारी ना परिवार मजार आप्ला जनम व्हयना, प्रजान सुखदुकनी आपले धाकलपासुन जाणीव शे, धाकलपने राजदरबार मजारला काही वाईट संस्कार पासुन आपीन सटकी ग्यात, एखादा जाणता इद्यार्थीनी, "मी राजा व्हयनु ते" हाऊ निबंध लिखत असतांना ज्या कल्पना तेन्हा मनमा येतीस तेन्हा बी पेक्षा कितल्या तरी नामी कल्पना तुम्हणा मन मजार घुमत ह्रातीस. आणि त्या इचार कल्पना, मनमा ठिसन यथाशक्ती तेस्नी अम्मलबजावणी करु शकतस आस हायी न्यार भाग्य तुम्हणा वाटाले येल शे. "नी दुसरा पत्रामजार त्या लिखतस," प्रत्येक आधिकारीले, नी मंत्रीस्ले सोता नी जाणीव होव्हाले पाहिजे. आप्ला ज्ञान ना उपयोग जनता ना कल्याण करता कसा करता येतीन हायी मनोकामना जोयजे. न्यारा न्यारा खाता मजार शिकेल सवरेल, काम मजार तरबेज, शिस्त नी नितीमत्ता असणारा माणस्नी निवड करीसन तेस्नी लायकी नुसार नेमणूक कराले जोयजे. आसा अधिकारीस्ले आप्ली नोकरीनी हमी नी सेवासरस तव्हय तेस्नी पोटपाणीनी सोय व्हवाले जोयजे. नोकरीना काय मजार जर काही चुक झायी ते, शिक्षा व्हयीन हासी तेस्ले भीती वाटाले जाेयजे. तसच तेस्नी जर चांगल काम कर ते, तेस्ले पारितोषिक, बक्षिस मियीन आसा भरोसा वाटाले जोयजे. तेन्हा करता आदिकारीस्नी नेमणूक करतांना कायजी लेव्हाले जोयजे. तसच जेस्नी चांगल काम कर तेस्ले, पदक, पदवी, मानधन, मानपान दिसन तेस्न कवतीक कराले जोयजे. मानपान नी आवड बठ्ठास्ले ह्रास. हायी आपण व्हयखाले जोयजे. "
मव्हरला एक पत्र मजार त्या लिखतस," आप्ला संस्थान मजारला न्यारा न्यारा इभागससे संबंध ठेवण. धाकला गावस्मा काय चालु शे, जनता न्या कोणत्या नड शेत हायी समजन गयर जरुरी शे. तेन्हा करता लोकजाहीर, नी मोठ्ठला दौरा काढानी गरज नही. जव्हय गरज शे तव्हय मोजका लोक लिसन दौरा करता येस. कव्हय मव्हय ते आगाजा न करता बी गुपचूप फिरता येस. तेन्हामुये खर्च वाचीन, ये नी बचत व्हयीन. आस जर कर ते जनता न्या भावना काय शेत, तेस्न्या महत्त्वाकांक्षा काय शेत, त्या कश्या शेत, तेस्नी प्रगतीले काय आड यीह्रायन्ह हायी बठ्ठ जानी लेन्ह आप्ला सारखा राजान कर्तव्य शे. कोठे रस्ता खराब, कोठे पुल पडेल शेत, कोठे येहरी नही ते तलाव नसामुये पाणीन टंचाई जाणावस. कोठे शायमा जाव्हा ले पोर शेत,पण शायज नही. नी ह्या साध्या गोष्टीस्नी जनताले दुक व्हयेल ह्रास. ते तेस्ले भोगण पडस. फेरफटका मारतस तव्हय जर एखादा खेडाना माणुस भेटना तर तेन्हासी जरुसा वेय बोल तर आप्ले जी माहिती मियस, ती आप्ला टेबलवर येणारा आधिकारीस्ना अहवाल पेक्षा कितला तरी मोलन ह्रास. राज्यकारभार चालवतांना चुका व्हतीस. पण त्या जर कोणी ध्यान मजार आणी दिन्ह्यात ते आपीन सहानुभूतीपूर्वक आयकीसन तेन्ह निरसन कराले जोयजे. आप्ले कोणा आधार नही, आप्ला गाह्राणानी कोठेच रितसर दाद लागत नही नी आप्ला कोणी वाली नही आस राज्य मजारला एक बी व्यक्तीले वाटाले नही जोयजे. जनतान समाधान एखादा सहानुभूती सबद मजार बी व्हस. ते आपण देवाले जोयजे. आम्हना राजा खरज आम्हना बाप सारखा शे, आस प्रत्येकले वाटाले जोयजे. मी त्यामुये आप्ला वारस्ना मव्हरे नी बाकीना राजाराजवाडस्ना मव्हरे एक जित्त उदाहरण ठेवाले जोयजे."
असा सहानुभूतीपूर्वक मार्गदर्शनना संस्कारक्षम महाराजस्नी आप्ली जनता च्यारी मेर कल्याणकरता मोठ्या कैशल्यानी, आणि कल्पकताना. उपयोग महाराज येस्नी करी लिन्हा. महाजस्ना कारकिर्दीबाबत बडोदा ना कवी देवास्कर म्हणतस,
दीना जना निवारा /मातेसमान थारा /
जणु हा दुजा शिवाजी /भूपाल श्रीसयाजी/
प्रगति-पथास नेता /शोभे जनास नेता /
राखी प्रजेस राजी /भूपाल श्रीसयाजी/
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
*क्रमशः*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा