गुरुवार, १ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार* भाग... २०

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार*

भाग... २०

       प्राथमिक सिक्सन ना कल ज्या गावखेडास्मा चालु शे, त्या खेडास्मा त्या खेडास्मा ज्या धंदा चालू शेत, त्या धंदास्ना बाबत भी पोरस्ले ज्ञान शिकाडाले जोयजे. त्या गाव मजारल्या पंचायतीस्नी शाय मजारल्या उणीवा झामलीसन त्या खाताकडे लगेच कयावयाले जोयजे. धाकल्ला पोरस्ले शाय मजार जास्ती ये कोंडी न ठेवता, तेस्ना कडथाईन वस्तुपाठ ना आधार लिसन सिक्सन देव्हाना प्रयत्न कराले जोयजे. गावखेडास्मा शायमा ज्या पोर येतस त्या शेतकरी,मजुर, पारंपारीक कारारगिस्ना ह्रातस, त्यामुये तेस्ना सिक्सनवर मायबापस्नी ध्यान ह्रात नही, मंग त्या पोर धड आथाना बी ह्रातस नही नी धड थनाना बी ह्रातस नही, म्हनीसन त्या पोरस्ना कडथाईन आंगमेहनत न काम करी लेव्हाले जोयजे, तेस्ले तेस्ना पारंपारिक धंदान ज्ञान देवंहानी जरूरत शे. शाय मजारल्या सुट्ट्या स्थानिक परिस्थितीतले धरीसन असाले जोयजे. राजकारण, न्याय्रा नाय्रा भाषा येन्हा मुये देशमजार स्थिती विस्कळीत व्हस म्हनीसन महाराजस्न मत व्हत, एक देश एक भाषा जोयजे. तेव्हामुये राष्ट्रआभिमान जित्ता राहिन. म्हणीसन तेस्नी बडोदा राज्यामजार हिंदी भाषान सिक्सन सक्तीन कर. न्याय, कचेरीस मजार हिंदी भाषा वापरान हुकुम सोडा.

          महाराजस्नी दुय्यम शायास्नी संख्या इतली जोरबन वाढाई की, पुण हायी इद्या माहेर घर म्हणेत पण पुणान्या हायस्कूल पेक्षा बडोदा न्या हायस्कूल मजार दोन पट पोरीस्नी संख्या जास्त झायी. दुय्यम शायास्नी संख्या वाढा मुये बडोदा राज्यामजार महाविद्यालयस्नी संख्या गयरी वाढत गयी. तेन्हा परिणाम हाऊ झाया की, बडोदा काॅलेजन रुप बदलीसन "महाराज सयाजी युनिव्हर्सिटी "आस झाय.

बडोदा मजार पोरीस्ना करता फक्त पोरीस्नी काॅलेज काढीसन ती काॅलेज महर्षी धोंडो केशव कर्वे येस्नी एस एन डी टी ह्या संस्थाले जोडी. प्राथमिक शायस्ना मास्तरनी तयार करा करता तेस्नी "फिमेल ट्रेनिंग काॅलेज" सुरू कयी. त्या काॅलेज मजार ज्या महिला सिक्सनलेत तिस्ले भत्ता चालु करा. हायी पयल राज्य होत की, महिलास्न करता सिक्सन चालु करिसन अंशतः महिलास्न सिक्सन ना प्रश्न सोडेल व्हता. त्यामुये महाराज ह्या बाकीना संस्थान, आणि ब्रिटिश इंडिया सरकाना पेक्षा गयरा मव्हरे जाईसन वाटचाल करी ह्रायतांत.

        महाराज सदान कदा म्हणेत जर पिढी घडवनी व्हयीन ती भावी पिढी मगिलाज घडावु. शकतीस, म्हनीसन त्या सक्षम पाहिजेत. त्या जर सक्षम झायात ते चांगला नागरीक घडतीन, तस कार्य त्या करु शकतीन. बिगरबुद्दीन्या बाईसमुये सवसार निरस व्हावा नी भय ह्रास. जर महिला शिकेल सवरेल ह्रायन्ही तर मानस्ले मदत करीसन चांगल घर, चांगला पोर, चांगल राज्य, चांगला देश घडू शकस. मुंबई मजारल्या शायस मजार फक्त पोरस्ना इचार करेल व्हता तठे महिलास्नी गरज, तेस्नी मनोकामना, तेस्ना स्वभाव ना कल, येस्ना आजिबात इचार करेल नही व्हता. पोरीस्न्या. शाया चालु झायात पण सिक्सन फक्त पोरस्न. व्हत. येन्हा उलट महाजस्नी महिलास्ना करता उपयोगी, नी तेस्ना मनलेभायीन अश्या महिला पाठशाया काढेल व्हत्यात. घरजीवनशास्त्र, आरोग्यशास्त्र, बालमानसशास्त्र, समाजशास्त्र आसा आखो घरले नी समाजना काम येतीन आसा इसय चालु करात. त्या आभ्यासक्रम मजार वाचन, लेखन, इतिहास, भूगोल, गणित, सयपाक, शिवणकाम, चित्रकला गायन, सामान्यज्ञान, खेय, वस्तुपाठ नी आखो विषयमनोरंजक नी जीवन मजार फायदा ना शेत, कुटुंबवत्सल महिलास्ले घर बशीसन काही काम करता येथीन. म्हणीसन "चिमनाबाई स्त्रीउद्योगालय" न्यारा न्यारा प्रकारना उपक्रम चालू करात. महिलास्ले तेन्हा फायदा बी झाया. तसच महिलास्ना करता नामी फक्त महिलास्ना करता वाचनालय दालन चालु करात  प्रत्येक जण निरक ह्राव्होत म्हनीसन खेय चालु करात, महिलास्ले शरीर कसरत नी आवड पयदा व्हवाले पाहिजे म्हनीसन क्रिडासंनेलन महाराज भरायेत.

              जुना काय मजार राजघराणान्या महिला सिक्सनले कमीपणा समजेत. तत्राप, सनातनी लोकस्न्या टीकास्ले न मानता महाजस्नी महाराणी चिमनाबाई येस्ले शोभेल आसा आभ्यासक्रम चालु कया. नंदाबाई चितळे तेस्ले इंग्रजी शिकायेत, नी सगुनाबाई तेस्ले मराठी शिकायेत. आशी डंगरी शाय (प्रौढ सिक्सन) शंभर वरीस पयले तेस्नी आप्ला परिफाईन सुरु कयी. महाराजस्ना संघे जगदुन्यामा फिरीसन महाराणी चिमनाबाई येस्नी बारीक बारीक गोष्टीस्नी पारख करीसन ग्यान मियाव. तेस्ले नामी सिक्सन मियन म्हणीसनच त्या महाराजस्ना संगे सामाजिक काम करू लागण्यात., पुणा मजार अखिल भारतीय महिला परिषद (१९२७) मजार त्या अध्यक्षीय भाषण मजार बोलण्यात, "बाईस्नीजातले मोहकपना ना सकस मनोविकार, देहविकास, नी बुद्दीविकास व्हावा म्हनीसन बाईस्न सिक्सन न्यार न्यार व्हवाले जोयजे. सिक्सन मुये महिलास्ना न्यारा न्यारा गुणधर्मस्ना विकास बी कराले जोयजे. तसच आप्ली साधी संस्कृती ग्रहण कराणी पात्रता तेस्ना आंगे आनाले जोयजे. म्हणीसन पोरीस्ना करता खास न्याय्रा शाय पाहिजेत हायी उघड शे. पोरस्ली बाकीना इषयनासंगे, आरोग्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, प्रपंचशास्त्र, बालसंगोपनशास्त्र येस्न सिक्सन देव्हाले जोयजे"

       

    *क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...