*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड महाराज येस्ना राजमजार - सिक्सन परसार*
*भाग २१*..
बडोदा मजार महाराजास्नी कलाभवन नी स्थापना करामुये महाराजस्ना डंका आख्खा हिंदुस्थान मजार झाया. ह्या संस्था मजार, रंगशाया, चित्रशाया, शिल्पशाया, नी यंत्रइभाग आणि इणकामना वर्ग चालु करात. प्रो. त्रिभुवनदास गज्जर येस्नी हायी संस्था नी भरभराटी कयी. मव्हरे ते कलाभवन मजार इंजिनिअरिंगन सिक्सन बी चालु कर. चांगला हुशार पोर परदेस मजार धाडीसन तेस्ना उपयोग कलाभवन ना भरभराटी साठे करी लिन्हा. न्याय्रा न्याय्रा इद्या, कला शिकासाठे परदेस मजार जाव्हाले पाहिजे, हायी तेस्नी कलकत्ता मजार औद्योगिक प्रदर्शन न उद्घघाटन ना येले सांग व्हत. तव्हय त्या बोलनात, "हिंदुस्थान मजार शास्त्रीय सिक्सन ना बारा वाजी जायेल शे, म्हनीसन आपीन आप्ला देशना पोरस्ले इद्या आणि कला शिकाकरता परदेस जाव्हाले जोयजे. नी तठींग शिकी येव्हानी संधी तेस्ले मियाले जोयजे. देशना जर इकास करना व्हयीन ते नुसता शिकी लिखीसन चालाव नही, ते त्याना ग्यान मजार भर पडाले जोयजे. ग्यान लेव्हाना करता ग्यानवर बठ्ठास्ना हक शे, "
पयलेपासुनच कलाभवन मजार एक प्रयोगशाय काढेल व्हती. तठे मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर नी आखो गयरा इषय. शिकाडेत. बठ्ठा हिंदुस्थान म्हायीन पोर तठे शिकाले येत. मव्हरे त्याच कलाभवन न नाव, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अॅड टेक्नाॅलाजी, नावना संस्था मजार झाय. आते तठे डिग्री न सिक्सन देतस. आसा प्रकारनी तांत्रिक सिक्सन नी सुविधा कलकत्ता नंतर भारत मजार कोठेच नही व्हती.
ह्या न्याय्रा न्याय्रा सिक्सन ना संगे भारतीय संगित पाठशाय स्थापन करीसन तेन्हामजार गायन, वादन सारख्या कला शिकाडेत. माध्यमिक, नी उच्च सिक्सन पेक्षा प्राथमिक सिक्सन वर महाराजस्नी जास्त भर व्हती, तशी तेस्नी मनोकामना पण व्हती. सिक्सन नाय महत्व आणि नामी हेतु चरित्रानी जडनघडन ह्रास. बठ्ठ्या परकारन्या सामाजिक सुधारणा लोकस्मा रुजाले जोहिजेत म्हणीसन लोकसिक्सन नी गयरी गरज ह्रास. बडोदा मजार सेंट्रल लायब्ररी नी स्थापना करी मि. बोर्डेन आणि कुडाळकर येस्ना देखरेख खाल वाचनालयनी आधुनिक पध्दतथाईन रचना करी, सेंट्रल लायब्ररी हायी त्या कायले आशिया मजारला बठ्ठास्मा मोठी लायब्ररी व्हती. तिन्ही घडावन बी आधुनिक करेल व्हती. लोखंडना बीम नी काचना स्लॅब बसाजीसन तीन तालनी तयार करेल शे. त्यामुये वर्दळ ना आवाज येत नही आणि वरपासून खालगुन चांगल उजाये पडस. तठे बालइविभाग गयरा चांगला आधुनिक पध्दतनी सुसज्ज करेल शे. त्या कायले त्या लायब्ररी मजार एक लाख ग्रंथ लोकस्ना करता फुकट वाचाले ठेल व्हतात. सेंट्रल लायब्ररी पेट्यामजार धाकल्ला गावस्ले पुस्तक धाडे त्या फिरत्या पेटीस्नी वाचनालये, सयाजी वैभव, आस नाव ठेल व्हत. बडोदा खर वैभव हायी सेंट्रल लायब्ररी शे आस महाराजस्ले वाटे. इतला जिव्हाळा तेस्ले लोकसिक्सन, नी ग्यान परसारना वाटे. बडोदा राज्यानी हायी वाचलयन आप्रुक व्हाईसराॅय लाॅर्ड विलिंग्डन येस्नी मव्हरला सब्देस्मा कवतीक कर व्हत, "मोफत वाचनालयमुये बडोदा संस्थान आगाजा बठ्ठा जग मजार व्हयेल शे, नी आसाज कितला तरी दिन ह्राहीन. ह्या राज्यामजार गावखेडास्ना करता जी फिरती वाचनालय शे ती जगदुन्यामा फक्त स्काॅटलॅड शिवाय कोठेच नही."
पयले जुना लोक शारीरीक कसरत कडे ध्यान दे नहीत. बुद्धिमान माणस जर शरीर ना निरक नही ह्रायन्हात ते त्या समाजन काम चांगल करु शकतस नही. म्हणीसन महाराजस्नी शारीरीक सिक्सन नी सोय शायस्ना करी. प्रो. माणिकराव येस्ना कडथाइन योजना तयार करीसन ती रावसाहेब दिघे आणि मनोरमाबाई दिघे येस्नी मदत लिसन नामी पद्धत मजार राबाडी. याकाम मजार तेस्नी जुना पहिलवानस्ना उपयोग करी लिन्हा. तेस्नी वाया जाणारी येय नी ताकद राज्या करता वापरी लिन्ही.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा