गुरुवार, १ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार* *भाग.. २२

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार*

*भाग.. २२*

            नाशिक, पुण, सातारा, जयगाव, धुये, कोल्हापुर, मजारल्या शैक्षणिक संस्थांस्ले महाराजस्नी गयरी मदत कयी. बहुजन समाज मजार ज्या शिकेल सवरेल लोक जुना कायमजार हुयी ग्यात तेन्ह बठ्ठ श्रेय सयाजीराव महाराजस्ले जास. महाराष्ट्र मजार तेस्नी प्रेरणामुये नामी करतबगारी पिढी तयार व्हयनी. छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात, पंजाबराव देशमुख ह्या बठ्ठास्नी महाराजस्ना कडथाईन स्फूर्ती लिसन महाराष्ट्र मजार सिक्सन परसार न नामी काम कर. महाराजस्नी महाराष्ट्र मजारला नादारी ना पोरस्ना करता बडोदा मजार सयाजी वसतीगृहामजार राव्हानी, नी सिक्सननी सोय करेल व्हती.

        १९१८ ले एप्रिल महिना मजार देवळाली ह्या थंड हवान ठिकाणले महाराज राव्हाले येल व्हतात. त्या येले नाशिक मजार तेस्ना सत्कार नी तेस्ले मानपत्र. अर्पण कर व्हत. त्या समारंभले जिल्हाम्हायीन, बाहेरथाईन गयरा लोक येल व्हतात. रावसाहेब थोरात येस्न भासण झाय, नी लगेच महाराजस्न भासण झाय, तव्हय त्या बोलनात, "आठे जमेल मंडई ना मन मजारला इचार माल्हे समजाव नहीत पण मन्हा मनमा हाऊ समाज, हायी हायली, पोरस्ना कपडा, तेस्नी राहणी, व तेस्ना आचारइचार ना मन्हा मन मजार इचार चालु व्हतात. येस्नी तुलना मी नानातह्रानी करत व्हतु, युरोप, अमेरिका या देशस्नी राहणी, तेस्नी सामाजिक परिस्थिती , तेस्नी उन्नती नी आपली हिनता येन्हा बाबत मन्हा मन मजार नानतह्राना इचार यी ह्रायतांत. येन्ह कारण मी न्यारा न्यारा देशस्मजार फिरेल मुये माल्हे तुलना कराले साधन मियन. देशपर्यटन करण हायी बी एक ग्यान न साधन शे, पट्टा ना खाले उतरेल गोट आपीन वापस पट्टावर आणू शकतस तुम्हणा मजार एकी, नी ग्यान मियानी कटबन इच्छा निर्माण व्हवाले जोयजे. सिक्सन परसारन करता मी ३० ते ३५ वरीस फाइल झटी ह्रायन्हु. तुम्ही ज्या महान इचार दाखाडात की, मराठास्ना करताच हायी संस्था नही, ते बाकीना लोकस्ना करता बी आम्हनी काम करानी तयारी शे, हायी तुम्हण कवतीक करा सारख शे, कारण आपला फक्त इकास झाया म्हणजे बठ्ठास्ना इकास व्हत नही, म्हनीसन आपीन बाकीना लोकस्ले बी मदत कराले जोयजे. मी इतलच सांगस तुम्हणा हात ले यश मियो, तुम्हणी संस्थाले मी १२ हजार रुप्या नी मदत धाडस ती तुम्ही स्विकारो. "टायासना कयकयाट मजार महाराजास्न भासन सरन.

              भारत मजार जर राष्ट्रीय एकात्मता तयार करन्ही व्हयीन ते बठ्ठा जातपात ना लोकस्ले सिक्सन मियाले जोयजे. तेस्ले ते पयदा करी देव्हाले जोयजे. 'न्यु इंग्लिश स्कूल' पुणा मजारला भासण मजार महाराज बोलणात," इद्या हायी एकज वर्गले न मियता बठ्ठा स्ले मियाले जोयजे. तव्हय आप्ल पाऊल मव्हरे पडीन. हायी ध्यानमा ठेवा. बठ्ठा राष्ट्राना लोकस्नी झटाले जोयजे, फक्त एकज समाज झटीसन चालाव नही. धाकल्लास पासुन मोठ्ठलास्ले इद्या मिया करता झटाले जोयजे, तव्हयज राष्ट्र मव्हरे जायीन, जन्मताच कोणीच मोठ ह्रास नही, हायी समजन गरजस्न शे. खेडापाडास्मा इद्यान काम नामी नी चांगल व्हवाले पाहिजे. सरवास्ले जर चांगल, वाईट समजीले लागण तर आप्ली प्रगती दुर नही. हायी समजाले हरकत नही.

बडोदा राज्य मजार साल्हेर गाव व्हत, तठे आदिवासी लोक जास्त शेत, म्हनीसन नादारी ना आदिवासीस्ना पोरस्ना करता आश्रमशाय जर काढ्यात, ते नजीक बागलाण शे, मालेगाव शे, ते तठला नादारी ना पोरस्ले पुकटन सिक्सन लेता यीन हायी कल्पना महाराजस्ना मन मजार व्हती. मंग ती योजना कशी आम्मल मजार लयतायीन म्हनीसन ते दखा करता फेब्रुवारी १९३८ ले त्या साल्हेर ले उन्हात. महाराजस्न गाव मालेगाव तालुका मजार व्हत म्हणीसन, बागलाण, मालेगाव, कवळाणा ले महाराजस्ना गयरा नातागोता व्हतात. त्यामुये साहजिक बठ्ठास्ना आंग मजार संचार व्हयेल व्हता. साल्हेर मुल्हेर ना नजीक गयर मोठ मयदान सपाट करी टाकेल व्हत. नजीक न्या येहरीसवर इंजीन बठाळीसन नळ लायीसन जागाजागावर पाणी नी येवस्था करेल व्हती. तठे मालट्रका भरीसन तांदुइ, गहुणपीठ, दायासायान्या पोता, तेलमीठ, मसाला आणेल व्हतात. आदिवासीस्नी बी जेवानी येवस्था व्हती. च्यार पाच दिन पयलेज आदिवासी लोक फाटेलतुटेल कपडास्वर झुंग्या न झुंग्या येवाले लागणात. रोज बडोदाथुन अन्नधान्यान्या मालट्रका भरीसन येत नी शेड मजार खाली व्हयेत. मुल्हेर मजारला तरणा जुवान रांधान काम करेत, नी आदिवासीस्न्या पंगती बसाडेत. हजार गणती लोक जेवण करेत. महाराजस्ना करता मलमल ना तंबू व्हता, सामने दाट गर्द निय्यीगार आमराई व्हती. नजिकच आधिकारीस्ना न्हानामोठा तंबू व्हतात. मलमल ना तंबू मजार आधुनिक सुखसुविधा व्हत्यात. दिवाणखाना, बेडरुम, डायनिंग रुम, स्वच्छतागृह, आश्या सहा सात खोल्या व्हत्यात. किडकीस्ले मस्त चुणीदार पडदा लायेल व्हतात. खाले मस्त झाडा गालिचा, रजाया, आथरेल व्हत्यात. इजना गिवास्नी सोय करेल व्हती, मजार चांदीना नय लायीसन खेयत. पाणी व्हत. बाहेर मस्त फुलझाडस्न्या कुंड्या ठेल व्हत्यात. बडोदा सरकार नी इंग्रज सरकारन सैनिक पहारले व्हत, दोनीस्ना आधिकारी व्हतात नाशिक, धुये, जयगाव ना मानपान लोके बी महाराजस्नी भेट लेव्हाले येल व्हतात. महाराज मोटारने साल्हेर ले उन्हात. त्या येल रस्तावर जागाजागावर तेस्न स्वागत झाय, सुवासिनीस्नी ओवायीसन तेस्न दांडग स्वागत कर. च्यार पाच दिन महाराजस्ना मुक्काम त्या भाग मजार व्हता, तठे येल बठ्ठा तालेवान नी आदिवासीस्ना मेढ्यास्नी बैठक लिन्ही. महाराजस्नी स्क्सनसंस्थास्न्या आडचनी समजी लिन्ह्यात. आप्ला इचार मांडात. नी तठेच आदिवासीस्ना मेढ्यास्ले तेस्नी इचार "तुम्ले काही मांगन व्हयीन ते मांगा". आदिवासीस्ना मेढ्या बोलनात, "महाराज आम्हण एकच मांगन शे आम्हना पोरस्ले शाय मजार जाव्हानी बय जबरी नको. नी दारू गायावर जी बंदी शे ती नको," ते आयकीसन महाराज थंडगार पडनात, नजीकच बशेल भाऊसाहेब हिरे नी बिडकर दादा येस्ले महाराज बोलणात," दखा जीवनभर मी येस्ना करता राबनु पैसा मोडा, पण माल्हे पायजे तशी परगती बिचाय्रा दलित आणि मागास समाज नी व्हयनी नही माल्हे हायी गोट नी खत शे. आडानी लोकस्ले आप्ल हित कसामा शे तेबी समजत नही. तुम्हणा सारखा शिकेल सवरेल लोकस्नी हायी काम कराले जोयजे. मी पयसा कमी पडू देवाव नही. आदिवासी इद्यार्थी मजारतुनच कार्यकर्ता तयार व्हवाले जोयजेत. त्याच कार्यकर्ता ह्या समाजनी प्रगती जास्ती जिव्हाळा नी तयमयनी करतीन, आस माल्हे वाटस. "त्यामुये त्या भाग मजार आश्रमशाया चालु झायात, चांगला कार्यकर्ता घडनात.

         बडोदा राज्य मजारला धानक, वाघेर ह्या गुन्हेगार वृत्तीना आदिवासीस्ना पोरस्ले आश्रमशायास मजार सिक्सन मियन नी मव्हरे तेस्ले पोलीस खाता मजार नोकऱ्या दिन्ह्यात त्यामुये तेस्नी गुन्हेगारीनी लत चालनी गयी. महाराजस्नी सातारा मजार श्री छत्रपती शाहू बोर्डिंगले भेट दिन्ही. कर्मवीर भाऊराव पाटील येस्न कार्य दखीसन त्या गयरा भारायी ग्यात. ते दकीसन महाराज बोलणात, "भाऊराव येस्नी आप्ला देश मजारली जातपात वर घाव घाला जातिभेद नी सिक्सनन कार्य तेस्नी इद्यार्थीस्ले स्वावलंबन नी प्रेरणा दिसन करेल शे. मी ज्या गाव मजार पाय ठेवसु त्या गावमजार शायनी स्थापना कपीसनच बाहेर पडसु," हायी तेस्नी आप्ली लेल सपथ खरी करी दाखाडी, येल्हे म्हणतस जिद्द,"


*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे.)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...