*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार*
*भाग २३...*
१९०७ सालले अलहाबादना लोकस्नी मानपान करा त्या पानंटावर तेस्नी लिखेल व्हत,'भारत मजारला हिंदु राजास्ना सारख तुम्ही परजाहितन काम करीह्रायन्हात तेन्हा नामी काम नी भर म्हणजे आप्ला राज्या मजार करेल सक्तीन फुकटन सिक्सन. ग्यान हायी बठ्ठास्मा पवतीर गोट शे, नादारी, रोग नी गुन्हा ह्या अज्ञान म्हायीनच घडतस,ते सर्व तुम्ही सराव म्हणीसन सुखसाधन तुम्हणी जनताले मियन. आपली कर्म ना फायदा आप्ली जनतालेच मियी ह्रायन्ही आस नही, ते हिंदुस्थान मजार गयरा लोकस्ले आपला फायदा हुयी ह्रायन्हा, आप्ली संस्कृतींना, नी आप्ली देशभक्ती दकीसन आम्ले तुम्ही प्रिय वाटतस.
बनारस हिंदू इद्यापीठ करता मदन मोहन मालवीय येस्नी महाराजसकडे एक लाखनी मदत मांगी व्हती. तेन्हावर महाराजस्नी तेस्ले एक सुचना करी, "तुम्ही तुम्हणा इद्यापीठ मजार दोन हरिजन, दोन बौध्द, दोन मुसलमान, दोन बामणस्ना आसा पोर ल्या, तेस्ना राव्हानी, खाव्हापेव्हानी बठ्ठी जिम्मेदारी गायकवाड सरकार करीन, पण मन्ही एक अट शे, हरिजनस्ना दोन पोरस्ना पयकी एकले वेद, नी दुसराले कुराण ना आभ्यास द्या. मुसलमान ना पोरस्ले एकले बायबल, नी दुसराले वेद ना आभ्यास, बामण पोरस्ले एकले कुराण, नी दुसराले बायबल ना अभ्यास, ख्रिश्चन ना पोरस्ले एकले बौद्ध धर्मना, नी एकले वेदस्ना आभ्यास शिकाडा... पंडीतजीस्नी गयरी उशीरा का होईना पण हायी सुचना मान्ही लिन्ही... महाराजस्नी बी एक लाख ना बदला मजार दोन लाखनी मदत करी. सर्व धर्मस्मा सांमजसपना पयदा व्हवो हायी महाराजस्नी तयमय व्हती. तेन्हामुये जगदुन्यामजारला गयरा कुट प्रश्न सुटी जातीन. नी सोपा व्हतीन आस महाराजस्ले वाटे. मालवीयजीस्नी बी महाराजस्ले कुलगुरू पद स्विकारानी इंनंती करी. महाराज असा थोर देशभक्त नी इद्या वर पिरीम करणारा व्यक्ती व्हतात. तसच खाशेराव जाधव, डाॅ बाबासाहेब आंबेडकर आसा गयरा हुशार लोकस्ले महाराज येस्नी इदेश मजार धाडीसन सिक्सन करा करता आर्थिक मदत करीसन सिक्सन करी लिन्ह. त्यामुये तेस्ना व्यक्तीमत्व इकास ते झाया, पण राज्याले बी तेस्ना उपयोग झाया. पाली भाषा ले जीवदान मियो, म्हनीसन पाली भाषा करता मोक्याहातनी आर्थिक मदत करीसन चांगला हुशार पोरस्ले शिष्यवृत्ती दिसन पुणाले फर्ग्युसन कॉलेज मजार पाली भाषा शिकाडाले धाड.
बडोदा मजार काॅलेज ना सुवर्ण महोत्सव मजार अध्यक्षीय भासन करतांना महाराज बोलणात, "हायी काॅलेज म्हणजे मन्हा बठ्ठा संस्था मजारली दिपस्तंभ शे आस मी मानस मन्हासमोर बशेल बठ्ठा आजीमाजी इद्यार्थी हायी काॅलेजना उपकार मानतस तेन्हामुये हायी काॅलेजना च्यारीमेर डंका वाजस. मव्हरला काय हाऊ इज्ञान ना काय ह्राहणार शे. पण इज्ञान ना मांगे पयतांना इज्ञान नी ज्ञान माणस्नाकरता शेत येन्ही जान ठेवा. आपीन आप्ला ग्यान उपयोग कसा करतस तेन्हावर अवलंब ह्रास ग्यान इज्ञानमजारल जे उदात्त नी मोठी वारस परंपरा आप्ला कडे येल शे. तो वारसा कोनताबी एक वंस नी एक देस्नी मक्तेदारी नही शे. हाऊ वारसा आप्ला सोताना आप्पलपोट्या परमाने वापराले नही पाहिजे. ते तो जास्तीमा जास्ती विकसित करीसन आप्ला गरीब, श्रीमंत, बठ्ठाच भाऊबहिनीसना कल्याण करता तेन्हा आपीन वापर करो तेन्हा करता तो शे. ह्या गोटनी जानीव हाऊज लोकशाहीना आर्थ शे. लोकशाही काय शे येन्ही जिम्मेदारी तुम्हणा सारखा सिकेलसवरेल तरणा जुवानस्नी शे. आपीन ज्या समाज मजार ह्रातस तो समाज आखो चांगला, जास्ती समर्थ नी जास्ती मुक्त करानी जिद्द हर स्त्री - पुरुष नी पोरस मजार पयदा व्हयीन. तव्हय खरीखुरी लोकशाही उजाया मजार येइन. ग्यान, इद्यान येन्हा केंद्रबिंदू माणुस शे. हर माणुस्नी येन्हा उपयोग सोता पुरता न करता बठ्ठा समाजकरता कराले जोयजे. तेन्हामजारच बठ्ठास्न कल्याण शे आस महाराज नमुदबन बोलनात. "
महाराजस्नी इंग्लंड, अमेरिका, नी फ्रान्स मजार बी गयय्रा संस्थास्ले देणग्या दिसन मदत कयी नी तेस्ले उपकृत कर. हायी बठ्ठ दख की महाराज येस्नी कितलमहान सिक्सन परसारन व्याप कितला अफाट व्हता हायी ध्यान मजार येस. सिक्सन परसारना तेस्नी ध्यास लेल व्हता. जगदुन्यामजारली, रोगराई, नी संघर्ष जर मिटायना व्हयीन ते सिक्सन हाऊच रामबाण हाऊज उपाय शे अशी महाजस्नी धारणा व्हती.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा