🕊️🌱🕊️🌱🕊️🌱🕊️
*व्हावा तुमीन हो उतराई*
कडक शे उंडायान ऊन
म्हना येवं येवं चिवताई
लावा आंगलम्हा तुमीनं
घरेघर पुन्यांनी पानपोई ...
टाका मूठभर हो दाना
भलेज खावा रसमलई
तुमीन जगाडा पखाडा
मने भाये ते जीव लाई ...
नाचूद्या तेस्ले आंगलम्हां
धाबा वरे किलकिलाई
पाखरे त्या सेत जंगलना
तुम्ही तोडी हो आमराई ...
दाना पानीना सोध करी
जीवनी ती रे लाही झाई
सांगा तुमीन आते खरं
भुक्या पोटे कसं उडाई ...
लावा झाडे राने रे वने
जगाडा तुमीन वनराई
निसरगाना नेम पाया
व्हावा तुमीन हो उतराई ...
✍️✍️✍️
कवी विजय व्ही.निकम
धामणगाव ता.चाळीसगाव
मो.नं.८८८८९४५३३५
🕊️🌱🕊️🌱🕊️🌱🕊️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा