🌹🌹बैल 🌹🌹
********************
********************
बैल शीरमंती मन्ही
बैल खयानं वैभव...
ज्येना खुटावर बैल
तोच सांगी आनभव..... 1
त्येनी घंटीम्हा सासुल
बैल राखोया खयाना...
बैल देखाडे डोयाले
हिर्वा आधार मयाना... . 2
बैल कुणबीनं धन
बैल कुणबिना देव...
त्येना दमव्हर चाले
कुणबीनी उठाठेव.......3
बैल खयाम्हानी रास
बैल आगारीना घास...
त्येना कमाईना बये
जास पितरेस्ले वास.....4
दिसे बैलना जगाम्हा
त्येन्हा त्यागनं कीर्तन...
करी देस कुणबीले
त्येनी हयाती आर्पन.....5
म्हणे गायना पोटम्हा
देव तेहतीस कोटी...
बैल तिन्हापोटे बाकी
ठोन्ग समदीच खोटी...6
चाले बैल वावरम्हा
खुर उमटाडे सप्त्या...
त्येनी कमाई तंगाडे
तुन्या सावकारी जप्त्या.7
================
*******कवी *********
प्रकाश जी पाटील......
...... पिंगळवाडेकर....
================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा