शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

नातं कुणबीनं

...🌹नातं कुणबीनं 🌹...
नातं कुणबीनं र्हाये 
ढोरे ढाकरेस्ना संगें... 
रोज दिवाबत्ती त्येनी 
घाट्या घोगरेस्मा रंगे......1
जसी पोटनी औलाद 
असा  लाये तेस्ले जीव...
झूला गोंटासन्या टाके 
नांदे कलेजाम्हा कीव.....2
भुली जाये पोटपानी 
पैल्ह्ये तेस्नं चारापानी... 
तेस्ना  दमव्हर  डोले 
वावरम्हा  आबादानी.....3
ढोरे पोरेंस्मा रे कधी 
न्हई  त्येना भेदभाव... 
नंदू, चंदू, उंद्री, सुंद्री 
देये   जित्रपले  नाव...... 4
दिनरात  ती  हयाती 
खेत, वावरम्हा खपे... 
मह्येनाम्हा चार दिन 
खये खट्लाम्हा जपे...... 5
म्हणे शेजीले आस्तुरी 
राम,  दिनले  मयाम्हा...
रोज  खयाम्हा  रातले 
नुस्ता  नावले  गयामा.... 6
झाया  बेईमान  नर 
तोडं पिढीजात नातं... 
कशी भेटी रे दीवाले 
धव्या पेमडुनी वात ..... 7
:::::::::::::::::::::::::::::::::::::
********कवी ********
.........प्रकाश जी पाटील. 
पिंगळवाडेकर 🙏🙏🙏
********************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...