रविवार, १६ एप्रिल, २०२३

अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं

जय मानवताभिमानी!
     
अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं;

अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं
यानी समाज,कुटुंबनं पिरेमसौख्य उचाट!।।धृ.।। 

बायको नई र्हास ती नवरानी रेंजमा! 
ना बाप-बेटाबी त्या ईचार-संवादमा! 
जोडे हुईस्नीबी हालावतस नई व्हट! 
आशी झाई नातास्ना दुरावानी गोट! 
आशी कोनामुये यार उनी हाई बिप्पात?
अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं..।।१।। 

आक्षी फसवणूकना मेसेज वाचीस्नी
सदा हाणामारीना व्हिडिओ दखीस्नी
प्रत्येकजन घाबरीस्नी अलिप्त, निमूट! 
कोनामुये बरं समाजमा हाई फाटाफूट? 
आशी कोनामुये यार उनी हाई बिप्पात? 
अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं!..।।२।। 

शिकामिषे ती मोबाईल कानले लाईस्नी
ल्हेस सुनावा देखी सजनाले बलाईस्नी! 
मायबाप चकित! कुवारीनं देख्ता पोट!
समदास्नी उतारी संस्कृतीले मौतघाट! 
आशी कोनामुये यार उनी हाई बिप्पात? 
अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं!..।।३।। 

अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं! 
यानी समाज,कुटुंबनं पिरेमसौख्य उचाट!।।धृ.।। 
🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
©️®️गुलाबराव धंजी मोरे,धुळे 
मो. ९४०४१९०४३२
दि. १६. ०४. २०२३

याद तुमले येस हुई …आपली माय नि ते याद तुमलेबी येस हुईयाद येस वो कितली वाटे का बरं चालनी गई…

॥श्री॥

            याद तुमले येस हुई …


आपली माय नि ते याद तुमलेबी येस हुई
याद येस वो कितली वाटे का बरं चालनी गई…

घट्यावर बठेल ती गहू दयता दिससं
घाम गयसं आंगना घट्या तसाज व्हडसं…

मांडीवरनं लेकरू खाले वर वर व्हस
मांडी हालता हालता त्याले झोकाज वाटस …

निजस ते बिनघोर मांडी मायनी ती प्यारी
कष्ट करस माय नी लेकरू निजे बिनघोरी…

रोज दयनं कांडन हरबरा तोर दाय
भरडी कांडी तेल लाई मडकाम्हां भरे माय …

हात पाटलान्या शेवया कुरडाया नि पापड
पोया गुईन्या नरम चुलावर ते खापर …

रशी मायना हातनी लाय गयस आते भी
भज्या लोनिना तो गोया खीर गहूनी चाटू मी..

काय काय याद करो जठे तठे ती दिससं
आजूबाजूले फिरस आज आतेबी वाटसं …

माय जीवना जीवडा माय सुगंधी केवडा
मायना करता बठ्ठासना जीव हुई जास येडा…


प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १६ एप्रिल २०२३
वेळ : दुपारी ३/०३

वाचण्यापेक्षा नाचण्यात मजा

वाचण्या पेक्षा नाचण्यात मजा

आजच्या पिढीला वाचण्यापेक्षा नाचण्यात जास्त आनंद आहे . जयंती जोरदार साजरी होते पण महामानवाने दिलेला उपदेश फार कोणी पाळताना दिसत नाही. आज किती जणांनी आंबेडकर वाचले आहेत ? किती जणांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे ? 

आजपर्यंत जे जे संतमहात्मे होऊन गेले. त्यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करतात. पण त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालणारे कमीच.
उलट राजकारणी, स्वार्थी लोक त्यांच्या मतलबासाठी याचा उपयोग करून घेतात आमचे गांधी, आमचे नेहरू, आमचा नथूराम, आमचे टिळक . अ‍ामचे शिवाजी महाराज, आमचे आंबेडकर, अ‍ामचे फुले, शाहूमहाराज. ही अशी वाटणी करून घेतली आहे. 

गेल्या वर्षी एका मोठ्या सिक्युरिटी कंपनीत मी मॅनेजर म्हणून काम करत होतो. तर आंबेडकर जयंतीच्या दोन दिवस आधी एका लेडी गार्डने मला विचारलं सर मला दोन दिवस सुट्टी पाहिजे. मी विचारलं कशासाठी ? तर ती म्हणाली सर, परवा आमचा सण आहे. मग मला रागच आला. मी तिला विचारलं तुमचा सण म्हणजे काय ? आंबेडकर तुमचेच आहेत का ? आमचे नाहीत का ? *आंबेडकरांनी संपूर्ण भारत देशासाठी कार्य केलेलं आहे. ज्याचा सर्वांनाच आदर असला पाहिजे*. हे ऐकल्यावर तिने मान खाली घातली आणि म्हणाली, सॉरी सर . यापुढे मी असं बोलणार नाही . आणि मग मी तिला एक दिवसाची सुट्टी सँक्शन केली.  

आध्यात्मिक क्षेत्रही याला चुकलेलं नाही कोणी म्हणे आम्ही स्वाध्यायी, कोणी म्हणतं आर्ट ऑफ लिव्हिंग. कोणी म्हणतं आम्ही निर्मलादेवीचे तर कोणी कलावती आईचे. कोणाचा मठ, कोणाचा आश्रम तर कोणाचा आखाडा. समजा एखादा स्वाध्यायी स्वामी समर्थ शिष्या बरोबर चर्चा करत असेल तर ते दोघंही एकमेकाला आमचा मार्गच कसा खरा परमेश्वराच्या जवळ घेऊन जाणारा आहे . हे पटवून देण्याचा मागे असतात. खरं तर एकमेकांच्य‍ा चांगल्या विचारांच‍ा आदर करण्याचीच अ‍ापली मानसिकता असायला हवी. 
  
देवही माणसाने वाटून घेतले आहेत आणि प्रत्येक देवाला त्याचा वार ठरवून दिलेला आहे त्याच दिवशी त्या देवाचं नाव घेतलं की खूप मोठं पुण्य लाभते म्हणे . सोमवारी महादेव लवकर पावतो. गुरूवार दत्ताचा, शनिवार शनिदेवाचं महत्व. मंगळवार,
 शुक्रवार देव्यांचे वार. या दिवशी देव्य‍ांची पूजा केली तर त्या लवकर प्रसन्न होतात का ? 

परमेश्वर म्हणजे काय ? तर तो सद्गुणांचा समुच्चय आहे तुम्ही त्याला मूर्ती बनवून पूजा करा किंवा मनातल्या मनात ठेवा. परमेश्वराची आराधना, पूजा म्हणजे त्याच्यातल्या सद्गुणांची पूजा, आराधना . त्याच्यातले सगळे सद्गुण माझ्यामध्ये येऊ दे आणि माझ्यातले दुर्गुण निघून जाऊ दे ही प्रार्थना करायची हेच खरं अध्यात्म .
अजय बिरारी

अहिरानी प्रेम गीत

शनिवार, १५ एप्रिल, २०२३

मी धाकली व्हतु ना तदय गुढीपाडवा येना ते मना बाबाले सांगु दादा बठा गली मा आपली गुढी मोठी पाहिजे बर इतला लांब दंडा काडी द्या सकाय गुढी पाडवा अस आम्ही गल्लीना पोरी पोरे बठा नदिमा दांडा धवाले जाऊत संध्याकाय ले पाच वाजता जाऊत मी मोठी से दोन भाऊ लहान शेत पण मी ठिकाणे मनी हजेरी राय नदिमा वर आदिनी दांडा पाणी मा सोडाना तो दांडा वाहत वाहत खाले ये आखो तो दांडा धरिसन पाणी मा

मी धाकली व्हतु ना तदय

मी धाकली व्हतु ना तदय गुढीपाडवा येना ते मना बाबाले सांगु दादा बठा गली मा आपली गुढी मोठी पाहिजे बर इतला लांब दंडा काडी द्या सकाय गुढी पाडवा अस आम्ही गल्लीना पोरी पोरे बठा नदिमा दांडा धवाले जाऊत संध्याकाय ले पाच वाजता जाऊत मी मोठी से दोन भाऊ लहान शेत पण मी ठिकाणे मनी हजेरी राय नदिमा वर आदिनी दांडा पाणी मा सोडाना तो दांडा वाहत वाहत खाले ये आखो तो दांडा धरिसन पाणी मा फेकाना अस करत आम्ही भी अर्धा वल्ला वही जाऊत जर रस्तामा दांडा हात माईन सुटी जाय ते आ खो परत नदीमा दांडा धवाले . मग घर उनुत का पाटला वर मनी आजी तो दांडा एक कोप राले उभा करि दे मग मना बाबा पहाटमा गुडी साडे तीन चार वाजानी उभी करी दे मनी मायनी चार वाजानी चुलावर दाय शिजी जाय तवय गॅस वतात पण चहा पुरताज वापरेत सरी जाई मानसेसन गॅस नी हंडी लेवाले जावान बनाऊ नही तवय घरपोच हंडी ये नही आमना समोर माळी समाजना धल्ला राहे तो तीन वाजानी गुडी उभारे मनी आजी सांगे तो भाऊनी तीन वाजानी गुडी उभी राही गई मना बाबा सांगे त्याले काय काम से भकवा ले पंधरा दिनमा चाऊदस ये आणि आमण्या गवराया बसेत सकाय मासात वाजता टिपऱ्या चोमय तांब्या लिसन पंधरा वीस पोरी जाऊत नदिमा पाणी लेवाले त्या पाणी घाई गवराई धुवूत पाणी लयान काय अशी तशी नही आंबाना पानटा तोडूत मज्याना चिं पट दगड नी तई लेऊत कळसनी गत सजा डी गाणा म्हणूत तांब्या घसडू त थडीवर ठेवूत आई थडी न्या पोरी ती थडीन्या पोरीसनी संगे झगडूत दोन तास आमन युद्ध चाले अशी समजा खेळ खेडूत घर येऊ तयारी करी पाय पाय एक बाजू थीन तीन किलो मिटर शाळा मा जाऊत आते कती से गवराई मनी पोरले माहीत भी नही पोरी काय करथीन वीस पंचवीस वर्षे ना काळ मा एवढा बदल व्हई गया नदी भी राहीनी नही पहिले सनीगत मानंस भी राहीना नहीत पहीले गत आभ्यास क्रम भी राहिना नही पहिले काय व्हत धडया खालील प्रश्न उत्तरे गृहपाठ आते पोरे कोणता अभ्यास करतस तेजसमजत नही

हात शेवईची कलामैदा भिजवा पाण्यातसोडा पापडाचा खारमीठ शेंधा कुटण्यात

हात शेवईची कला
दिनांक १४/४/२३

हात शेवईची कला
मैदा भिजवा पाण्यात
सोडा पापडाचा खार
मीठ शेंधा कुटण्यात

एक एक वडी करा
ठेवा ओल्या कापडात
लांब वळी ओढोनिया
शोभे ऐट तबकात

हात चाले भरभर
पीठ धावे भरभर
ओढ येई हातावर
फिरवावी गरगर

सखी स्नेहाची धावते
मध्यावर घाली हात
दोन हात गरगर
जाते बाई टोकरात

हवा असावी घरात
जणू केश कांती भासे
झाली चिप्प हातावर
उडवती सारे हासे

केस लांबसडक ते
भासे शेवयी रुपात
गोरी गोरी लांब लांब
मग शोभे कापडात

दूध शेवयी खायला
सारे कसे जमतात
वेलदोडे केशरात
तुपावर भाजतात

खीर किंवा उकडीचे
दूधातून मजा देई 
वाटीभर खिरीमध्ये
सुके मेवे आई नेई

मस्त अंगत पंगत
भोजनात येई मजा
खीर स्वाद घेण्यासाठी
काढा की थोडीशी रजा

खीर उपमा करावा
नच चरबी वाढावी
आरोग्याच्या पदार्थांना
रुची सदैव जोडावी

डबा लांबट आकार
वर्षभर साठवावा
आले गेले पाहुण्यांच्या
स्वागताला पाठवावा

शेवईची कला न्यारी
भिजवते सुगरण
नयनांच्या भुरळीत
ममत्वाची पखरण

सौ शोभा प्रकाश कोठावदे नवी मुंबई

डाॅ.बाबासाहेब जयंतीप्रकाशाचं दान

डाॅ.बाबासाहेब जयंती

प्रकाशाचं दान
 
बाबासाहेब, माणसांना दिलं जगण्याचं भान
काळोखातल्या आयुष्याला दिलं प्रकाशाचं दान // धृ//

जगणे जेथे मुश्किल होते, दारिद्र्याचा सुकाळ
भीमाबाई आई आणि पिता रामजी सकपाळ
कुटुंबातल्या या गरिबीची होती तुम्हास जाण
काळोखातल्या आयुष्याला...../१/

चिंतनात मनी मार्ग मिळाला, शिक्षण घेण्याचा
जिद्द ठेवुनी सारे मिळुनी, सुशिक्षित होण्याचा
हक्कासाठी लढूया सारे, शिक्षण हे वरदान
काळोखातल्या आयुष्याला....../२/

विचारधारा ज्योतिबांची,  शिरोधार्य मानुनी
वेचले संपूर्ण आयुष्य, संघर्षातच झुंजुनी
लाभली साथ पत्नी रमाची, खंबीर धीरवान
काळोखातल्या आयुष्याला....../३/

शिष्यवृत्ती सन्मान मिळता, परदेशी प्रयाण
घेऊन संधी परदेशात, अव्वलतेचा मान
तरबेज ग्रंथालयी वाचन, चिंतनातले ध्यान
काळोखातल्या आयुष्याला....../४/

मिळविल्यात पदव्या विविधांगी, बहू विषयक
न्यायशास्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ प्रबंधक
राजनीतिज्ञ, हृदयस्थ, समाजसेवक जाण
काळोखातल्या आयुष्याला....../५/

जपले शाहू फुले विचार,  भारतरत्न तुम्ही
दिले भारतीय संविधान, कायमचे ऋणी आम्ही
जरी धर्म भाषा अनेक, दिले ऐक्यनियम ज्ञान
काळोखातल्या आयुष्याला......./६/

दिला संदेश  धर्म , माणुसकी संविधानात
दुमदुमले नाव देशाचे, लोकशाही जगतात
जोवरी सूर्य चंद्र नभी, गाणार तुमचे जयगान
काळोखातल्या आयुष्याला दिलं प्रकाशाचं दान/७/

सुशीला हेमचंद्र पिंपरीकर, नाशिक

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...