बडोदा संस्थान ना उगम... भाग १...
समशेरबहाद्दर सरदार दमाजीराव गायकवाड ह्या महाराष्ट्र मजार मोठा पराक्रमी वीर पुरुष हुयी ग्यात. तलवार हात मजार लिसन युद्धभूमीवर घोडा पयाडणारा ह्या पयला गायकवाड होतात. त्या मोठा घमेंड मजार सांगत "जीन घर जीन तक्त" (घोडानी खोगीर हायीच मन्ह तक्त, तेज मन्ह घर).
गयरा धामधूम ना काय होता तो, महाराष्ट्र मजार तव्हय छत्रपती शाहू गादीवर व्हतात, मोठा बाजीरावना घोडास्न्या टापास्नी दिल्ली दनानी सोडेल व्हती. सेनापती दाभाडे येस्नी गुजरात मजार मोगलस्ले काठवाठ लगुन पयाडी सोडेल व्हत, आणि तेस्ना अंमल बसाडेल व्हता, सेनापती दाभाडे येस्ना खांदाले खांदा लायीसन गयय्रा लढाया जोरबंद लढेल व्हत्यात. ह्याज दमाजीराव येस्नी लखलखती तलवारना पातावर गायकवाड घराना नी इज्जत आणि वैभव वाढायेल व्हत. उत्तरले पंजाब पासुन पुर्व ना बंगाल लगुन तेस्नी घोडदौड चालू ह्राहे. आणि श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्याच पराक्रमी खानदान ना व्हतात.
ह्या गायकवाड घराना ना इतिहास गयरा मनमोहक शे, येस्ना मेढ्या नंदाजी, येस्नी म्हणे वाघ ना जबडाम्हायीन गाय वाचाडी होती, आणि ती आपला दरवाचा म्हणजे कावड ना मांगे दपाडेल व्हती म्हणीसन लोक येस्ले गाय - कवाड म्हणु लागणात. गायकवाडस्न मुळ भरे ता हवेली जि पुणे हायी शे. नंदाजी ना कामधंदा म्हणजे खेती बाडी करान. तेस्ले च्यार आंडोर व्हतात, तीन आंडोर खेती खरेत,नी चवथा आंडोर दमाजी हाऊ बाजीराव ना सैन्या मजार होता. दमाजी येस्नी दिल्ली ना बादशहा निजाम उल हक येस्ना पराभव करा व्हता, म्हनीसन छत्रपती शाहू महाराज येस्नी तेस्ले समशेरबहाद्दर हाऊ किताब दिन्हा व्हता. तेस्ले आंडोर नही व्हता म्हणीसन दमाजी मरावर तेस्ना भाऊ झिंगोजी येस्ना आंडोर म्हणजे पिलाजी सरदार झाया. पिलाजी गयरा पराक्रमी निंघनात. पिलाजीराव गुजरात मजार सोनगढ ले किल्ला बांधीसन राव्हाले ग्यात.
ह्याज सुमारले बडोदा सयर पट्टण नी नवाब नी बेगम लाडबीबी हायी नवराले सोडीसन वाली ह्राहे. तिन्ही आप्ली सोता नी राजधानी बनायेल व्हती. ती राजकारण मजार कुशल आणि दुरना इचार करणारी व्हती. तिन्हा मर्जी मजारला एक गुलजार सुतार बडोदा सयरमजार बायाबापडीस्वर जुलूम, आत्याचार कर. लाडबीबी ना कारभारी देसाई येस्नी व्हहुज हाऊ सुतार पयाडी लयी गया. आणि मंग त्या संतापेल देसाईनी बेगमवर चढाई करा करता पिलाजीरावस्ले बलाव्ह. त्या संधीन सोन करा करता पिलाजी रावना घोडा च्यारी मेय हर हर महादेव ना गजर करत दौवडनात, मंग जवय पिलाजीरा येस्नी लाडबीबी ले हाराव, नी बडोदा काबीज कर, म्हणीसन छत्रपती शाहू महाराज येस्नी पिलाजीरावस्ले भरे, नी चाकण नजीक दावडी ह्या पुणा जिल्हामजारला गाव इनाम दिन्हात...
थोरले बाजीराव पेशवे नी खंडेराव दाभाडे येस्ना मजार सत्तास्पर्धा व्हती, निजामवर चाल करा करता जव्हय दक्षिणकडे जायी ह्रायतांत तव्हय दाभाडे येस्नी तेस्ले आपली शीव मजारतुन जाव्हाले इरोध करा, म्हनीसन डभईगाव नजीक तेस्नी लढाई सुरु व्हयनी, त्या लढाई मजार पिलाजीराव बाजीराव येस्ना बाजुकडथाईन लढऩात, लढाई मजार खंडेराव दाभाडे मरी ग्यात, त्यामुये गुजरात मजारला मराठा सेनापती ना आधिकार पिलाजीराव येस्ना कडे उन्हात. मंग मव्हरे आमदाबादना बादशाहनी तेन्हा सुभेदार अभयसिंह येल्हे पिलाजीराव येस्ले घातपात करीसन माराले धाड, तेस्नावर हल्ला करा, त्या जखमी झायात, तेस्ले पालखी मजारतुन उचली सन मारी टाक. पिलाजीराव येस्ना दोन नंबर ना आंडोर दमाजीराव (दुसरा) गयरा शूर निंघना, तेन्हा पेशवास्ना सरदारस्ले बी, आणि मोघलस्ना सेनापतीले बी चितपट करीसन पाणी पाज आणि बडोदा संस्थान नी स्थापना करी.
*हायी लेख माला श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी जयंती ११ मार्चले शे तदलगुन लिखाना प्रयत्न करसु हायी लेख माला मा निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो, हायी पुस्तक ना आधारवर शे*
.
.. आपला
सुरेश पाटील... (भाषांतर)