बुधवार, ३१ मार्च, २०२१

निकाल

 🙏😄निकाल 😭🙏

****************************************

कसा लागना निकाल

कोठे  दंगा  कोठे धूम...

कोन्हा गाजना हल्लर

कोन्हा चुल्हा सामसूम....1

गन्ज करे आटापिटा

बेवड्यास्ना फौजफाटा...

लाये हज्जारबी नेटा

ईर्षा  खेये छापाकाटा.....2

मारे आभायमा उड्या

देखा गुलालना ताठा...

कसा जपाडा सज्जन

लाल  करा  बरामाठा.....3

बरं झायं मुक्का व्हता

ढोल तासाना आवाज...

यंदा सुतळ्याबी फुस्का

नही मिटाडी  रे खाज.....4

हाऊ नोटा मोठा खोटा

त्येनी दिन्हा जोर लाई...

दोन  फुलीकर्ता चित्ती 

झायी  पॅनेलनी  बाई......5

सातपैकी सात जागा

आमी जीकी दखाड्यात

टोप्या कांजीन्या मयेल

कश्या खाले झुकाड्यात.6

आठ  दीन  नबेदा  मी

भरू  नका  दादा रागे...

जाऊ कोठे ग्रुप सोडी

फिरी  उनु  बागे  बागे.....7

😄😄😄😄😄😄

***************************कवी *********

प्रकाश जी पाटील ====

=====पिंगळवाडेकर🙏

---------------------------------

अंजली पाटील भादलीकर!

 👑💍👑💍👑💍👑💍👑💍👑💍👑

                   अंजली पाटील भादलीकर!

♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

          जळगाव जिल्ह्याम्हातल असोदा गावले लोक वयखतस ते बहिणाबाई चौधरींन जलम गाव म्हणीसन. या आसोदाना बगलमा एक भादली नावन गाव से आठे एक क्रांती झाई. त्या घटनाकडे बठा महाराष्ट्रान ध्यान गे. या गावमा अंजली पाटील नावना एक तिसरा पंथनी व्यक्ती गराम पंचायतमा निवडी ऊनी. हाई राज्यम्हाईनी पहिली घटना से. ती आपला खान्देशमा झाई. अंजली पाटीलले खान्देशी मतदारासनी मते दीसनी निवाडी दिन. त्या बठा अहिर मतदारसन अभिनंदन!

          लोक तृतीय पंथीले हिजडा म्हणतस, ते कोणी छक्का म्हणतस, ते सुधारित भाषामा किन्नर म्हणतस. ते असा हाऊ तृतीय पंथी जलम म्हणजे निसर्गना हातेवरी देवबाना हातेवरी व्हयल एक अपघात ऱ्हास. स्त्रीन मन पुरुषना दिह(शरीर) बंदिस्त म्हणजे तृतीय पंथी जलम. ते असा हाऊ इसम धडबाई बी नही नी माणूसबी नही ऱ्हास. त्याले समाज आँगे करस नही. हजारो वरीस फाईन या वर्गवर आपुन अन्याय करी ऱ्हायनूत. दुसरा सोडा पण खुद जलम देता मायबापले सूद असा जीवनी लाज वाटस. त्याबी त्याले नसटस करतस. आसडपासड करतस. त्याले घराम्हाई हाकली देतस. पन आते त्यासले बी बरा दिन ई ऱ्हायंनातं एक ते कोरट नी कायदानी त्यासले नागरी हक्क दिनात. त्यासले बी बाया माणसे सारख जीवन जागांना अधिकार भेटना. त्या शिक्षण, नोकरी, राजकारणना अधिकार दिना. 

     *तो अधिकार धरिसन अंजली पाटील हाई पहिली तृतीय पंथी व्यक्त महाराष्टमा निवडी उनी* महाराष्ट्रमा हाऊ तिसरा पंथना निवडी येवाना पहिला मान जसा अंजली पाटीलले भेटना तसाज तृतीय पंथीले निवडी देवांना पहिला मान हाऊ खान्देश कडे जास. आते हाई राज्यमा रेकोर्ड बनी गे. त्या बदल अंजली पाटील नी खान्देशन अभिनंदन!

         यांना पहिले mp मा एक कमला मौशी नावांनी खासदार निवडी येयल व्हती. एक महापौर बी निवडले व्हती. तीन नाव मी इसरी गऊ. आते हाई आपली अंजली पाटील. 

           रामायणमा बी यांना उल्लेख से. राम, लक्षुमन नी सीता वनवासले न्हीगनात तवय त्यासले पोसाडाले बठी परवान त्यासना संगे गई. शिववर जाताज प्रभूरामचंद्र त्यासले बोलनात. भाऊ बहिणीसव्हन कलियुगमा राजा नही ऱ्हावाव. जनतान राज ई. त्या वखत नरनारी राज्य करथिन हाऊ वर मी तुमले देस. आते तुम्ही बठा नरनारी मांगे फिरी घरेघर जावा. तवय नरनारी मांगे फिरनात पन तिसरा पंथना लोक जागावरज उभा ऱ्हायनात. तवय रामनी इचार "काय रे भो तुम्ही ग्यात नही?" तवय त्या बोलनात "आम्ही ते नर बी नईत नी नारी बी नईत मधला सेत आम्ही!" नी मंग रामनी त्यासले सांग कलीयुगमा तुमनबी राज ई. जावा घर. नी त्या बठा घर ग्यात. 

         तो रामना वर आज सफल झाया. लक्ष्मी सारखा तृतीयपंथी लिखी भुशी विद्वान झाया. गनेक हिजडा चांगला कामे करी ऱ्हायंनात. आते आज आपलं भावंड अंजली ग्राम पंचायत सदस्य झाय. या बठासले सलाम. 

         आपुन कर्तबगार बाईना उल्लेख बहिन म्हणीसन करतस, कर्तबगार माणूसले भाऊ म्हणतस तस कर्तबगार तृतीय पंथीले भावंड म्हणाले सुरवात करा. 

          पराभूत अपयशी व्यक्तिले समाज हिजडा म्हणस. ते आते बंद करा. हिजडाबी पराक्रम करी ऱ्हायनात. यशस्वी व्हई ऱ्हायनात, विजयी व्हई ऱ्हायनात. मर्दुमकी हाई काय फक्त पुरुष वर्गनी मक्तेदारी नही ऱ्हायल भाऊ, पराक्रमी, मर्द पुरुष सेत तशा मर्द बाया बी सेत, नी मर्द हिजडाबी सेत. हाई दुरुस्ती बठा झन करी ल्या. 

         स्त्री ती बहिन, पुरुष तो भाऊ आणि हिजडा ते भावंड तिन्ही बी मानव सेत. एक सेत. 

        भावंड अंजली पाटील सलाम तुनी गाजाडेल मर्दुमकीले. आगे बढो. भविष्यमा आंखो मोठा व्हय. आमदार व्हय, खासदार व्हय, मंत्री व्हय. मुख्यमंत्री व्हय. 73 वरीसमा खान्देशी माणुसले मुख्यमंत्री व्हता ऊन नही. तुले जमस व्हई ते दख अंजली! तुना रुपमा का व्हयना एक खान्देशी मुख्यमंत्री दखु ते. तू बी ते खान्देशना मातींनी संतती से. खान्देश तुना संगे से! आगे बढो!,

👑💍🙏🏻💍👑 बापू हटकर

👑💍👑💍👑💍👑💍👑💍👑💍👑

🌹इद्यानं कवतीक🌹

 🌹इद्यानं कवतीक🌹

          ********

.....नानाभाऊ माळी


मुक्या निख्खार  आमल्हे

तू लिखाडं शिकाडं....

दोन पाच म्हनत गवूत

पडता घर वाचाडं.....🌹


दारे उनूत भुक्या-तिश्या

पेला भरी आमृत दिन्ह

कवतुकनि सावलीम्हा

 भल व्हयनं जिंदगीनं...🌹


चांद सुर्यान्ह उजाये

 आमन्ह अंधारं दूर गये

इद्यान्हा कवतीकम्हा

 घर घरलें दखाये.....🌹


तून्ह्या दिंडीन्या पताकास्नि

आंध्या पाचोया उडायां

दगडम्हा वती  ग्यानं

जगन्हा मानोस घडाया..🌹


माय बहीन जिजीनी

दिन्ही हिरदनी माया

जगनां एव्हारंगुंता

तू दिधातं आम्हलें डोया..🌹

 🌹**********🌹

.....नानाभाऊ माळी

(मु.पो.ता.शिंदखेडा.जि.धुळे)

ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८

मो.नं-७५८८२२९५४६

        ९९२३०७६५००

दिनांक-२२जानेवारी२०२१

नारच समदं काही!

 नारच समदं काही!


माय तू ! मया तू !

तुज घर ! दारं !!


शांती तू ! त्याग तू !

तुज प्रेम  ! आधार!!


बांधेल तू ! बंधन तू !

तूज वंदन ! नारं !!


लढाई तू ! भक्ती तू !

तुज बुद्धीनी ! रासं !!


शक्ती तू ! रती तू !

तुच सती ! व्हसं !!


ईज तू ! भूई तू !

तुच धारा ! बनसं !!


लक्मी तू ! काली तू !

तुज काय ! वढसं !!


दिन तू ! रात तू !

तुज दिवा ! बयसं !!


बाई तू ! मानूस तू !

तुज धरती ! रचस !!


आभाळ तू ! पाताय तू !

तुज जाय ! फेकसं !!


आभंग तू ! आखंड तू !

तुज आस ! सजसं !!


भूक तू ! भाकर तू !

तुज वावरनं ! धानं !!


इद्या तू ! सटी तू !

तुज वहिनं ! पानं  !!


जीवनं तू ! मरन तू !

तुज चिंता नी ! आग !!



 वनश्री पाटील जालना 

परखड काव्य संग्रह

🌹🌿चारोया गुलाब फुलेसन्या🌿🌹

🌹🌿चारोया गुलाब फुलेसन्या🌿🌹

फुले फुलेस्म्हा गुलाब

फुले-पानेसना राजा

हाऊ फुलस काटाम्हा

         हायी यानी से वं सजा ॥१॥

हाऊ फुलस काटाम्हा

तरी हासस व्हटम्हा

खरी जीवननी रीत

           दपाडस ह्या गोटम्हा ॥२।

मन कसं मन कसं

काटा कुटासनं रान

काटा कुटास्महा भेटस

               गुलाबनं वरदान ॥३।

काय सांगू कसं मन

मन फुलनं गुलाब 

यानं नाव से गुलाब 

          याना बठ्ठासले लाभ॥४॥

मन जसा से गुलाब 

बठ्ठा फुलेसना बाप 

काटा कुटासना तरी

           याना करमम्हा शाप ॥५॥

      --निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.

शब्दसृष्टी, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुळे.

🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

जागतिक अहिराणी मास!

 📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚

                   जागतिक अहिराणी मास!

         अर्थात महाराजा सयाजी पुण्यतिथी जयंती!

➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿

             तारीख 26, 27 आणि 28 डिसेंम्बर 2020 ले विश्व अहिराणी सम्मेलन दनकामा पार पडन नी बठ अहिर जग खुस व्हयन. आठे ज्या ठराव पास झायात त्यामा एक ठराव असा व्हता, *महाराजा सयाजीराव गायकवाड यासनी जयंती जागतिक अहिराणी दिन म्हनीसनी साजरा करना.*

        त्यानं वास्तव रूप आस, 6 फेब्रुवारी महाराजनी पुण्यतिथी से नी 11 मार्च हाई महाराजानी जयंती. 6 फेब्रुवारी पुण्यतिथी ते 11 मार्च जयंती हाऊ 34 दिनना वखत हाऊ आपले अहिराणी मास साजरा कराना से.

म्हणजे काय? 

        6 फेब्रुवारीले जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद नी या अहिराणी मास सोबननी सुरवात करांनी नी 11 मार्चले संगता करांनी. 7 फेब्रुवारी ते 10 मार्च या 32 दिवसना कायमा बठा अहिरसनी अहिराणी मास पायांना. या 32 दिनले रोज कोठेंना कोठे अहिराणी दिवस साजरा कराना से. हारेक शाया, हायस्कुल, कालेज, गराम पंचायत, नगर पालिका, सरकारी हाफेस आठे अहिराणी दिन साजरा कराना. अहिराणी भाषान रूप सौंदर्य नी सयाजी महाराज यासना काम बद्दल चर्चा, व्याख्यान, नाटक, नृत्य, गायन असा कारेकरम करा. 

            महाराजा सयाजी राजा या शेवटला अहिर राजा व्हतात. त्यासनी मातृभाषा अहिराणी व्हती. त्यासना बाप काशीराव बाबा नी माय उमाबाई यासले अहिराणी बिगर दुसरी कोनतीज भाषा येय नही. त्यामुये महाराज त्यासना संगे कायम अहिराणी भाषामाज बोलेत. महाराज दत्तक ग्यात म्हणजे माय बाप बदलात पण डोकावरनी खान्देशी पगडी बदली नही. इतला आभिमान व्हता महाराजले खान्देशी संस्कृती ना. महाराजनी जगभर जत्रा करी पन डोकावर पागोट खान्देशीज व्हत. 

         महाराज यासन जलम गाव कवळान या गावमा महाराज 12 वरीस ऱ्हायनात. या बारा वरीसमा त्यासनी गावड्या चाऱ्यात, दुष्कायना सलमा आंगवर लिमाना पत्ता बांधी पानी मांग. बठा खान्देशी सन धूम धडाकामा साजरा करात. त्यापैकी गाय बारसले गावड्या ववायात. त्या टाईमले त्यासना संगे त्यासना जिवलग दोस्तार चिंधा भिल व्हता. महाराजन जलमत नाव गोपाळ व्हत. हाऊ गोपाळ नी चिंधा एक मजार खेनात वाढणात, झेपाले ग्यात, गावड्या चाऱ्यात एक भात्यावर भाकरी खद्यात. तो दोस्तार चिंधा भिल राजाले भेटाले बडोदाले ग्या. तठे राजानी भर दरबारमा चिंधा भिलले अहिराणी गाणं म्हणाले लाव. ते गाणं गाय बारसले गावड्या ववायाना वखत म्हणतस.

गाय भिंगरी गाय भिवरी चरस व माता डोंगरी।

गाय भिंगरीन शिंग जस महादेवन लिंग रे बा।

क्रिसनानी गाय बरवी।

दूध भरून देती चरवी।

उभीच माता तिरवी।

       म्हणीसन त्यासनी जयंती दिन आपुन अहिराणी दिवस साजरा करान निश्चित करेल से. 

         असा हाऊ राजा अहिराणी भाषा नी खान्देशी संस्कृती यावर प्रेम करे. राजाना समाज सुधारक म्हणीसन बी खूप कामे सेत. महात्मा ज्योतिबा फुले नी सावित्रीबाई फुले यासले आर्थिक मदत, बाबासाहेब आंबेडकर यासन सिक्सन, बडोदा विद्यापीठ, बँक ऑफ बडोदा, कपडा मिल, कलाभवन. अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव. भारतीय संघ राज्य बनाडाले मदत. सोतान बडोदा संस्थान भारतमा पयलेज विलीन करी दिन असा खूप कामे सेत. त्यासना शोध ल्या. पुस्तके इकत ल्या. ग्रंथालयमा जावा. सगळी माहिती वाचा नी अहिराणी मासमा भर भरी लिखा, वाचा, बोला. 

         सध्या आपुन 40 पदाधिकारी निवडले सेत. आजून 100 ना वर पदाधिकारी नेमना सेत. त्या बागे बागे नेमुत. पन सध्या ज्या 40 पदाधिकारी यासनी या अहिराणी मासमा किमान 5 गावेसमा अहिराणी दिन साजरा करा तरी 120 कारेकरम व्हतस. ते मंग भाऊ बहिनीसव्हन लागा कामले.

घरे घर संदेश।सोनाना खान्देश।।

आपली भाषा आपली वाणी।

अहिराणी माय अहिराणी।।

📚✍🏻🙏🏻✍🏻📚 बापू हटकर

📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚

मन

 मन

       [अहिरानी खान्देशी बोली भाषा]

जठे दुखं तठे मन

नही कधी वं रमनं

त्याले देखीसनी सुखं

         दूरथिन व हासनं॥धृ॥

मन मन करु मन

करु मनम्हा जतन

मन्हा पहिलेच ते बी

          कविताम्हा वं रमन॥१॥

आसं कसं व्हयी मन

आसं कोनले जमनं

मानूसना मनम्हाच

           कसं मन वं रमन॥२॥

मनं कसं मनं कसं

काटा कुटासनं रान

काटा कुटास्महा भेटस

            फुलेसनं वरदान॥३॥

बोलतसं तेच व्हटं

मनम्हा जे दाटी उनं

दुसराले वटवट

         खरा जीवले लागनं॥४॥

मन्हं ऐकी ल्हे वं माय

र्हास  आसं बी वं मन

जशी लयस सकाय

           नित् सुर्यानं किरन॥५॥

मन निर्मय निर्मय

आखो कसं सांगू  मन

खोल खोल चिखोलम्हा

            जसं कमय फुलनं॥६॥

     *--निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे*.

*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर,धुये. 

दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

----------------------------------------------------------------

जठे तठे =जिथे तिथे, त्याले=त्याला, दूरथिन =दुरुन, हासनं=हसलं, रमनं=रमलं, व्हयी=असेल, कोनले=कुणाला,  जमनं=जमलं, मनम्हाच=मनातच, काटा कुटासनं =काट्या कुट्यांचं, फुलेसन=फुलांचं, व्हट=ओठ, दाटी उनं=दाटून आलं, वटवट=बडबड, लागनं =लागलं, ऐकी ल्हे वं=ऐकून घे गं, र्हास=असतं, लयस=घेऊन येते, सकाय= सकाळ, निर्मय=निर्मळ, आखो=आणि-आणखी, चिखोल=चिखल, कमय=कमळ, फुलनं=फुललं.

 -------------------------------------------------------------------

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...