बुधवार, ३१ मार्च, २०२१

नारच समदं काही!

 नारच समदं काही!


माय तू ! मया तू !

तुज घर ! दारं !!


शांती तू ! त्याग तू !

तुज प्रेम  ! आधार!!


बांधेल तू ! बंधन तू !

तूज वंदन ! नारं !!


लढाई तू ! भक्ती तू !

तुज बुद्धीनी ! रासं !!


शक्ती तू ! रती तू !

तुच सती ! व्हसं !!


ईज तू ! भूई तू !

तुच धारा ! बनसं !!


लक्मी तू ! काली तू !

तुज काय ! वढसं !!


दिन तू ! रात तू !

तुज दिवा ! बयसं !!


बाई तू ! मानूस तू !

तुज धरती ! रचस !!


आभाळ तू ! पाताय तू !

तुज जाय ! फेकसं !!


आभंग तू ! आखंड तू !

तुज आस ! सजसं !!


भूक तू ! भाकर तू !

तुज वावरनं ! धानं !!


इद्या तू ! सटी तू !

तुज वहिनं ! पानं  !!


जीवनं तू ! मरन तू !

तुज चिंता नी ! आग !!



 वनश्री पाटील जालना 

परखड काव्य संग्रह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...