बुधवार, ३१ मार्च, २०२१

अंजली पाटील भादलीकर!

 👑💍👑💍👑💍👑💍👑💍👑💍👑

                   अंजली पाटील भादलीकर!

♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

          जळगाव जिल्ह्याम्हातल असोदा गावले लोक वयखतस ते बहिणाबाई चौधरींन जलम गाव म्हणीसन. या आसोदाना बगलमा एक भादली नावन गाव से आठे एक क्रांती झाई. त्या घटनाकडे बठा महाराष्ट्रान ध्यान गे. या गावमा अंजली पाटील नावना एक तिसरा पंथनी व्यक्ती गराम पंचायतमा निवडी ऊनी. हाई राज्यम्हाईनी पहिली घटना से. ती आपला खान्देशमा झाई. अंजली पाटीलले खान्देशी मतदारासनी मते दीसनी निवाडी दिन. त्या बठा अहिर मतदारसन अभिनंदन!

          लोक तृतीय पंथीले हिजडा म्हणतस, ते कोणी छक्का म्हणतस, ते सुधारित भाषामा किन्नर म्हणतस. ते असा हाऊ तृतीय पंथी जलम म्हणजे निसर्गना हातेवरी देवबाना हातेवरी व्हयल एक अपघात ऱ्हास. स्त्रीन मन पुरुषना दिह(शरीर) बंदिस्त म्हणजे तृतीय पंथी जलम. ते असा हाऊ इसम धडबाई बी नही नी माणूसबी नही ऱ्हास. त्याले समाज आँगे करस नही. हजारो वरीस फाईन या वर्गवर आपुन अन्याय करी ऱ्हायनूत. दुसरा सोडा पण खुद जलम देता मायबापले सूद असा जीवनी लाज वाटस. त्याबी त्याले नसटस करतस. आसडपासड करतस. त्याले घराम्हाई हाकली देतस. पन आते त्यासले बी बरा दिन ई ऱ्हायंनातं एक ते कोरट नी कायदानी त्यासले नागरी हक्क दिनात. त्यासले बी बाया माणसे सारख जीवन जागांना अधिकार भेटना. त्या शिक्षण, नोकरी, राजकारणना अधिकार दिना. 

     *तो अधिकार धरिसन अंजली पाटील हाई पहिली तृतीय पंथी व्यक्त महाराष्टमा निवडी उनी* महाराष्ट्रमा हाऊ तिसरा पंथना निवडी येवाना पहिला मान जसा अंजली पाटीलले भेटना तसाज तृतीय पंथीले निवडी देवांना पहिला मान हाऊ खान्देश कडे जास. आते हाई राज्यमा रेकोर्ड बनी गे. त्या बदल अंजली पाटील नी खान्देशन अभिनंदन!

         यांना पहिले mp मा एक कमला मौशी नावांनी खासदार निवडी येयल व्हती. एक महापौर बी निवडले व्हती. तीन नाव मी इसरी गऊ. आते हाई आपली अंजली पाटील. 

           रामायणमा बी यांना उल्लेख से. राम, लक्षुमन नी सीता वनवासले न्हीगनात तवय त्यासले पोसाडाले बठी परवान त्यासना संगे गई. शिववर जाताज प्रभूरामचंद्र त्यासले बोलनात. भाऊ बहिणीसव्हन कलियुगमा राजा नही ऱ्हावाव. जनतान राज ई. त्या वखत नरनारी राज्य करथिन हाऊ वर मी तुमले देस. आते तुम्ही बठा नरनारी मांगे फिरी घरेघर जावा. तवय नरनारी मांगे फिरनात पन तिसरा पंथना लोक जागावरज उभा ऱ्हायनात. तवय रामनी इचार "काय रे भो तुम्ही ग्यात नही?" तवय त्या बोलनात "आम्ही ते नर बी नईत नी नारी बी नईत मधला सेत आम्ही!" नी मंग रामनी त्यासले सांग कलीयुगमा तुमनबी राज ई. जावा घर. नी त्या बठा घर ग्यात. 

         तो रामना वर आज सफल झाया. लक्ष्मी सारखा तृतीयपंथी लिखी भुशी विद्वान झाया. गनेक हिजडा चांगला कामे करी ऱ्हायंनात. आते आज आपलं भावंड अंजली ग्राम पंचायत सदस्य झाय. या बठासले सलाम. 

         आपुन कर्तबगार बाईना उल्लेख बहिन म्हणीसन करतस, कर्तबगार माणूसले भाऊ म्हणतस तस कर्तबगार तृतीय पंथीले भावंड म्हणाले सुरवात करा. 

          पराभूत अपयशी व्यक्तिले समाज हिजडा म्हणस. ते आते बंद करा. हिजडाबी पराक्रम करी ऱ्हायनात. यशस्वी व्हई ऱ्हायनात, विजयी व्हई ऱ्हायनात. मर्दुमकी हाई काय फक्त पुरुष वर्गनी मक्तेदारी नही ऱ्हायल भाऊ, पराक्रमी, मर्द पुरुष सेत तशा मर्द बाया बी सेत, नी मर्द हिजडाबी सेत. हाई दुरुस्ती बठा झन करी ल्या. 

         स्त्री ती बहिन, पुरुष तो भाऊ आणि हिजडा ते भावंड तिन्ही बी मानव सेत. एक सेत. 

        भावंड अंजली पाटील सलाम तुनी गाजाडेल मर्दुमकीले. आगे बढो. भविष्यमा आंखो मोठा व्हय. आमदार व्हय, खासदार व्हय, मंत्री व्हय. मुख्यमंत्री व्हय. 73 वरीसमा खान्देशी माणुसले मुख्यमंत्री व्हता ऊन नही. तुले जमस व्हई ते दख अंजली! तुना रुपमा का व्हयना एक खान्देशी मुख्यमंत्री दखु ते. तू बी ते खान्देशना मातींनी संतती से. खान्देश तुना संगे से! आगे बढो!,

👑💍🙏🏻💍👑 बापू हटकर

👑💍👑💍👑💍👑💍👑💍👑💍👑

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...