बुधवार, ३१ मार्च, २०२१

वचनना दिन*

 💚💚❤️❤️💚💚


*वचनना दिन*


आम्हना कोठे व्हता तवय

आजनी गत पिरेमना दिन ...

हातम्हा तिन्हा फुलं दिसन

परपोज तिले माराना दिन ...


देखाले तिले गयथू जवय

पयला व्हता भेटाना दिन ...

समजीं लिंथा हिरदयंस्नी

आम्हना तो परपोजना दिन ...


लगीनना दिन गुच्छ दिधा

तोज आम्हना गुलाबना दिन ...

हासनुत दोन्ही गालम्हानं

तोज आम्हना वचनना दिन ...


आते देतस येरा येरले साथ

चायत बठतस यादना दिन ...

भारी व्हती स्टोरी आम्हनी

सिर्फ तुमना पिच्चरना दिन ...


याद येतस त्या आजूक बी

आडी नाथले लावाना दिन ...

गोड मानी लिधात तरी बी

बिगर वयखना खुटाना दिन ...


वचन गीचन काहिज नही

तरीबी सेतस पिरेमना दिन ...

जगसूत राजी खुशीम्हानं

हयातीभर त्या रोजना दिन ...


✍️✍️कवी✍️✍️

विजय व्ही.निकम

धामणगावकर,चाळीसगाव

मो.नं.८८८८९४५३३५

दि.११/२/२०२१


💚💚❤️❤️💚💚

जाता जाता

 🤔🤔✅😷😷


*जाता जाता*


जाता जाता सांगी गयथा

भाऊ तुले सावध र्हावाले

कान वाटे निघी ग्या वारा

नियम बसाडात धाबावरे !


जो तो मर्जीना मालक से

लागी ग्यात बठ्ठा भवडाले

भोगी जिवन्या आयकोया

ग्यात इसरी मुस्क लावाले !


कितलं मनवर लिधं आम्ही

लागी कवय गंभीर व्हवाले

जीववर बितस नै तवलोक

लागतस मंग कशा घाबराले !


तुम्हनाज चुकी थाईन तो 

डोकावर लागे परत नाचाले

जाता जाता सांगी गयथा

भाऊ परत येसु मी भेटाले !


✍️✍️✍️

विजय व्ही.निकम

धामणगावकर,चाळीसगाव

मो.८८८८९४५३३५

दि.१९/२/२०२१


🤔🤔👆😷😷

साथ तुन्ही जलमनी

 ☘️🌸☘️🌸☘️🌸☘️


*अष्टाअक्षरी*


*साथ तुन्ही जलमनी*


साथ तुन्ही जलमनी

तेवढीच खराखाती

कोन नही कोन्ह आठे

नाता खातस वं माती ...


चाल मन्हा संगेज तू

मन्ही जीवननी साथी

तुज मन्ही दुनिया से

काय वाचू कोन्ही पोथी ...


खस्ता खाई हयातिन्या

वाढे लावात वं चिडा

पखे फुटी उडी ग्यात

बनी ग्यात वं गिधाडा ...


दोस देवो कोनले तो

भोग से तो वं आपला

रडी रडी मनन्या त्या

काढो नही वं ढीपला ...


साथ तुन्ही जलमनी

माले भारी वं भेटनी

व्हतीज तू म्हनिसनी

हाई जिनगी थाटनी ...


✍️कवी✍️

विजय व्ही.निकम

धामणगावकर,चाळीसगाव

मो.नं.८८८८९४५३३५

दि.२०/२/२०२१


☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

कोन सेतस तुम्हींन

 🟢🔴🟢🔴🟢🔴🟢


*कोन सेतस तुम्हींन*


कोन सेतस तरी तुम्हींन

तुम्हनंज तुम्ही पोखनारा

रीतनं कोन्ही बोलनं का

तेले हाटकिन टोकनारा ?


व्हयना व्हईन तरास तेले

तोज र्हास व्यक्त करनारा

कोन सेतस ह्या कोनले

चमचा,भक्त नाव देनारा ?


खरं तर याज महाभाग

र्हातस तुंबड्या भरनारा

जेना तेना पार्टीना झेंडा

मतलबनी गुंता धरनारा !


कोनलेज बोलू देवो नही

या सेतस ठेका उचलनारा

खोटं पुढे करिसनी कायम

खराना तोंडे त्या दाबनारा !


काय चालू से आठे नेमकं

से का कोन्ही तो देखनारा

गरीब रोज मरस आठे तो

तेले से का कोन्ही तारनारा ?


कान बन,डोया बन,तोंड बन

मिटी मिटी सेतस देखनारा

खेय व्हस कोन्हा आनी 

मरस आठे रोजस मरनारा !


"काय येस संगे" हाई सेतस

जरी आठे न्यामीनं सांगनारा

फरक काही पडस नै कधी

जवलोक सेतस अंध्या व्हनारा !


✍️✍️✍️

विजय व्ही.निकम

धामणगावकर,चाळीसगाव

मो.नं.८८८८९४५३३५

दि.२१/२/२०२१


🟢🔴🟢🔴🟢🔴🟢

ओ बाप रे ओ माय !

 🟢🔴🟢🔴🟢🔴🟢


*ओ बाप रे ओ माय !*


येस जवय तुन्हांवरे

भारी संकटना काय

काबर तवय करी र्हास

ओ बाप रे ओ माय ।।धृ।।


याद येस तवय तुले

देव्हाराना त्या देव

फिरी भवडी उना तरी

भेटना नही रे देव ।।१।।


नातं गोतं कये तुले

कयनी नही रे माय

माया तिन्ही व्हती

दूध वरनी रे साय ।।२।।


बाप व्हता तवय तुन्हं

भरेल व्हतं रे आभाय

खांदा वरे धरी रे तुले

गावं कोसले मिरायं ।।३।।


झाया मोठा हाफीसर

इसरी ग्या बाप माय

थयडंपन तेसनं तुले

सदा नडी नडी जाय ।।४।।


ठोकर लागे जवय तुले

मायनं काईज बई जाये

फुटेल तुन्हा बोटे देखी

जपम्हां वचकाई जाये ।।५।।


येस जवय तुन्हांवरे

वाईट खरा तो काय

तवय तुरे करी र्हास

ओ बाप रे ओ माय ।।धृ।।


✍️कवी✍️

विजय व्ही.निकम

धामणगावकर,चाळीसगाव

मो.नं.८८८८९४५३३५

दि.२३/२/२०२१


🟢🔴🟢🔴🟢🔴🟢

काय सांगू दादा मी आहिरानी बोलसना

 ☘️🌸☘️🌸☘️🌸☘️


*काय सांगू दादा मी आहिरानी बोलसना*


काय सांगू दादा मी आहिरानी बोलसना !

मायले मन्हा घरम्हां आते माडी म्हनसना !!


आहिरानी बोलाले तुम्ही

लावा आते गोडी ...

कसाले कोन काय म्हनी

सरम द्याना सोडी ...


परका देशनी भाषाले

नेसाडी चोई साडी ...

मायबोली आहिरानीले

आज एकली पाडी ...


आहिरानी बोलीना मी जागर करसना ।।धृ।।


समृद्ध से आपली भाषा

मायबोली आहिरानी ...

आयका बोलाले वाटस

जशी दही दूध लोनी ...


जयगाव धुये नंदुरबार

नाशिक बागलाननी ...

कान्हाना हाऊ कान्हदेश

बोली से आहिरवानी ...


आहिरानी बोलाले मन्हा हुरूप वाढसना।धृ।


आहिरानी बोलीना इतिहास

दुनियाम्हा से भारी ...

कान्हदेशी मानोसनी मारेलसे

उद्योगधंदाम्हा भरारी ...


आहिरानी धनगोतनी देवा

मायबोली ले हुभारी ...

घरेघर मायबोलीना द्या हो

आते गोडवा ले पेरी ...


आहिरानी लिखा वाचाले मवरे चालना ।धृ।

काय सांगू दादा मी आहिरानी बोलसना ।।

मायले मन्हा घरम्हां आते माडी म्हनसना ।।


✍️✍️✍️

विजय व्ही.निकम

धामणगावकर,चाळीसगाव

आहिरानी बोली कवी कान्हदेश

मो.नं.८८८८९४५३३५


☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

व्हावा तुमीन हो उतराई

 🕊️🌱🕊️🌱🕊️🌱🕊️


*व्हावा तुमीन हो उतराई*


कडक शे उंडायान ऊन 

म्हना येवं येवं चिवताई

लावा आंगलम्हा तुमीनं

घरेघर पुन्यांनी पानपोई ...


टाका मूठभर हो दाना

भलेज खावा रसमलई

तुमीन जगाडा पखाडा

मने भाये ते जीव लाई ...


नाचूद्या तेस्ले आंगलम्हां

धाबा वरे किलकिलाई

पाखरे त्या सेत जंगलना

तुम्ही तोडी हो आमराई ...


दाना पानीना सोध करी

जीवनी ती रे लाही झाई

सांगा तुमीन आते खरं

भुक्या पोटे कसं उडाई ...


लावा झाडे राने रे वने

जगाडा तुमीन वनराई

निसरगाना नेम पाया

व्हावा तुमीन हो उतराई ...


✍️✍️✍️

कवी विजय व्ही.निकम

धामणगाव ता.चाळीसगाव

मो.नं.८८८८९४५३३५


🕊️🌱🕊️🌱🕊️🌱🕊️

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...