मंगळवार, ३० मार्च, २०२१

आत्ये आशी करा व्हयी

 🔥आत्ये आशी करा व्हयी🔥

सुख शांती लयी ये वं

संगे येता येता व्हयी

मन्हं एकच सांगनं

        माय हिना जोडे हायी॥धृ॥

नही ठाऊक कोन वं

हिले बलावत व्हयी

आग हिना से पोटम्हा 

       आभायले भिडी जायी॥१॥

व्हयी करता वं व्हयी

झाडे झुडेसनी व्हयी

नका करु आशी घाई

         करा पाचोयानी व्हयी॥२॥

नही मांगस रे व्हयी 

खिर पुरननी पोयी

दीन दुब्याना पोटम्हा 

            दोन घासतरी जायी॥३॥

व्हयी भलं करो त्यानं

जो बी आशी करी व्हयी

देश न्यारा से खान्देश

      न्यारी आशी करा व्हयी॥४॥

   *--निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे धुळे.*

*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी नेहरु नगर,देवपूर, धुळे.

दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

===========================

फफुटा

 🌷फफुटा🌷

    -----------

....नानाभाऊ माळी


भाऊ-बहिनीस्वनं!

...राम राम!

कालदिन व्हयी (होळी)व्हती!आज धुळवळ से!धुलीवंदन से!व्हयीम्हा बठ्ठा उलटा-पुलटा इचार बयालें टाकी दिनथात!मन हालक वाटी ऱ्हायन!ज्यास्ना संगे वाकडं- तिकडं व्हत!ते बठ्ठ व्हयीम्हा बयी गये आसी समजी लिध!मन आभारानमायेक स्वच्छ,मोके,निरानाम उघडं व्हयी जायेलं से!आज व्हयीनी बयेल राख कपायलें लायी निर्मय वाटी ऱ्हायन!मनम्हानां बठ्ठा काया इचार बायीस्नि राख मांगे ऱ्हायेलं व्हती!कपाय राखाये व्हयी जायेल से!व्हयी बयी गयी!मांगे बरज बयी गये!घरनां बाहेर उन चटकाडी ऱ्हायनं!हुनं वार्ग गुर्मयी ऱ्हायनं!त्याम्हा आज धुळवळनी धूळ उडी ऱ्हायनी!🌷


राख धूळ से गवरी-लाकडेस्नि!तोंडलें लावा!आंगलें लावा!डोकालें लावा!बठ्ठ भस्म लावा! आंगनी चामडी धोयेलं भांडांमायेक चकचक करी ऱ्हायनी!राख धूळ से!म्हनो ते फफुटा से!धूळ ते धूळ ऱ्हास!फफुटा ऱ्हास!आज धुळवळनां दिन से!आल्लग आल्लग रंगनी धूळ आंगवर पडी ऱ्हायनी!आज आपुन आल्लग-आल्लग रंगन्ही धूळम्हा रंगी ऱ्हायनुत!आज  मैतरभाव ठीस्नि!...राग-लोभ इसरी, चांगलं वागानी शपथ लेवानां दिन से!धूळ उडू द्या!फफुटा उडू द्या!मन मोके करी नाचा कुदानां दिन से!फफुटा नेम्मंनं मार्ग दखाडतं ऱ्हास!बठ्ठा एकच व्हयी फफुटाम्हा भरी जावानं से लोयी लेवानं से!खेयी लेवानं!नाची-कुदी लेवानं!दुसरा वरनां राग बठ्ठा इसरी मोक्या मन थिन आखो मव्हरे जावनं से!🌷


"फफुटा" सबद हालका वाटस!झीन वाटस!मट्यारं वाटस!पायधूळ वाटस!हवाम्हा उडणारा बारीक अनु-रेणू वाटस!नाक तोंडम्हा जाणारी धूळ वाटस!पायंखालनी धूळ वाटस!तिचं धूळ मस्तकलें लायी ते महापुण्य वाटस!धूळ फफुटाचं से!उडत ऱ्हास!चांगला-वांगला संदेश दि खालें-वर उडत ऱ्हास!जिमीन वर बठतं ऱ्हास!🌷


भाऊ बहिनीस्वन!

धूळ फफुटा व्हयी रस्तावर उडस!बठ्या गाड्या-गुडयास्ना मांगे उडणारा फफुटा मव्हरे जाणारंस्ले उडी-वाडी हात देत ऱ्हास!संदेश देत ऱ्हास!


.....फफुटा आल्लग-आल्लग आर्थ लिसनी जलमलें येतं ऱ्हास!दखा मंग मव्हरे!फफुटा कश्या उडत ऱ्हास!......🌹


भाऊ बहिनीस्वनं!

लाल एसटीनां परवासन्ही गॅरंटी सरकार देत ऱ्हास!नेम्मंन गावलें पोचाडंतं ऱ्हास!जीवनी गॅरंटी ते त्याम्हा  बठ्ठास्थिनं मोठी ऱ्हास!मानोसलें  सोतांनां जीवनी किंमत आजून करता येल नई से!गनज किम्मत करणारा उना व्हतीन पन     डोकाम्हा आकडामोड करी!डोक खाजी!बोटे मोजी!तोंडम्हा पुटपुट करी!... बठ्ठा मांगे फिरीग्यात व्हतीन!🌷


भाऊस्वन!..आपला जिवडा भारी तोलमोलन्हा ऱ्हास!तरी भी फुल नई ते पान समजी गाडी कोठे ठोकायनी-ठाकायनी!आक्सडेंट व्हयना ते भरपाई भेटी जास!आखो कितलाग लाख रुप्यानी सरकारी गाडीम्हा परवास करी ऱ्हायनूत यान्हा अभिमान वाटतं ऱ्हास!खासगी गाडीनं तसं नई से!....ती एसी गाडी ऱ्हास!वजनदार ऱ्हास!...झोपानी सोय ऱ्हास!आद्यय-उद्दय करत नई!स्प्रिंगपाटाम्हा बठ्ठा हिसका झेली लेस!लक्झरी बस थंडीगार ऱ्हास!...पन आपला जिवडान्ही किंमत नई ऱ्हास हो तिले!कायजी नई ऱ्हास तिले!🌷


 लक्झरी बस रस्तावर कोठेभी बंद पडनी!.. ते तठेंग आपलं व्हझ धरी आपला पायवर पायतोड करी निंघनं पडस!आखो आड रस्ते!खेडा पाडास्ले येवानं ते नावचं ऱ्हात नई!लक्झरी बस अजिबात भरोसानी गाडी नई से भाऊस्वन!रस्तावर कोठे भी सोडी देस ती!खासगी ते खासगी ऱ्हास!यव्हारं दखा पुरती!पैसा मोजा पूर्ती ऱ्हास!पोटनं पानी हालत नई चांगली गोठ से!!पन काय कामनी उचडेलनांगत रस्तावर सोडी जास ती!निसती डांबरी सडक वर पयेत ऱ्हास!रस्तानां खडाभी उचकटत नई!खडगंनं नई!    चाकेस्ले माटी लागत नई!फफुटा उडत नई!फफुटा ते धुळवळ ऱ्हास!🌷


आंगवर फफुटा उडा सीवाय मयमाटी निंघतं नई!आंगन्ही नई आनी मनन्ही भी नई नींघस!आपुन गावं-खेडानां मानसे सेतस फफुटा खावासीवाय मन लागतं नई!समाधान लागत नयी!🌷


बोलानां पंधा आनी मुद्दा.. असा से भाउस्वन !..लाल गाडी खेडेपाडे!..वाडी-वस्तीलोंग मांगे फफुटा उडावत पयेत ऱ्हास!लाल गाडी आपली वाटस!..खल्ली जीव भावन्ही वाटस!नाता-गोता नी  वाटस!तिन्मांगे आंगवर!तोंडवर...फफुटा झेली!फफुटा खायी मानसे पयेत ऱ्हातंस!उडेल फफुटा आपला वाटतं ऱ्हास!लाल गाडी 'आपली'चं वाटतं ऱ्हास!फफुटाम्हा भरेलं मानसे आपला वाटतं ऱ्हातंस!येरायेरलें जीव लायी भेटतं ऱ्हातंस!..आंगवर फफुटा झेली गावथिन येणारा सगा-सायीस्नि ईस्टॅण्डवर वाट देखत लोके थांबेलं ऱ्हातंस!🌷


एसटीनां उडेल फफुटा जाता जाता नातंगोतं जोडी जातं ऱ्हास!एस टी...मव्हरे दूर लामीनम्हा चालनी जास!नजरे पडत नई इतली दूर जास!दुसरी गाडीनी वाट देखत उठेल फफुटा आखो बठी जास!🌷

 

भाऊ-बहिनीस्वन!

फफोटा उडत ऱ्हास!बठत ऱ्हास!आपला जीवडा तसाचं ऱ्हास!कव्हय मन दुःखी व्हतं ऱ्हास!येरा येरलें बोलचाल वरथिन तोंडले कुस्टाय लायी लेतस!मन नातं सोडी दूर जावालें लाग्न का मंग  भुदभवरीनां फफुटा उठत ऱ्हास!सवसारम्हा गनज सावा  फफुटा उठी बठतं ऱ्हास! येय निंघी जावावर आखो आपला सवसार लें लागी जातस!🌷


....तर भाऊस्वन फफुटा कव्हय गुडीपडानां येय लें!नयीतेंग मंग आखाजीन्हा मव्हरे!उन चंटकत ऱ्हास तव्हय वार्ग ली उठतं ऱ्हास!झाडेस्ना पाने गयालें लागी जातस!निया-धव्या कोंब हासत झाडनी फांटीवर डोकं वर काढी येत ऱ्हातंस!डोकावरनां यांय जिमीनलें हुनी करत ऱ्हास! वार्गासंगे माटी वर वर उडत ऱ्हास!....भाऊस्वन!..आशी म्हन से 'देव धव्हानां फफोटा उडी ऱ्हायना!' भुदभवरा संगेसंगे फफोटालें लयी फिरस! वडांग,पाला-पाचोया,माटी..बठ्ठ.. बठ्ठ भवरांगत आद्धरं वरवर उडत ऱ्हास!फफुटा बठ्ठ झाकी मारस!माटीनां धूळनां फफुटा मज्याम्हा आगीन तारावर बठी गिरक्या ली फुगड्या ख्येत ऱ्हास!त्याम्हा येरायेरलें कोन कोनलें दिखत नयी!हावू निसर्गानां खे चालूच चं ऱ्हास!तठे कोनं चालतं नयी!आपलाचं नांदम्हा ऱ्हास निसर्गानां खे!परका-पुरकानां हिशोब नयी ऱ्हास तठे!🌷


फफुटा उडा सिवाय आपली किम्मत समोरलालें कयेत नयी!घरना फफुटा ऱ्हावो!... नयी ते मंग बाहेरनां!जिमीन तपावर पोक्कयपना यी जास!धाकली- मोठी भूदभवरी आंग मोडी!गिरक्या ली फुगडी ख्येत ऱ्हास!जपेल जागे व्हतं ऱ्हास!फफुटा उठत ऱ्हास!घरम्हा भी येरायरनं डोक तापनं!खेटाखेटी व्हयनी!मन जोगता कोनी वागनं नही!..ते मंग तठेंग पहिलें डोकं तापस!तोंडन्ह इंजिन चालू व्हस!आवाजमां इतला फफुटा उठस!तो उलगेलपना करी दुसरास्ना आंगने, घरमा घुसी जात ऱ्हास!वार्ग आनी भूदभवरानं नातं फफु टा सी जोडेल ऱ्हास!..🌷

 

भाऊ बहिनीस्वन!

फफुटा घरम्हा घुसी उज्जी दांगडो करत ऱ्हास!कोना डोयांम्हा तो घुसस!कोना मनम्हा घुसस!ते कोना आंगवर फफुटा उडतं ऱ्हास!नाराज मनम्हा फफुटा उठत ऱ्हास!घरमा उठेल फफुटा बठ्ठास्ना मने बायी टाकस!उज्जी ईस्तोनंगतं लालभुदुगं ऱ्हास!तरी भी घरे-दारे,आंगणे वार-वांदनं फफुटा लयी फिरत ऱ्हास!घरमा घुसेलं आनी बठेल फफुटा झाडा झुडा सीवाय भाहेर पडत नयी!


तसीचं मनलें लागेल फफुटालें झटकनं व्हयी ते पहिलेंग एक दुसरालें वयखनं पडस!मनम्हा घुसी दुःखालें वाटी लेंन पडस!एक दुसरालें धीर देना पडस!..खल्ली खाटन्या दोरीस्नागत मने गुंफनां पडतंस!...🌷


घरम्हा भांडालें भांड लागावर कानलें आवाज येत ऱ्हास!वल्ल बयतंन बायावर धुक्कय व्हतं ऱ्हास!डोयांलें चुरचुर व्हतं ऱ्हास!सानं धुक्कयलें बिन बोभाटे घर न्हा भाहेर ढकलत ऱ्हास !वर धाडत ऱ्हास!तिचं गत जर... बाईनां आनी मानोसनां मनम्हा जर का धुक्कय घुसनं!फफुटा    घुस्ना! आखो त्याम्हा आली-गलीनां फफुटा भी उडी उना!....भाऊस्वनं!..घरनां फफुटा व्हवालें येय लागतं नयी! खटायपनं करी घरन्ह्या ऱ्हायेल-सूयेल उडतीन भी आड्या पडी जातीस!पडेल उडतीनंन्हा उडेलं फफुटा खेसर करत ऱ्हास!आल्लग गम्मत करत ऱ्हास!🌷


फफुटा कव्हय उडस मंग?जिमीन धपावर वारग-वांधी,भुदभवरा यासनी दनफन व्हस!येरायरलें कुमचाडी आद्धरं जिमीनवरनां फफुटा उठतं ऱ्हास!हालकीपटक धूळ रॉकेट बनी आभरायलें भेटी येस!भूदभवरानी दनफन गुच्चूप शांत व्हवावर धूळ खाले येत ऱ्हास!🌷


मानोस भी सोतां फफुटा व्हयी उडत ऱ्हास!कोना ध्याने नां मने बिनकामनां उडत ऱ्हास!धूळनां मायेक हालका व्हयी!पोच्चय शेंग नां मायेक उडत ऱ्हास!पट्यारा व्हयी उडत ऱ्हास!कोना ध्यानमा नां कांनमा व्हयी उडत ऱ्हास! अश्यामा पोची वयखी लेतस लोके!इतला भी निलाजऱ्या व्हवू नये!कोना पायनां खालनी धूळ काब्र व्हवो पन?... वार्गी उनी का उडायी लयी जास!फफुटा सारख हालकं व्हवो!पन सोतांनी इज्जत ठीस्नि!🌷


फफुटा डोयांम्हा खुपतं ऱ्हास!मन वर उडत ऱ्हास!त्याले नेम्मंनं झटकी!वयन लायी!...फफुटा संगे जमाडी लेवो!जोड-घडनं जीवन म्हा मव्हरे सरकावतं ऱ्हावो!...ताठा आठेचं ऱ्हायी जायी!थोडा फफुटा भी व्हयी देखो!....🌷

     🌹------------------🌹

.....नानाभाऊ माळी,

मु.पो.ता.शिंदखेडा.जि.धुळे(हल्ली मुक्काम-हडपसर,पुणे-४११०२८

मो नं ७५८८२२९५४६

         ९९२३०७६५००

दिनांक-२९मार्च(धुळवळ)२०२१

एक मान न से पान

 🌱एक मान न से पान🌱

मन्ही अहिरानी बोली

काय सांगू हिनी शान

कसा कितला निवाडू

          आख्खी हिरासनी खान॥धृ॥

हिनं गानं हिनं गानं 

जसं खडी साखरनं

देखा कविता करस

                 मन्ही हिनं गुनगान॥१॥

हिनी शिकाडं आम्हले 

गोडी गुलाबीनं गानं

झायी कविता कोकिया

               हिनं म्हनिसनी गानं॥२॥

हिनं गानं हिनं गानं

दुनियाले आवडनं

गानं खान्देश मझार 

                   हिनं जडनं घडनं॥३॥

मन्हा संगे आठे तठे 

हिनं मिरनं वं गानं

हिना संगे मन्हा बी वं

             व्हस देखा मान पान॥४॥

मन्ही अहिरानी माले 

एक मान नं से पानं 

मान हिनाच करा रे

            माले हिनीच से शान॥५॥

     -निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.

शब्दसृष्टी, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुळे.

दूरध्वनी क्र. ९३७१९०२३०३.

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

---------------------------------------------------

गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

जिंदगीनी नाव

🌹जिंदगीनी नाव🌹
       *********
    ......नानाभाऊ माळी

मव्हरे मव्हरे जायी ऱ्हायनी
हायी जिंदगीनी नाव......
मांगे ऱ्हायी जायी गावं
मांगे ऱ्हायी जायी गावं...!धृ🌷

रंजी गांजी सवसार हावू
काढस डोयांनां  पूरं....
आवते भवते नातं गोतं
मनलें लायी जास घोर......🌷

पोरे सोरे जातींनं पऱ्हा
यांय बुडानां ये लें......
डोयांनां आंसू गयथीनं
कुडी सोडानां ये लें.........🌷

मन्हा मनलें बिवती ऱ्हायनू
ली एक एक सुखनां धागा
व्हायी ऱ्हायनी हिरदम्हा
पवतीर करी कुडीनी जागा..🌷

मव्हरे मव्हरे जायी ऱ्हायनी
जायी ऱ्हायनी जिंदगीनी नावं
मांगे ऱ्हायी जायी गावं....
मांगे ऱ्हायी जायी गावं........🌷
     🌹**********🌹
.....नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा.जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं  ७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-०७जानेवारी२०२१

सद ईचार

ये जो ने

राब राबस खेतम्हा

🟢🔴🟢🔴🟢🔴🟢

अष्टाक्षरी काव्य

राब राबस खेतम्हा

राब राबस खेतम्हां
कसा रोज बाप मन्हां
खेती करस इमाने
तेन्हा एव्हढाज गुन्हां ...

बई म्हनतस बठ्ठा
बय कोन्ही देत नही
दय भाकरनं कसं
कोन्ही दखाडत नही ...

साल येस साल जास
हाल सरनात कोठे
म्हने पोशिंदा जगना
र्हास कोन्हा कोन्हा वठे ...

पिकाडस धान्य खेते
त्याले भाव भेटे नही
करा खर्च दाबीसन
ढेला परापद नही ...

खेय खेयस रोजना
करिसन अवकाया
कधी नही रे रडना
मोक्या करिसन गया ...

लेस कटाइन फास
दोन रोजना दुखोटा
करतस हयहय
खोटा दिखास मुखोटा ...

✍️कवी✍️
विजय व्ही.निकम
धामणगावकर ,चाळीसगांव
दि.६/१/२०२१

🟢🔴🟢🔴🟢🔴🟢

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...