मंगळवार, ३० मार्च, २०२१

आत्ये आशी करा व्हयी

 🔥आत्ये आशी करा व्हयी🔥

सुख शांती लयी ये वं

संगे येता येता व्हयी

मन्हं एकच सांगनं

        माय हिना जोडे हायी॥धृ॥

नही ठाऊक कोन वं

हिले बलावत व्हयी

आग हिना से पोटम्हा 

       आभायले भिडी जायी॥१॥

व्हयी करता वं व्हयी

झाडे झुडेसनी व्हयी

नका करु आशी घाई

         करा पाचोयानी व्हयी॥२॥

नही मांगस रे व्हयी 

खिर पुरननी पोयी

दीन दुब्याना पोटम्हा 

            दोन घासतरी जायी॥३॥

व्हयी भलं करो त्यानं

जो बी आशी करी व्हयी

देश न्यारा से खान्देश

      न्यारी आशी करा व्हयी॥४॥

   *--निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे धुळे.*

*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी नेहरु नगर,देवपूर, धुळे.

दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

===========================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...