🟢🔴🟢🔴🟢🔴🟢
अष्टाक्षरी काव्य
राब राबस खेतम्हा
राब राबस खेतम्हां
कसा रोज बाप मन्हां
खेती करस इमाने
तेन्हा एव्हढाज गुन्हां ...
बई म्हनतस बठ्ठा
बय कोन्ही देत नही
दय भाकरनं कसं
कोन्ही दखाडत नही ...
साल येस साल जास
हाल सरनात कोठे
म्हने पोशिंदा जगना
र्हास कोन्हा कोन्हा वठे ...
पिकाडस धान्य खेते
त्याले भाव भेटे नही
करा खर्च दाबीसन
ढेला परापद नही ...
खेय खेयस रोजना
करिसन अवकाया
कधी नही रे रडना
मोक्या करिसन गया ...
लेस कटाइन फास
दोन रोजना दुखोटा
करतस हयहय
खोटा दिखास मुखोटा ...
✍️कवी✍️
विजय व्ही.निकम
धामणगावकर ,चाळीसगांव
दि.६/१/२०२१
🟢🔴🟢🔴🟢🔴🟢
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा