शुक्रवार, १ जानेवारी, २०२१

गुण खान्देशी मातीचा

 गुण खान्देशी मातीचा

घ्यावा जरा उसना

गुण खान्देशी मातीचा 

असा आमुच्या मनात

         गुण गोडी गुलाबीचा॥धृ॥

गोडी सार्यांना वाटतो

इथे सण संक्रांतीचा

अरे अतिरेकी सोड

         तुझा धंदा आतंकचा॥१॥

बघ जरासा बोलून

बोल आमुचा सोन्याचा

बोल सोन्याचा बोलून

         होतो दसरा सोन्याचा॥२॥

बघ माझ्या खान्देशात 

सण येतो प्रकाशाचा 

प्रकाशित होतो पहा

          काना कोपरा देशाचा॥३॥

मना -मनात जागतो

दिप इथे दिवाळीचा

कण कण धरतीचा

          उजळीत आकाशाचा॥४॥

     *--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर,देवपूर, धुळे.

दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

○○○○○○○○○○○○○○○○○○○

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...