शुक्रवार, १ जानेवारी, २०२१

मायबोली आहिरानी

 

☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

*अष्टाक्षरी काव्य*

*मायबोली आहिरानी*


पडनूज नस्तू तुन्हा
पिरेमना चक्करम्हा
तर माले कयत का
जादू से तुले बोलाम्हा ...

म्हनीसन मी बोलस
हिरदना कोनाथुन
आते लिखस मी तुले
हौस नी आवडथुन ...

मायबोली मन्ही से तू
माय मन्ही आहिरानी
दूध वरनी साय तू
बोलो ते वाटस लोनी ...

कोन काय म्हनी हाई
लाज आते वाटत नै
तुले बोलाना बिगर
दिन मन्हा उगस नै ...

तुन्हा इतिहास भारी
तुन्हा महिमा जगम्हां
याद तुले करी डंका
वाजतस विदेशम्हा ...

मंग आपीन काबरं
मागे र्हावो खान्देशीस्नी
मायगुंता लटकूत
आते कंबर कसीस्नी ...

मायबोली आहिरानी
भाषा से कान्हदेशनी
तिले करूत जतन
बठ्ठा आहिर जमीस्नी ...

मंग आहिरानी माय
देखा कसी सुखी व्हई
धनगोत एकमांडे
देखा नक्की गोया व्हई ...

✍️कवी✍️
विजय व्ही.निकम
धामणगावकर, चाळीसगांव
दि.२६/१२/२०२०

☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...