मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

प्रत्येक आंडेर(पोर) करता एक हेवा नी गोट....! अहिराणी

प्रत्येक आंडेर(पोर) करता एक हेवा नी गोट....! 

(कोणतीबी पोर नी सुंदरता हायी तिन्हा मुखडा पेक्षा ह्रदय नी जास्त राहस.)

धना न्हानभाऊ नी घर म्हा पाय टाका.... 

"कावं,  आयकस का....? "

आवाज आयकताच् लटकन वहीनी हात म्हा पाणीना तांब्या-गल्लास लयीसन वसरी म्हा हाजिर, आणि न्हानभाऊ ले सांगाले लागण्यात... 

"आवं दखा, आपली सोनी करता सबा जिभाऊंत्या स्थळ लयेल शेतस. चांगला खुद्द-खानदानी माणसे शेतस, त्यासनी सर्व आबादानी शे, नी गयरा गोडी करणारा उड्या मनना मानसे शेतस म्हणे, असं सबा जिभाऊ सांगी रायन्हतात."

"पोरगा चांगला शिकेल-सवरेल शे, सद्या चांगला हुद्दावर नोकरी करस म्हणे."

"तव्हडं आपली सोनी पसंत पडी जावाले पाहिजे नी जोडं लक्ष्मी-नारायण नी गत शोभाले पाहिजे, मंग आपले पुढना मार्ग मोकळा.... 

तेच लेनं - देणं, तोच् बस्ता फाटा, नी सयेज् लगीन नी तारीख धरायी जायी."

न्हानभाऊ ना घर म्हा कायम हाशी-खुषीनं वातावरण राहे. कव्हय्-मव्हय्  धना न्हानभोनी बिडी, तंबाखू वरथून घरम्हा वातावरण तंग व्हयी जाये, पण न्हानभो ती गोट हाशी-मजाक् म्हा ली मारे नी टायी दे. 

सोनी वजी समझदार तसचं हुश्शार व्हती. बारावी नंतर सोनीनी बरचं कायजात्यं शिकसन करं, नी ती सुद्धा चांगला पगार कमावाले लागनी. 

पण, न्हानभाऊ मातर पक्का मन ना, सोनीना पगार म्हाईन एक रूप्या सुद्धा लिधा नहीं बरं....! 

वरथून सोनीले सांगे की, "बेटा तुन्हा हाऊ पगार तुन्हापान्हच् ठेव, तुले भविष्य म्हा अडि-अडचण म्हा काम पडी.....!"

सोनी पोरगाले नी पोरगाले सोनी पसंत झायी, दोन्ही परिवारस्ना संमतीतून लगन ठरनं. लगीन नी तारीख सुद्धा धरायी गयी. 

लगीन ना पंधरा दिवस पहिले न्हानभाऊनी सोनीले जोगे बल्हावं, आणि सांग, की...., 

"दख बेटा, मी तुन्हा सासरासंगे बोलनू, त्यास्नं म्हणनं शे की, त्या हुंडाम्हा काहिच् लेणार (लेव्हावत्) नहीं. तसचं सोनं -नाणं सुद्धा नको म्हणे आम्हले."

"ते दख बेटा, मी ह्या दोन लाख रुप्या संगायल शेतस, तुन्हा लगीन करता. ह्या पैसा तू तुन्हा बँक खाता म्हा जमा करी टाक."

" हा,  न्हानभो....!" सोनी हायी जरासं उत्तर दिसनी निन्घी गयी. 

दखता-दखता पंधरा दिन तव्हयच् सरी ग्यात. 

उना तो लगीन ना मंगलमय दिवस, सर्व वर्हाडी मंडळी, सगा-सोयरा, आत्पेष्ट बठ्ठा आनंदी नी हाशी-खुषीनं वातावरण व्हतं. 

वरात उनी, मंगलाष्टके झायात, आते कन्यादान ना वखत सोनी कोकिळाना स्वर म्हा बोलनी... "पंडितजी, जराखं थांबा, माले सर्वास्नी सामने बोली लेवू द्या."

"न्हानभो, तुम्ही माले लाड-कोडथून वाढावं, शिक्षण करं, खूप प्रेम दिन्ह, ह्या गोट नी परतफेड ते मन्हावरी व्हवाव् नहीं.....! "

"पण, तुम्हना जवाई आणि मन्हा सासरास्नी संमतीथून तुम्ही देल ह्या दोन लाख रुप्या मी तुम्हले परत देस. 
          ह्या पैसास्न, मन्हा लगीनले जो काही खर्च लागेल व्हयी त्यासाठे, तसचं उसना-व्याजना पैसा फेडी दिज्य्हात.....!"

"आणि ह्या तिन लाख रूप्या, ज्या मी मन्हा पगार म्हाईन संगायी ठेल शेतस..... 
          ह्या पैसा तुम्हले नी मन्ही ताईले (मायले) धयेडपणे काम पडतीन. ह्या पैसा तुम्हले तव्हय कोन्हापुढे हाथ फैलावू देवावूत् नहीं."

"जर मी पोरगा राहतू ते, इतलं करतूच ना...?"

आते मातर ह्या शबत सोनीना तोंडतून आयकताच्  आख्खा मांडव (मंडप) मझारला वर्हाडी चकीत झायात, नी एक-मेक कडे टगर-मगर देखाले लागणात. 

सोनी हसत चेहरातून नी हक्कातून, "दखा न्हानभो, आते मातर् मी जे काही मांगसू, ते तुम्हले मन्हा हुंडा समझीस्नी देणचं पडी बरं....!"

आख्खा मंडळी आवा्क झायात, 

न्हानभाऊ भरेल डोयास्वरी...... 

"मांग बेटा मांग....!! "

"ते, न्हानभो माले वचन द्या..., 
       आजपाहिन्  तुम्हनी बिडी-तंबाखू बंद....!"

"बस्स....!, माले तुम्हनाकडथून इतलाच् हुंडा मांगना शे.... "

न्हानभाऊ नुसता मानच् डोलावू शकनात, न्हानभाऊस्पान बोलाले शबतच् नहीं.

गनच् लग्नेस्म्हा तुम्ही नवरीले रडताना दखं व्हणार, पण सोनीना लगीनम्हा मातर भरेल मंडपम्हा सर्वास्ना डोया वल्लाचिंब व्हयेल व्हतात.

मी मातर्  सोनीले दुरथून लक्ष्मीना रुपम्हा दखी राह्यंतू, तव्हय माले वाटनं की, 

"ह्या भ्रूण हत्या करणारस्ले अशी लक्ष्मी भेटी का....? "

मन्हं गांव, 
मन्हा देश, 
जय अहिराणी, 
जय खान्देश....!!! 

लेखन सौजन्य :- चि. विश्वास युवराज पाटील, 
             मु. पो. सिंदगव्हाण, ता.जि.नंदुरबार. 
मो. 07588922686. 
(vishwasptl91@gmail.com)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...