सोमवार, १० एप्रिल, २०२३

सासरनी याद भारी

सासरनी याद भारी

आस्स सासर मज्यान
वठे गिरनाना थडे
बैलगाड जुपीसन 
जैठ घेवालेज दौडे 

याद भारी व मज्यानी
लागे सयदनी गोडी
काय सांगू सयी तुले
तीन तालनी  माडी

वनू माप वलांडीस 
लाया आडा तो मुसय
लवसव देर मन्हा
ननीदंले ना कुसय

माय बापनी पुन्यायी
मिते आचंबीत जऊ
आत्याबाई माले म्हने
तुन्ह माहेर व व्हऊ 

शिकाड्यात रितीभाती
माय उमरट गुन
म्हने मामंजी इठोबा
लक्समाना पायगुन

व्हाये गिरनाना पाट
मयाथया भारंभार
दुध व्हाये व धांड्याम्हा
बैलपोया ना जागर

सन वनात गयात
वरिसले लागी वरिस
ग्यात त्या देवमानसे
पटपट व निंघीस

याद मुकली ठी मांगे
आशे आते नै भेटाऊ
काय थाट व्हता मन्हा
आते आरती ववाऊ

काशीकन्या
काशीकन्या लिव्हस काव्य संग्रह

मन्ही रचना मन्हा ध्यास मन्हा स्वासजरासं आम्हनाकडेबी

🌿मन्ही रचना मन्हा ध्यास मन्हा स्वास🌿
    🌵जरासं आम्हनाकडेबी🤨
जरासं आम्हन्हाकडेबी,
ध्यान द्या मायबापहो,
बठ्ठी आथीपोथीबी,
*गुताडी आम्हीन दिधीहो.१
किटूकमिटूक उरेल सूरेल,
मजूर पयाडी लयीग्यात,
कपासी घरम्हा सडत पडेल,
 आडनडले बेपारी धूई रहायनात.२
मध्यमवर्ग शेत मस्त मज्याम्हा,
आयीपीएल दखी रहायनात,
विरीधी पक्स अॕसिडीटीना आजारम्हा,
सरकारवाला आयोध्याले पयी गयात.३
आत्ते आसं करा मायबापहो,
मरानी नही व्हस आम्हनी हिंमत,
आम्हनी खेती तुम्ही कराहो,
आनी दी टाका तोंडनी किंमत४
 गयाम्हा माय,हातम्हा टाय,
ली ली आम्ही फिरसूत,
ताडगापने धरतस रामना पाय,
आवकायी,दुस्काई तरी टायसूत!५
 बयीना येथीत पोर्या🤨
मझिसु✍️🌷प्राचार्य मगन सुर्यवंशी

गावगाडा [ अहिराणी कविता ]

गावगाडा [ अहिराणी कविता ]

गावगाडा ना पाटील चालाये गावनां गाडा व माय गाडा व  गावकुसना बाहेर नही व्हये ना राडा  व माय राडा व माय राडा ॥
गांव कुसना बाहेर नही व्हये ना राडा व माय राडा व ॥धृ 

बाप दादाना काळमा आजा पंजाना वाडा व माय वाडा व सासु वऊ ना नव्हथां वाडामा माय राडा व माय राडा 
सासु वऊ ना नव्हथा वाडा मा माय राडा व माय राडा व॥ धृ 

पुजा सटी नी राही आया  बाया  येई वाडामा माय वाडामा । राहे लगीण ना गोंधळ  रातभर चाले खेडामा माय खेडमा ॥ खेडामा   माय खेडा मा माय खेडामा ॥

माय माहेर  सासरं    लेकी बाळीना भरेल राहे चुडा व माय चुडा व ।  माय चुडा व  गावगाडाण भांडण  गावमाचं मिटे पाटील ना राही धडा व माय धडा व ॥ धृ.

दारशे खाटलं जवाईले पाटलं राहे ना मना वाडामा माय वाडा मा । साला सालीसना लगीण मा नव्हथां जवाई ना राडा व माय राडा व 
साला सालीसना लगीण मा नव्हथां जवाई ना राडा व माय राडा व ॥ धृ. . . 

रुसणं फुगणं सोयरा धायरानं नव्हथं ना मना खेडा मा माय खेडामा । जवाई न दुःखण ह्याईन फूगण नव्हथं ना मना खेडामा माय खेडामा 


कवी : साहेबराव नंदन [ गावगाडाकार ] ताहाराबादकर नाशिक

शुक्रवार, ७ एप्रिल, २०२३

 🌷🌹खान्देश🌹🌷

           *********

      ....नानाभाऊ माळी

 

कोनी कन्न म्हनंस तुले

कन्नडनां घाट छावलें

कोनी कान्ह म्हनस तुले

कृष्णानं रंग रुपले.....🌺!


तून्हा भाऊभन नी गोट

घरमा कानबाईनां रोट

आंगे विंध्य सातपुडा

टाचं मारी पये घोडा..🌺!


 तथा बऱ्हाणपूरलें पयेनां

तून्हा झेंडा गाडी वूना

खुरव्हरी उना करी खुणा

धडक राहुल बारीलें वूनां.🌺!


दगड माटीन्ह्या सेंत खानी

कये सोनानं रे पानी

भुरंट खुरटम्हा तू दपेलं

पडीत खाट्यानी कहानी!...🌺!


किल्ला हुभा ताट भामेरं

मव्हरे लळीगं से थायनेरं

 व्हाये दूध तूपनां महापूर

खान्देश गायी म्हैसीस्ना घर.🌺!


केयी कपाशीन्ह्या खानी

किर्र जंगल मांगस पानी

आभीर गोतनां तू राजा

अहिर भाषानी कहानी...🌺!


राज करे शूर गवई राजा

खड्डाम्हा बठेल खान्देश

मोजा पायव्हरी कान्हदेश

तापी गिरणांना मन्हा देश..🌺!

        🌹*********🌹

      ....नानाभाऊ माळी

(मु.पो.ता.शिंदखेडा.जि.धुळे)

ह मु हडपसर, पुणे-४११०२८

  दिनांक-२८डिसेंबर२०२०

विश्व अहिराणी साहित्य संमेलन लें मनःपूर्वक शुभेच्छा🌷🌷🌹👏

 हायकू


जीव हाऊ खोपाम्हा


चिडी ना गत

जीव हाऊ खोपाम्हां

आज धोकाम्हां


पक्षीनं दुख

कोंडेल पिंजराम्हां

आज घरम्हां


एकल्पन ते

वाटे जसं जेलम्हां

उनं भोगम्हां


हुभा मातर

गयरी हिम्मतम्हां

धरी आशाम्हां


जातीन निघी

दिन कय सोसाम्हा 

ठेवा मनम्हां


लिखु हायकू

बठीसन खोलीम्हा

गुपचूपम्हा


✍️✍️✍️

विजय व्ही.निकम

सोमवार, ३ मे, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि कुशल प्रशासक* *भाग - ६०*

 श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि कुशल प्रशासक

भाग - ६०

          गुतागुतीना कुट प्रश्न सोडायेत तव्हय महाराज मानसशास्त्राना चतरापना मा वापर करेत. फक्त कचेरीमा बशीसन ज्या गोष्टी ध्यानामा येतीस नही त्या गोष्टी सयरम्हायीन आसाच फेरफटका मारा की, महाराजस्ना ध्यानमा ये. बडोदा सयरमजार न्यारा न्यारा इभागमा फिरीसन कोठे रस्ता आखूड शे, कोठे रस्ता वयन ना घातक शे, कोठे जुनाट हायल्या धोकान्याशेत नहीते कोठे घाण कचरा साचेल शे, येस्नी सोता दखीसन त्या इभागना अधिकारास्ले आवश्यक सुचना करेत. एक दिन महाराज रावपुरा रस्तानी जायीरायंन्तात तव्हय तेस्ले दिसन की, रस्ता गयरा कोता शे, नी तेन्हामुये वाहतुकले जागाजागावरआडथळा व्हयी ह्रायन्हा आस तेस्ना ध्यानमा उन्ह. तो मुद्दाना रस्ता तेस्ले चवळा करना व्हताच. त्या रस्ताना काटले तेस्ले एक कबर दिसनी. रस्ता जर चवळा करान म्हण ते बाकीन अतिक्रमण लगेच हाटवता यीन, पण हायी खबर हाटायी ते धार्मिक भावना दुखावतीन. म्हणीसन हाऊ कूट प्रश्न सोडाकरता महाराजस्नी इचारचक्र चालु झायात. जमावले विवेक ह्रात नही. जमाव भावनासवर तरंगस. जमावना हायी मानसशास्त्राना महाराजस्ले आनुभव व्हता. तेस्ले उत्तर सापडन. तेस्नी आप्ला जेठा मुसलमान अधिकारीस्ले इश्र्वासमजार लिसन मनमजारली कल्पना समाजाडीसन सांगी. ती कल्पना आशी - रस्ताना काटले जी कबर शे ती रातोरात कोणलेबी न सांगता साफ करानी नी रस्ताना बाजुले काही फुटवर मोकी जागा शे त्या जागावर कबर रचानी आणि कबरवर निय्यी चादर चढायीसन मोहल्लामा अफवा पसारावानी की 'मौलाना बाबानी कबर तेनतेन्ही खरकी गयी. सोता महाराजसाहेब त्या पवथीर कबरवर फुलस्नी चादर चढावणार शेत' त्या निष्ठावान अधिकारीनी हायी काम कोणलेबी माहित न पाडता पाड, नी तव्हय महाराजसाहेब त्या कबरवर चादर चढावा करता उन्हात. त्यायेले काही मुसलमान पुढारी नी त्या अधिकारी स्वागत कराले हाजीर व्हतात. शेकडोगणती मुसलमान बंधु जमेल व्हतात. ढोलपोटझोड्यास्ना तळतल ढुमाक सुरु व्हत. दैवाना चमत्कारवर इश्र्वास ठेवणारा लोक बेभान नाची ह्रायन्तात. महाराजस्नी कबरवर फुलस्नी चादर चढाई नी दर्गा बांधाकरता काही रक्कम बी मंजूर कयी. तोच मव्हरे 'पिंपळा गेट दर्गा' म्हणीसन बडोदामा नामचीन शे. दोन च्यार महिनामा लोकस्ले त्या गोटना इसर पडावर रावपुरारस्ता चवळाकरानी योजना आखीसन आम्मल मजार आणी.

            लक्ष्मीविलास पॅलेस बांधीसन तयार व्हवावर राजपरिवार तठे राव्हाले गये. त्यायेले राजमहाल रोड गयरा कोता व्हता. तो महाराजस्ले चवळा करणा व्हता नी बाजुले झाड बी लावना व्हतात. तसच राजवाडा कडथाईन सयरकडे जाणारा रस्ताबी कराना व्हतात. त्या खाताना अधिकारास्ले बलायसीन पस्ताना आंदाजपंचे आराखडा तयार करान सांग रस्ता चवळाकरना व्हयीन ते गयरी जमीन संपादित करनी पडीण नी तेन्हाकरता जमीन मालकस्ले नुकसान भरपाई बी देन्ही पडणार व्हती नी भरपाई गयरी मोठी असामुये ती योजना थोडा दिन तहकूब करान आस आधिकारीस्नी महाराजस्ले सुताड. महाराजस्नी तेस्ना सल्ला मान्य कया. पण त्या गुपचूप बसना नहीत. तेस्ना मन मा इचारचक्र चालु झायात. तेस्नी म्युनिसिपल अधिकारास्ले बलायसीन आसा हुकुम काढाले सांग की, "नया कर आकाराकरता बंगलाना मालकस्नी आप्ला बंगला नी तेन्हा आगलबगलनी जमीन नी योग्य किंमत म्युनिसिपलपालटी ले कळायी द्या. नगरपालिका ना तसा हुकुम काढामुये कर कमी बशीन म्हणीसन परतेकनी आप्ली जमीन नी किंमत गयरी कमी लायी. बाजारभावना पेक्षा कयीक पटनी  कमी व्हती. मंग महाराजस्नी तीच किंमत लायीसन जमिन नी नुकसान भरपाई दिसन जमीन संपादन कयी नी राजमहाल रोड चवळाचटक कया बाजुले झाड बी लावात.

                 अधिकारी वर्ग समधानी ह्राहण चांगल प्रशासन ना करता गरज न शे ग्रामीण भागमा अधिकारीस्नी परवान ना जास्ती नजीक जायीसन तयमय करीसन कार्य करान म्हणीसन समद्या सुखसोयीस्न भरेल आसा डागबंगला पयदा कयात. कर्तबगार नोकरस्नी कायजी करणारा आसा लोककल्याणकारी राजा मियन विरयच!

            आप्ला सहवास मजारला लोक आप्ले जे सांगतस तेस्ना खर खोट तपासाशिवाय, दखाशिवाय महाराज कव्हय बी मव्हरली कृती नही करेत. तेन्ह एक उदाहरण मानसिंगराव गायकवाड सांगतस - शिपानी महाराजस्ना कपडा तयार करीसन खासगी कारभाराकडे आणीसन दिन्हात. नी महाराजस्ना रिचर्ड ह्या व्हॅलेकरता इस रुप्या टीप कारभारी कडे दिन्ही. रिचर्ड त्या दिन रजावर असामुये अधिकारीनी त्या इसरुप्या सस्पेन्स खाता मा टाकात शिपानी पैसा देल शेत आस कोणी तरी रिचर्ड ले सांग. तेल्हे पयसा नहि मियामुये तेन्हा गैरसमज आसा झाया की, कारभारी नी परस्पर पयसा खायी लिन्हात. एक दिन पेहराव करत असतांना तेस्ना पायमा मोजा घालतांना व्ह॑लेनी टिपना पयसा माल्हे मियना नहीत आशी तक्रार कयी महाराजस्नी शांततामा बठ्ठ आयकी. लिन्ह तव्हय त्या काहीच बोलणा नहीत. दुसरा दिन खात तपासणी करतांना इस रुप्याना बारामा सस्पेन्स खाताना बारामा इचार, तव्हय तेस्नी सांग टिपना पयसा व्हॅलीले देवाना राहेल शेत. तव्हय कारभारीनी काही चुक नही आस तेस्ले समजन. व्हॅलीनी चुहलभटारापणामुये तेन्ही दुसरा खातामा बदली कयी.

             आप्ला अधिकारीस्ले महाराज गयरा सहानुभूती नी समतोल बुध्दीमा वागेत. तेन्हा बारामा आनंदराव पवार एक उदाहरण सांगतस, "बगीखाना कामदारना हुद्दावर व्हतात तठे तेस्ना हातावरी काहीतरी नकयता चुक व्हयलमुये तेस्नी हत्तीखानवर बदली करीसन त्या प्रकरणा मी चवकसी कयी. तेन्हा नंतर हत्तीखानामा तेन्ही एक महत्त्वानी सुधारणा घडायी आणी. ती महाराजस्ले गयरी आवडनी. कर्सेचजींस्ले महाराजस्नी लगोलग शाबासकी दिन्ही माल्हे नवल वाटामुये मी तेस्ले इचार, तव्हय त्या बोलणात, "शाबासकी काबर देवु नको? एखादा आरोप व्हयीन ते त्या माणुस्मा दुसरा ह्राव्हानहीत आस थोडी ह्रास.? आणि जशी चुक तशी शिक्षा उन्हीच. तसच हायी बी शे चांगला गुण असतीन ते शाबासकी देव्हालेच जोयजे. जन्मभर आरोप उगावत बसणुत ते आप्लाज हात काया व्हतीन" एखादा माणुस्ना बारामा तेन्ह्या चांगल, वाईट कामनुसार तेन्हा संगे आप्ल मन स्वच्छ ठेवाकरता मन ना समतोलपणा लागस. तो गुण महाराजस्मा व्हता. सुरवातना कायले आनाडी लोक मोठल्ला हुद्दावर ह्राहेत. म्हणीसन आनंदराव पवार येस्नी महाराजस्ले इचार," आम्हणा सारखा आनाडी लोक खाशास्ना कामकरता ठेयेलमुये खाशास्ले तकलीफ व्हत नसीन का?'महाराज बोलणात," हायी तुम्हणी चुक शे हुद्दावर काम कराले फक्त सिक्सन नी गरज नही लागस, ते शहाणपणवर आलंबन शे. बुध्दीना वापर करीन तो कोणले बी काम मा यीन "समर्थस्नी शिकवणूक महाराजस्ना आंगे पुरी पडेल व्हती.

              अधिकार पाहून कार्य सांगणे /

              साक्षेप पाहोन विश्वास ठेवणे /

               आपला मगज राखणे /

               काहीतरी /

           लंडनमजार महाराजस्ना एक सत्कार समारंभ मजार भारतनामंत्री सॅम्युअल होअर बोलणात, "सयाजीराव महाराज ह्या फक्त हिंदुस्थाननाज नही, ते जगदुन्यामजारना हल्लीना बठ्ठा राजा लोकस्मा श्रेष्ठ शेत. इतला दिर्घकायलगुन तेस्नी मोठ्या संस्थानवर आक्कलहुशारीनी, सहानुभूतीनी, नी दुरदर्शीपणानी राज्य कये. हायी गोट तेस्नी भुषण वाटा सारखी शे." अध्यक्षीय भाषणमा मुंबईना माजी गव्हर्नर लाॅर्ड लॅमिंग्नट बोलणात," महाराज सयाजीराव गायकवाड येस्नी प्रशासणशास्त्रना जितला उपयोग कया तितला उपयोग करणारी दुसरी व्यक्ती माल्हे तरी माहित नही. "

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि कुशल प्रशासक* *भाग- ५९*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि कुशल प्रशासक*

*भाग- ५९*

                महाराज सयाजीरावस्ना प्रशासना कुशलताना बारामा नामदार गोपाळ कृष्ण गोखले येस्नी गव्हर्नर जनरल येस्ना इंपिरीयल कौन्सिमजार उल्लेख करेल व्हता. मा ना. गोखले बोलणात, "शिक्सननी महती जगदुन्यामा बठ्ठास्ले कयाले लागेल व्हत. ब्रिटिश सरकारले मन्ह आस हात जोडीसन कयकयीन सांगण शे की, प्रशासन जर नेम्मन पध्दत मजार आणि तयमय करीसन कार्य करस व्हयीन ते सक्तीना सिक्सन ना बारामा सरकारले हमखास यश येस. मी तुम्ले सयाजीराव महाराजस्ना ह्या संदर्भामजारला प्रशासकीय कुशलतेन मर्म सांगानी इच्छा करस. सयाजीराव येस्नी सक्तीन प्राथमिक मोफत सिक्सन पयले राज्यामा अमरेली तालुका मजार दहा गावस्मा चालू कये तठे तेस्नी आमना प्रमाणे यश येवावर ती योजना आख्खा तालुका मजार चालु कयी. तठे बी नामी यश मियावर तीच योजना बठ्ठा बडोदा राज्यामा तेस्नी लागु कयी आपीन हायी ध्यानमा ठेवाले जोयजे की, महाराजस्ले जे यश मियन तेन्ह कारण परवान करता करेल कल्याणकारी कामस्नी तेस्नी तयमय हायीच शे. 

                    माजी पंतप्रधान देवेगौडा लोकसभा मजार बोलतांना सयाजीराव महाराज येस्न गौरवपूर्ण कवतीक करीसन उल्लेख करीसन बोलणात, "प्रशासनमा भ्रष्टाचार व्हनार नही आसा प्रकारणी शासन नी घडी बसाडता येस. येन्हा करता महाराज सयाजीराव येस्ना प्रशासन व्यवस्था ना आपीन बठ्ठास्नी आभ्यास कराले जोयजे आणि आमलमा आणाले जोयजे." 

                  आपली परवान नी प्रगती साधाणा तेस्नी ध्यास लेल व्हता. त्या युरोप मजार जरी ह्रायन्हात तरी दर हाप्तामा तेस्ना कडे इकडथायीन कामना कागद पत्र टपाल करीसन जायेत नी तथायीन तेस्नावर योग्य शेरा मारीसन कागदपत्र नित्तेनेममजार वापस येत. कामन नी अधिकारस्न इभाजन तेस्नी इतल नामी करेल व्हत की तेन्हामुये रोजना राज्यकारभारमा तेस्नी सगैरहजरीमजारबी नेम्मन चाले. तेस्नी दिर्घ कायनी कारकिर्द शांततानी, भरभराटीनी वैभव नी गयी. जेल्हे आप्ला वयना बारावरीस लगुन राज्यानी धुरा वाहवान सपन बी पडेल नसीन आसा व्यक्तीनी हायी यश मियाव,येन्हामा दैवपेक्षा कर्तृत्त्वानाच जास्ती भाग शे. तस सांगान म्हणजे तेस्नामा सुप्त गुणस्नी उत्कर्ष व्हवानी तेस्ले नामी संधी मियनी हायीच खर तेस्न भाग्य.,! 

                   महाराजस्नी इंग्रजस्ना राजव्यस्थामजारला चांगला भाग लिसन तेन्हामा आप्ली कल्पना सक्तीनी नयी गोटनी भर घाली. तेन्हामुये तेस्ना राज्यकारभारले महत्व पयदा झाय. बडोदा संस्थान मजार महाराजस्नी जुनाट. ग्रामसंस्थांन पुनर्जीवन कये. हर ग्रामपंचायत मजार गावकरीस्नी निवाडी देल नी सरकारनी नेमेल आसा सदस्य ह्राहेत. परवान न आरोग्य, पाणी पुरवठा, धाकला मोठा तंटास्ना न्यायनिवाडा करण, आखो बाकीना काही काम ग्रामपंचायत कडथाईन करी लेत. तसच तालुका पंचायत नी जिल्हापंचायत येस्ले बी आधिकार दिसन ग्रामपंचायती तेस्ले जोडी दिन्ह्यात. लोकस्नी कारभार मजार भाग लीसन स्वयंपूर्ण नी संयंसिद्द व्हवाले जोयजे आसा महाराजस्ना हेतु व्हता. १९०२ पासुन बडोदा मजार हायी व्यवस्था चालु झायी. आप्ला दिवाण रमेशचंद्र दत्त येस्ले लिखेल पत्रामजार त्या म्हणतस, "लोकस्न्या हित न्या योजना तेस्नाज हातीवरी पार पडाव्यात आस प्रकारन तेस्ले सिक्सन देवान्ह मन्ह मुख्य धोरण शे तेन्हा करता स्थानिक स्वराज्यन्या मर्यादा वाढत जाव्हाले जोयजेत. म्हणीसन ग्रामपंचायतीस्ना कडे नी तालुका पंचायतीस्ना कडे जास्ती काम देव्हाले जोयजे लोकस्नी सोताज सोताना इकास करो आस माल्हे वाटस. आप्ली कार्यक्षमता वाढावाकपरता. ज्या सवलती जोयजेत त्या राज्यकर्तास्ना जोये मांगाना लोकस्ना हक शे  तश्या सवलती जर तेस्ले नही दिन्ह्यात ते तेस्ना हक्कानी चोरी करण नी निसर्ग ना अपराध करा सारख शे". 

               *पंचायत राज्यानी महाराजस्नी कल्पना नी आम्मलबजावनी इतली यशस्वी व्हयेल व्हती की, तोच आदर्श डोयास्ना समोर ठीसन व्दैवभाषिक मुंबई राज्याना नंतर महाराष्ट्र मजार यशवंतराव चव्हाण येस्नी नी गुजराथमजार जीवराज मेहता येस्नी पंचायत समित्या नी जिल्हा परिषदस्नी स्थापना कयी. सत्तान विकेंद्रीकरणनी सुरवात स्वतंत्र भारतमा आशी व्हयनी.*

                *गुजराथमा १९६० साल ले पंचायत समित्या नी जिल्हा परिषदस्नी सुरवात झायी. तेन्हा उद्घाटन समारंभ मजार बडोदा मा गुजरात ना तियायेना राज्यपाल नवाब जंग येस्ना हातीवरी न्यायमंदिर समोरना पंटागणवर व्हयना. आप्ला भाषण मजार त्या बोलनात, "सयाजीराव महाराजस्नी ५० ते ६० वरीस पयले पंचायत राज स्थापीसन पंचायतीस्ना कारभार यशस्वी करी दाखाडा व्हता. आज बी लोकप्रतिनिधी नी अधिकारी येस्नी महाराजसाहेबस्ना आदर्श सामने ठीसन कारभार करो, येन्हा पेक्षा मी जास्ती काय सांगणार? मातर तेस्ना प्रशासनाना यशना बारामा मी मन्ही एक याद आठे नमुद करस. मी आतेच आय. सी. एस. व्हयीसन हैद्राबादले येल व्हतु. त्या सुम्मारले निजामसाहेबस्ना पाहुणा म्हणीसन हैदराबाद मजार महाराजस्न आगमन व्हयेल व्हत. मी निजामना खल्लीना नातागोताना म्हणीसन महाराजस्ना आनंददायक सहवास माल्हे तव्हय लाभना. तेस्नी बडोदा राज्यामा माल्हे मोठा हुद्दानी नवकरीन निवत दिन्ह व्हत. तव्हय मी तेस्ले बोलणु, "महाराज तुम्ही जास्ती काय परदेस मजार ह्रातस तव्हय आप्ला गैरहाजरीमा संस्थान मजार नवकरपी करण कठीण ह्राहीन.*" 

      *"म्हणजे मन्ही गैरहजेरीमा राज्यामा गैरव्यवस्था ह्राहीन आस तुम्हले बोलण शे का? पण आते सुध्दा बडोदा मजार बठ्ठा कामकाज ठरेल येना प्रमाणे शिस्तीमा चालु असतीन, येन्ही माल्हे खात्री शे*. *"मी त्यायेले काहीज बोलणु नही. पण जरासा येमजार मी बडोदामा फोन लायी दखा तव्हय बठ्ठ कामकाज नेम्मन चालु शे आस दिशी उन्ह* 

            राज्यकर्तास्नी सदा लोकस्न आदरतिरथ कराले जोयजे नी तेस्ना कडन स्वागत निवत लेव्हाले जोयजे. तेन्ही बठ्ठा प्रकारना सार्वजनिक कार्यामा हिरीकमा भाग लेवाले जोयजे. म्हणजे महाराज गणपती उत्सव सारखा धार्मिक परसंगले, सिमोल्लंघन ना येले, मोहरमाना सण ना येले, सोता हाजीर ह्राहीसन धार्मिक नी सामाजिक आचारइचार पायेत. समाजसेवान मोठ ध्येय मव्हरे ठीसन काम करत ह्राव्हाण हाऊज खरा राजधर्म शे. आस महाराजस्न मत व्हत. बडोदाले दर वरीस्ले पाच ते दाहा दरबार भरेत. दसरा, उत्रान, हुयीना फाग, महाराजस्ना जन्मदिन, आसा मुद्दाना दरबार ह्राहेत. बठ्ठी मंडयी आप्ली लायकी परमाने आप्ला आप्ला जागावर बसनात म्हणजे महाराजसाहेब, गयरा धीरगंभीर पण आनंदमा दरबार मजार येत त्यायेन्ह तेस्न चालन, नी च्यारीमेय नजर मारण बठ्ठास्ले कवतीक सारख लागे दरबारी मंडई खाडकन उठीसन उभा ह्राहेत तेस्न्या रांगास्मायीन भलता धिमी पावल टाकत डावा, जेवनीकडे दखत त्या सिंव्वासनकडे जायेत. चालत जायेत तव्हय लोकस्ना मुजरा लेत. कोणासंगे मिश्किल हासेत कोणा संगे खुशाली इचारेत. महाराज सिंव्वासनवर बसनात की दरबार चालू व्हये. सोन वाटाण, तियगुयी. नही ते नजराणा स्विकारीण हायी बठ्ठ आपटीसन आरधा पाऊन तासमा हारतुरा, आत्तर गुलाब नी पानसुपारी हुयीसन दरबार उठी जाये. 

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...