बुधवार, ६ जानेवारी, २०२१

खान्देशी लगीनना दांगडो**********************************************फुनकं

खान्देशी लगीनना दांगडो
**********************************************फुनकं ****************
घाली गयाम्हा कट्यार  
व्हयना घोडाव्हर स्वार
मांघे  वऱ्हाडीस्नी  हार
पुढे व्हल्लर वाजा चाले रे... राजबंदडं ...
नाचे  पोरेस्नी  जिवानी
तेस्ले  पर्जाना  तासानी
टाक धोये नाकनं पानी
गगननी चान्नी देखे खाले रे... राजबंदडं...
कान्ना पर्दा  ठोके  ढोल
टिपरीवाला नाचेत गोल
लेझीमना आयका बोल
वर्माय ती खुशीम्हा डोले रे... राजबंदडं...
तुन्हा  बाप  शे जमादार
चढना  मारोतीना  पार
फोडे  बंदूकना  बार
तुन्ही फुई फुनकं झेले रे... राजबंदडं....
========================================🙏😄🙏===========
प्रकाश जी पाटील +++++++पिंगळवाडेकर
=============================

गोड बोलाना वं सन

*[ई बुक अहिरानी बोली भाषेतील प्रकाशित कविता संग्रहातून ...]*
          गोड बोलाना वं सन
उनी उनी उतरानं 
गोड बोलाना वं सन
गोड बोला हायीच से
       तिय-गुयनं सांगन॥धृ॥
उनी उनी उतरानं 
हिनं निरायचं गानं
सांगा सांगा दुनियाले 
    गोडी गोड बोलाम्हान॥१॥
गोड बोलाना बी आठे
देखा करतस सन
गोड गोड बोला म्हने
        बठ्ठा भाऊबैनीस्वन॥२॥
द्यारे पलटाईसन
आतंकनं वावधन
मन्हा भारत महान 
      याना काय सांगू गुन॥३॥
दसराले बी उगना
आठे दिन व सोनाना 
झगमग देखा आठे 
      दिवा करे दिवायीना ॥४॥
   *--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे*
*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये .
दूरध्वनी क्र. ९३७१९०२३०३.
●●●●●●●●●●●●●●●●●●●
शब्दार्थ :- उनी =आली, उतरानं =संक्रांत, हिनं=हिच,  बोलाना=बोलायचा, सन=सण, तियगुय=तीळगुळ, निरायच=निराळच-वेगळच, गानं =गाणं, करतस=करतात, बोलाम्हान=बोलण्यामधे, बठ्ठा =सर्व,  भाऊबैनीस्वन =भाऊबहिनींनो, पलटाईसन =पलटवून, वावधन=वादळ, 
मन्हा =माझा, याना=याचा, दसर्याले=दसर्याला, उगना =उगवला, आठे=इथे,दिन=दिवस, सोनाना=सोन्याचा, करे=करतो, दिवायीना =दिवाळीचा. 
●●●●●●●●●●●●●●●●●●●

मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

ज्योशिबा संस्कार

🙏🎀🙏🎀🙏

ज्योशिबा संस्कार



आशीज नही येस गोडी,अनमोल नाताम्हा,
जीव वतीन हरेकले जपनं पडत आंतरआत्माम्हा,
जग दखो हरदम आपलाज सोताम्हा,
देत लेत उभारी, गोडी शे माया जपाम्हा,

✒️ लेफ्टनंट डॉ.जितेंद्र देसले

रंगत संगत

सदईचार

रुपवती

खान्देशी लगीनना दांगडो

खान्देशी लगीनना दांगडो
=============================
केसर कस्तुरी गंगानं पानी, आंगणम्हा मारा सडा.
लाडा लाडीनी हायदले हाजर सनईसंगे चौघडा...
गंगा जमुना दोन्ही खेते
तठे काय देवपह्यांना रोपे
तठे काय सीताबाई काते
तठे काय कापुसना बेठे
नऊलाख चान्नीसम्हा चांदोबा जसा मन्हा लाडा //
ईसनू किसनू कांड्या भरे
राई रुक्मिणी पोयतं करे
तठनं पोयतं कोनले उनं
तठनं पोयतं लाडाले उनं
लेक पार्बतीना गणपती,देखा वाचस येदना धडा//
*************************************
****************कवी **********†******
प्रकाश जी पाटील..🙏🙏🙏पिंगळवाडेकर 😄
=============================

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...