बुधवार, ६ जानेवारी, २०२१

खान्देशी लगीनना दांगडो**********************************************फुनकं

खान्देशी लगीनना दांगडो
**********************************************फुनकं ****************
घाली गयाम्हा कट्यार  
व्हयना घोडाव्हर स्वार
मांघे  वऱ्हाडीस्नी  हार
पुढे व्हल्लर वाजा चाले रे... राजबंदडं ...
नाचे  पोरेस्नी  जिवानी
तेस्ले  पर्जाना  तासानी
टाक धोये नाकनं पानी
गगननी चान्नी देखे खाले रे... राजबंदडं...
कान्ना पर्दा  ठोके  ढोल
टिपरीवाला नाचेत गोल
लेझीमना आयका बोल
वर्माय ती खुशीम्हा डोले रे... राजबंदडं...
तुन्हा  बाप  शे जमादार
चढना  मारोतीना  पार
फोडे  बंदूकना  बार
तुन्ही फुई फुनकं झेले रे... राजबंदडं....
========================================🙏😄🙏===========
प्रकाश जी पाटील +++++++पिंगळवाडेकर
=============================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...