मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

खान्देशी लगीनना दांगडो

खान्देशी लगीनना दांगडो
=============================
केसर कस्तुरी गंगानं पानी, आंगणम्हा मारा सडा.
लाडा लाडीनी हायदले हाजर सनईसंगे चौघडा...
गंगा जमुना दोन्ही खेते
तठे काय देवपह्यांना रोपे
तठे काय सीताबाई काते
तठे काय कापुसना बेठे
नऊलाख चान्नीसम्हा चांदोबा जसा मन्हा लाडा //
ईसनू किसनू कांड्या भरे
राई रुक्मिणी पोयतं करे
तठनं पोयतं कोनले उनं
तठनं पोयतं लाडाले उनं
लेक पार्बतीना गणपती,देखा वाचस येदना धडा//
*************************************
****************कवी **********†******
प्रकाश जी पाटील..🙏🙏🙏पिंगळवाडेकर 😄
=============================

परनायला जाणे

≠========परनायला जाणे ==========
*************************************
दनदन.. दनदन.. दननन.. दनदन.......
छनछन.. छनछन... छननन.. छन छन....
दनदन करत चालणं हाई  गाडं,
मांगे पये लगीननी जान.....
हातोया सोडी गाठपलो मारी,
लौत हिरामोतिस्नी खाण..........//ध्रु //
तुन्ही वहिलीना चाकेंस्ले, सोनारूपान्या मांडोया
आवते भवते बसन्यात, तुन्या कंडोलनी सोया...
सर्ज्या राज्यानी खुरीस्ले, नाल सोनानी रे मारी
हायद लायीनी कम्मरले, भांदी शेलाम्हा कट्यारी
दन दन करत चालणं.......1
रंगीत छकडांना दुस्सेरले, लाल लोकेरना गोंडा
मन्ही बालंगी याहीनव्हर,आज चढाऊत बोन्डा..
त्या काकन्ना धागासंगे,जिकूत चिकनी सोपारी
उपर्नाम्हा भांधी आनुत, नव्वा सोयरानी कुवारी...
दन दन करत चालणं.......2
तुन्हा सासराना देव्हडीम्हा, बामन पंचांग वाची
धुमडाना तालव्हर मोती, तुन्हा बाशिंगना नाची
शीव उनी रे धुरकरी, आठे थांबाड तुन्हा टांगा
वाजत गाजत लेवाले या, याहीले निरोप सांगा
दन दन करत चालणं.......3
============================
****************कवी ****************
--------प्रकाश जी पाटील... पिंगळवाडेकर ------
=============================

अहिराणीनी विश्वव्यापी घोडदौड! आनंदाचे डोही आनंद तरंग!

💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻
             अहिराणीनी विश्वव्यापी घोडदौड!
                  आनंदाचे डोही आनंद तरंग!
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿
              बठा अहिर भाऊ बहिनीसले खुश खबर से. आपलं विश्व अहिराणी सम्मेलननी कमाल करी. जग दुन्याना एक लाखना वर प्रेक्षक यामा सहभागी व्हयनात. त्यामुये यानी दखल गूगलनी लिदी. नी त्यासनी त्या बद्दल उत्तरमहाराष्ट्र खान्देश विकास मंडळले पत्र धाडीसनी अभिनंदन कर. हाई खूप मोठी गोष्ट से. हाऊ अहिराणींना, अहिराष्ट्र कान्हादेशना, जगदुन्यामा पसरेल 2 कोटी अहिरासना मान, सन्मान, गौरव से. अहिराणी भाषांना डंका त्रैलोक्यमा नी 5 खंडमा वाजी ऱ्हायना. हाई आभिमाननी गोट से. 
           आजून एक आनंदनी गोट से. अहिराणींनाना पायवर पाय ठेवत मराठी भाषा बी पहिलं ऑन लाईन विश्व मराठी सम्मेलन ली ऱ्हायनात.  अहिराणी संमेलनन्या  तारखा 26, 27, 28 डिसेंबर 2020 ते मराठीन्या तारखा सेत, 28, 29, 30, 31 जानेवारी 2021 सेत. त्यास्ना आपला बी विषय सारखाच सेत. ऑन लाईन विश्व अहिराणी सम्मेलन हाई, सर्व भाषास्ना करता रोड मॉडेल ठरन, हाऊ अहिराणींना दिमाख से. 
*घरेघर संदेश।सोनाना कान्हदेश।।*

*आपली भाषा आपली वाणी।*
*अहिराणी माय अहिराणी।।*
💃🏻🏇🏻🙏🏻🏇🏻💃🏻 बापू हटकर
💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻

एक कायले

☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

एक कायले

व्हतु मी बी एक कायले
नामी भलता कार्यकर्ता
झेंडा पार्टीना हाते धरी
झुंगी धरू नेतानी कुरता ...

आशा भलती वाईट हो
मिरीगजय ती बनी जाये
मी तिन्हा मांगे मांगे पवू
ती आखो दूर पयत र्हाये ...

गंजक वरीसलोग हाऊ
चालना खेय आशावादी
शिखी लिखी नशिबम्हा
भेटनी ती खस्तास्नी गादी ...

घरन्या भाकरी खाद्यात
उखल्लावर हुभा राही
दिन वरीस सरत ग्यात
नवकरीनं वय ग्ये वाही ...

बेकार झावू तवय कयन
आपला वापर व्हई ग्या
हातमाईन काम ग्ये निघी
कामना हेडया वाकी ग्या ...

नेता मातर कार्यकर्ताना
खेय करी ग्या तो भारी
आम्हनी मातर इकडे
वाया गई अक्कल हुशारी ...

गल्ली पाईन दिल्ली लोग
शेतस बठ्ठा आठे पुढारी
त्यास्नी दावनले कार्यकर्ता
बिनकामी फुल अधिकारी ...

वेय ग्या वय ग्ये हाते
काहीज ते उरनं नही
कार्यकर्ता बनी कोन्हा
पोट सुद्धा भरनं नही ...

व्हा चांगला नेताना
चतुर कार्यकर्ता खरा
पन तेन्हा पयलेंग व्हा
माय बापना छोकरा ...

✍️✍️✍️
कवी विजय व्ही.निकम
धामणगावकर, चाळीसगांव
दि.४/१/२०२१

☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

शनिवार, २ जानेवारी, २०२१

झायं आपुरं आभाय

[अहिरानी खान्देशी बोली भाषा]                                    
     *झायं आपुरं आभाय*
जोतिबानी वं अस्तुरी 
मन्ही सायतरा माय
माय शिकनी व साय
         ग म भ न र्हास काय ॥धृ॥
शिकी सवरीनी माय 
उनी शिकाडाले साय
माय आम्हना करता
         झायी सारसता माय ॥१॥
नही ठाऊक आम्हले 
न्यानेसरी र्हास काय
ग्यान शिकाडे आम्हले 
           एक सायतरा माय॥२॥
दीन अनाथ लेकरु
मन्ही साऊ नी समायं
माय झायी सेवाभावी
        दिनरात खस्ता खाय ॥३॥
आशी व्हयी गयी माय
मन्ही सायतरा माय 
हिना मुयेच आम्हले 
        आज आपुरं आभायं ॥४॥
    *--निसर्ग सखी सौ मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये. 
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
शब्दार्थ-- अस्तुरी =पत्नी, मन्ही =माझी, सायतरा =सावित्री,  साय=शाळा, र्हास=राहते, उनी=आली, सारसता=सरस्वती झायी=झाली, ग्यान=ज्ञान, न्यानेसरी =ज्ञानेश्वरी, समायं=सांभाळलं, व्हयी गयी=होऊन गेली, हिनामुये =हिच्या मुळे, आभाय=आभाळ, आपुरं=अपुरं अपूर्ण.
  ~~~~~~  ~~~~~~~~~~  ~~~~~~

शुक्रवार, १ जानेवारी, २०२१

खान्देशी लगीनना दांगडो खान्देशी लग्न पध्दती

 खान्देशी लगीनना दांगडो 😄

*********†*************

मांडो.... बे, माथनी....😄🙏

*************************************

खंत्या.. खंतीले बलावा, हायद शे कोना हातनी

वाजत गाजत उना मांडो, गाडा मांडो बेमाथनी //

राम सीताना जोडपाले,

गाठ पलो पक्का भांदा...

कुस्सा दिसन आंगणमा,

मांडोना डर आते खंदा....

देवबामन्ना जामीनम्हा,लावा पणती तुपना वातनी.

कोरी माथनी कुम्हारघर्नी,

हायद लायी परनी टाका...

टाका गयामा माय पोयतं,

पानी ओती वरथून झाका...

वल्ला कुकूनी काढा वं,नक्षी न्यारा न्यारा भातनी..

=============================

============कवी ==============

प्रकाश जी पाटील......... पिंगळवाडेकर..........

*************************************

*************************************

गझल मन्ही बोलस अहिराणी गझल

 💫⚜

*◆गझल मन्ही बोलस..◆*__


💫☘ *गझलवृत्त-सौदामिनी*


________________________


नदारी दुन्याले दखाडू नको

कमाई लुटीनी कमाडू नको


रिकामा गया जो जगाले उना

लबाडी करी धन दपाडू नको


हयाती घडीनी भरोसा नही

फुकट देहले तू सजाडू नको


सहारा बनीस्नी उभारी दिन्ही

भिडू त्या कधीबी फसाडू नको


खरी संपती जप परीवारनी

जलम देवतास्ले कटाडू नको


पसारी पथारी सदानीकदा

सुखी मैतरस्ले सताडू नको


टिलकचंदबी भो उताना पडस

हुशाऱ्या करी जग चगाडू नको


✍🏼©️ *कवी-देवदत्त बोरसे*✍🏼

नामपूर ता.बागलान जि.नाशिक.

*9421501695*

_____________________▪⚜

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...